एक्स्प्लोर

Manoj Jarange Patil Pune : पुन्हा लाखो मराठे एकवटणार, जरांगे पाटलांची तोफ पुण्यात धडाडणार; कधी आणि कुठे होणार जरांगे पाटलांची सभा?

मराठा आरक्षणासाठी उपोषणकरुन  मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभा करणारे  मनोज जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटीनंतर आता थेट पुण्यात तोफ धडाडणार आहे

पुणे : मराठा आरक्षणासाठी उपोषणकरुन (Maratha Reservation)  मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभा करणारे  मनोज जरांगे पाटील  (Manoj Jarange) यांची आंतरवाली सराटीनंतर आता थेट पुण्यात तोफ धडाडणार आहे. पुणे जिल्ह्यातील खेडमध्ये त्यांची सभा होणार आहे. 14 ऑक्टोबर रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे त्यांची विराट सभा झाली. या सभेत त्यांनी आरक्षणासाठी आणखी दहा दिवस सरकारला दिले आहेl. त्यापूर्वीच 20 ऑक्टोंबरला पुण्यात सभा होणार आहे. 

पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यात जरांगे पाटील पहिल्यांदाच सभा घेणार आहे. याच सभेची जागादेखील ठरवण्यात आवी आहे. पुणे जिल्ह्यातील ही पहिलीच सभा असणार आहे. मराठा क्रांती मोर्चातर्फे या सभेची जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे. 

आंतरवाली सराटी सारख्या मराठवाड्यातील गावात ऑक्टोबर हीट असूनही लाखो लोकांनी गर्दी केली होती. नजर जाईल तिथपर्यंत मराठे एकवटले होते. यात सर्व वयोगटातील मराठे आंतरवाली सराटीत प्रवास करत दाखल झाले होते. तरुणांचादेखील यात मोठा सहभाग होता. हीच लाखोंची गर्दी आता पुण्यातील खेडमध्ये होणार आहे. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चातर्फे 5 लाख मराठा बांधव राजगुरुनगर येथील सभेला येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या सभेसाठी 100 एकर जागा निश्चित केली आहे. या जागेची पाहणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि पोलिसांनी केली.

24 ऑक्टोबरनंतरचं आंदोलन तुम्हाला झेपणार नाही...

 आंतरवाली सराटीनंतर त्यांनी काल (16 ऑक्टोंबर) पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. 
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारला दिलेल्या मुदतीचे आता 8 दिवस शिल्लक राहिले आहे. सरकराने आमच्याकडून 40 दिवस घेतले असून, या चाळीस दिवसांत त्यांनी आरक्षण दिले पाहिजे. अन्यथा 24 ऑक्टोबरनंतरचं आंदोलन तुम्हाला झेपणार नाही, असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे.यावेळी बोलता ना जरांगे म्हणाले की, "आधी सत्ताधाऱ्यांनी मला उपोषणाला बसवलं म्हणत होते. आता म्हणतात विरोधकांनी उभं केलय. त्यामुळे आता मराठा आरक्षणाच्या बाबतीत राज्यातील सगळ्या पक्षांनी भान ठेवावं. तर, सरकारने आमच्याकडे चाळीस दिवस घेतले आहे. त्यामुळे आरक्षण द्या, समितीला पुरावे सापडायला लावू नका. तुम्हाला 5000 पानांचा आधार मिळाले असून, त्या आधारे आरक्षण दिले पाहिजे. 40 दिवसांची मुदत संपल्यावर 24 तारखेनंतर होणार आंदोलन देखील शांत पद्धतीनेच असेल. मात्र, हे आंदोलन तुम्हाला झेपणार नसल्याचे जरांगे म्हणाले आहेत. 

इतर महत्वाची बातमी-

'आता सुट्टी नाही, 24 ऑक्टोबरनंतरचं आंदोलन तुम्हाला झेपणार नाही'; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

महत्त्वाच्या बातम्या

Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Embed widget