एक्स्प्लोर

Pune Nashik highway Accident : लग्नात वाढपी म्हणून गेलेल्या महिलांना कारने चिरडलं; पाच महिलांचा जागीच मृत्यू, पुणे-नाशिक मार्गावरील घटना

Nashik Pune highway Accident :  पुणे नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. महामार्ग ओलांडताना एका चारचाकी गाडीने धडक दिल्यानं ही घटना घडलेली आहे. यात पाच महिलांचा चिरडून मृत्यू झाला आहे.

Nashik Pune highway Accident :  पुणे शहरात (Pune Accident News) अपघाताचं सत्र संपताना दिसत नाही आहे. अपघातच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे.  पुणे नाशिक महामार्गावरील खेड तालुक्यातील शिरोली फाट्याजवळ हा भीषण अपघात झाला आहे. महामार्ग ओलांडताना एका चारचाकी गाडीने धडक दिल्यानं ही घटना घडलेली आहे. यात पाच महिलांचा  मृत्यू झाला आहे. 13 महिला जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. ही घटना काल रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली आहे. 

एका लग्नकार्यात काम करण्यासाठी 17 ते 18 महिला स्वारगेटवरून पीएमपीएमएल बसने खेड तालुक्यात आल्या होत्या. शिरोली फाट्याजवळ त्या उतरल्या, मात्र अंधारात त्यांना महामार्ग ओलांडायचा होता. पुण्याच्या दिशेने आलेल्या चारचाकीने आधी एका महिलेला धडक दिली. त्यानंतर गाडीवरचा ताबा सुटला आणि इतर सात महिलांना ही त्याने धडक दिली. 13 महिला जखमी झालेल्या महिलांवर उपचार सुरु आहे. यातील काही महिला गंभीर जखमी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सुशीला देढे, इंदुबाई कोंडीबा कांबळे ( वय 46) अशी दोन मृत महिलांची नावे असून अन्य मृतांची नावे समजू शकली नाहीत.

लग्नाच्या कार्यासाठी आल्या होत्या महिला

खरपुडी फाट्यावर असणाऱ्या मंगल कार्यालयात या 18 महिला लग्न कार्यक्रमात वाढपी आणि स्वयंपाक कामासाठी आल्या होत्या. या सगळ्या महिला पुण्यातील नसून पुण्याच्या आजूबाजूच्या गावातील आहेत. मंगल कार्यालय रस्त्यांच्या दुसऱ्या बाजूने असल्याने त्या रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी या महिसांचा दुर्दैवी अपघात झाला आहे. या महामार्गावरील अपघातात पाच महिलांना चिरडून चालक पसार झाला आहे. रात्रीची वेळ असल्याने पसार होण्यात चालक यशस्वी झाला मात्र खेड पोलीस चालकाचा शोध घेत आहेत. 

अपघात कधी थांबणार?

पुणे जिल्ह्यात अपघाताच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. रोज अपघाताच्या घटना समोर येत आहेत. त्यात अनेकांचे नाहक जीव जात आहेत. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्व पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. मात्र अपघाताच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. वेग, रस्ते या अपघातासाठी कारणीभूत ठरत असल्याचं आतापर्यंतच्या अपघातातून समोर आलं आहे. योग्य उपाययोजना राबवून हे अपघात रोखणं प्रशासनासमोर मोठं आव्हान आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

One Nation One Election : 'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
Maharashtra Ekikaran Samiti : कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 09 December 2024Aaditya Thackeray : 5 वर्षात पुन्हा अन्याय होणार नाही असं आश्वासन हवं, आदित्य ठाकरे गरजलेUday Samant on Jayant Patil : जयंत पाटीलांचं भाषण ऐकण्यासारखं होतं, उदय सामतांनी केलं कौतूकDilip Lande vs Sunil Shinde : अधिवेशनात 'तो' मुद्दा गाजला! दोन्ही शिवसेना एकत्र यैणार...?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
One Nation One Election : 'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
Maharashtra Ekikaran Samiti : कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
Team India WTC Points Table : ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
Amol Mitkari : Jayant Patil यांच्यासाठी हीच योग्य वेळ राम कृष्ण हरी,चला जाऊ देवगीरी!
Amol Mitkari : Jayant Patil यांच्यासाठी हीच योग्य वेळ राम कृष्ण हरी,चला जाऊ देवगीरी!
मोठी बातमी : मालेगाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात खुद्द CM फडणवीस घालणार लक्ष, 11 डिसेंबरला 'त्या'14 तरुणांची घेणार भेट
मोठी बातमी : मालेगाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात खुद्द CM फडणवीस घालणार लक्ष, 11 डिसेंबरला 'त्या'14 तरुणांची घेणार भेट
शिवनेरीच्या भूमिला मंत्रीमंडळात स्थान द्या, अपक्ष आमदाराचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
शिवनेरीच्या भूमिला मंत्रीमंडळात स्थान द्या, अपक्ष आमदाराचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
Embed widget