एक्स्प्लोर

Abdul Sattar :  पवारांची पावर अशीच राहो; बारामतीत कृषिमंत्री अब्दुल सत्तारांकडून पवार कुटुंबियांचं कौतुक

Abdul Sattar On Sharad Pawar: पवारांची पावर अशीच राहो, असं राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.  बारामतीत आज कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते.

Abdul Sattar Baramati :  पवारांची पावर अशीच राहो, असं वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Minister Abdul Sattar) यांनी केलं आहे.  बारामतीत आज कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. मी याठिकाणी कृषिमंत्री म्हणून आलो आहे. राजकीय पुढारी म्हणून आलो नाही, असं ही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी पवार कुटुंबियांच्या कामाचं कौतुक केलं. त्यांची पावर अशीच राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना असंही ते म्हणाले.

जुनी शेती नवीन करण्याचे काम शरद पवारांनी केलं

सत्तार म्हणाले की, बारामतीत खूप चांगलं कृषी प्रदर्शन भरवलं आहे. 2023 सालातील हे सगळ्यात चांगले प्रदर्शन आहे. कृषी प्रदर्शनामध्ये फोटो असतात आणि लिहिलेली माहिती असते मात्र या प्रदर्शनात डेमो पाहायला मिळत आहे. या ठिकाणी असलेली शेती बघितल्यानंतर शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि राजेंद्र पवार यांचे शेतीमध्ये असलेलं योगदान पाहायला मिळत आहे. जुनी शेती नवीन करण्याचे काम शरद पवारांनी केलं, असं म्हणत त्यांनी पवार कुटुंबियांचं कौतुक केलं. 

या कृषी प्रदर्शनात तंत्रज्ञान वापरून कशी शेती केली जाते, याचे प्रात्यक्षिक आहे. प्रत्येक शेतकऱ्याने बारामतीत येऊन हे प्रदर्शन बघायला हवं आणि त्याचे अनुकरण करायला हवं. अशा प्रदर्शनात अनेक संशोधन बघायला मिळतात. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो. त्यामुळे शेतात नवे प्रयोग करणं सोपं जातं. त्यासोबतच खाजगी विद्यापीठ आणि सरकारी विद्यापीठ यातील फरक करतील स्पष्ट झाला पाहिजे. सरकारी विद्यापीठ काय करतात? आणि खाजगी विद्यापीठ काय करतात. यातील फरक स्पष्ट होईल. ज्या गोष्टी पाहायला मिलेल्या त्यावर धोरणात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न करणार आहे. या प्रदर्शन राज्यात अनेक ठिकाणी भरवण्यात यावे , असंही ते म्हणाले

19 ते 22 जानेवारी दरम्यान खुले राहणार

170 एकरवर या कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, आयओटी, प्रिसिसीअन अॅग्रीकल्चरल, व्हर्टिकल फार्मिंग, ग्रामीण शेतकरी, रोबोटचा कृषी क्षेत्रात वापर, दुग्ध आणि फळप्रक्रिया क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान, क्लायमेट स्मार्ट अॅग्रीकल्चर प्रॅक्टिसेस, दूध आणि भाजीपाला प्रक्रिया उद्योग, मिलेट दालन असं अनेक उपक्रम पाहण्याची संधी मिळणार आहे. कृषि प्रदर्शनात मायक्रोसॉफ्टमार्फत बारामती येथे उभारण्यात येणाऱ्या सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन फार्मव्हाइब्ज' या कृषी संशोधन प्रकल्पातील अनेक प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना, उद्योजकांना दाखवण्यात येणार आहेत.  शेतकऱ्यांसाठी हे प्रदर्शन 19 ते 22 जानेवारी दरम्यान खुले राहणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Baba Siddique Shot Dead in Mumbai: बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस तातडीने लीलावती रुग्णालयात, सिद्दिकींच्या समर्थकांची घोषणाबाजी
बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस तातडीने लीलावती रुग्णालयात, सिद्दिकींच्या समर्थकांची घोषणाबाजी
Baba Siddique Firing: बाबा सिद्दिकींना 15 दिवसांपूर्वी धमकी, वाय दर्जाची सुरक्षाही दिली, पण घात झालाच
बाबा सिद्दिकींना 15 दिवसांपूर्वी धमकी, वाय दर्जाची सुरक्षाही दिली, पण घात झालाच
Baba Siddique Firing: वांद्र्याच्या खेरवाडी सिग्नलवर काय घडलं, बाबा सिद्दिकींवर गोळीबार कसा झाला?
तीन गोळ्या, तीन आरोपी, बाबा सिद्दिकी यांच्यावर हल्ला, नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवलीBaba Siddique : मोठी बातमी! राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांचा गोळीबारात मृत्यूUddhav Thackeray Full Speech : मोदींची मिमिक्री, RSSला सवाल; उद्धव ठाकरे यांचं दमदार भाषण ABP MAJHABaba Siddique Firing : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकींवर 3 जणांकडून गोळीबार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Baba Siddique Shot Dead in Mumbai: बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस तातडीने लीलावती रुग्णालयात, सिद्दिकींच्या समर्थकांची घोषणाबाजी
बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस तातडीने लीलावती रुग्णालयात, सिद्दिकींच्या समर्थकांची घोषणाबाजी
Baba Siddique Firing: बाबा सिद्दिकींना 15 दिवसांपूर्वी धमकी, वाय दर्जाची सुरक्षाही दिली, पण घात झालाच
बाबा सिद्दिकींना 15 दिवसांपूर्वी धमकी, वाय दर्जाची सुरक्षाही दिली, पण घात झालाच
Baba Siddique Firing: वांद्र्याच्या खेरवाडी सिग्नलवर काय घडलं, बाबा सिद्दिकींवर गोळीबार कसा झाला?
तीन गोळ्या, तीन आरोपी, बाबा सिद्दिकी यांच्यावर हल्ला, नेमकं काय घडलं?
Uddhav Thackeray Dasara Melava : चंद्रचूडसाहेब अजूनही वेळ गेलेली नाही, तारखांवर तारखा आणि भाषणे देऊ नका; उद्धव ठाकरेंचा 'सर्वोच्च' टोला!
चंद्रचूडसाहेब अजूनही वेळ गेलेली नाही, तारखांवर तारखा आणि भाषणे देऊ नका; उद्धव ठाकरेंचा 'सर्वोच्च' टोला!
Ind vs Ban: संजूचे 8, सूर्या 5, रियान-हार्दिकचे 4-4 अन् रिंकूचा 1 षटकार; भारताचे तुफानी 22 छक्के
Ind vs Ban: संजूचे 8, सूर्या 5, रियान-हार्दिकचे 4-4 अन् रिंकूचा 1 षटकार; भारताचे तुफानी 22 छक्के
Uddhav Thackeray Dussehra Rally : भाजपला राजकारणातील खांदा द्यायचा आहे, ही वृत्ती संपवावीच लागेल; उद्धव ठाकरेंचा घणाघात
भाजपला राजकारणातील खांदा द्यायचा आहे, ही वृत्ती संपवावीच लागेल; उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray Dasara Melava : ... तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचं वचन
... तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचं वचन
Embed widget