एक्स्प्लोर

कधीही कुस्तीचा लंगोट न नेसलेल्या अजित पवारांना गदा दिली, पण ती कशी धरावी, कुठं ठेवावी...

पुण्यात काकासाहेब कुस्ती संकुलात यंदाचा महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षवर्धन सदगीर आणि उप महाराष्ट्र केसरी शैलेश काळे यांचा सत्कार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला. यावेळी अजित पवारांना मानाची गदा देण्यात आली.

पुणे : जिंकलेल्या पैलवानाला गदा दिली जाते. परंतु, कधीही कुस्तीचा लंगोट न नेसलेल्या अजित पवारांना तुम्ही गदा दिली. तलवार आम्हाला नेहमी दिली जाते. पण, तुम्ही दिलेली गदा मलाही कळेना ती कुठं ठेवावी, कशी धरावी. त्यामुळे गदा ही पैलवानाच्या खांद्यावरच शोभून दिसते. दुसऱ्या कुणाच्याही खांद्यावर ती शोभत नसल्याचे सांगत पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्र केसरी विजेत्या पैलवानांचे स्वागत केलं. कात्रज परिसरातील काकासाहेब कुस्ती संकुलात यंदाचा महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षवर्धन सदगीर आणि उप महाराष्ट्र केसरी शैलेश काळे यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनतर केलेल्या जाहीर भाषणात ते बोलत होते. अजित पवार म्हणाले, एक एक पैलवान तयार करताना किती कष्ट घ्यावे लागतात, किती खर्च करावा लागतो याची मला जाणीव आहे. पराभव झाल्याने पैलवानांनी खचून जाऊ नये आणि यश मिळालं म्हणून हुरळूनही जाऊ नये. खेळात जय पराजय होत असतात, त्यात खिलाडू वृत्ती जपायची असते. यशात सातत्य ठेवायचं असतं. राज्यातील खेळ अधिक लोकप्रिय होण्यासाठी काय करता येईल, यासाठी मी क्रीडामंत्री सुनील केदार आणि क्रीडाराज्यमंत्री आदिती तटकरे यांच्यासोबत बैठक घेतली. पालकांनाही वाटले पाहिजे की माझा मुलगा, मुलगी जरी अभ्यासात कमकुवत असला तरी एखाद्या खेळात निष्णात असावा. एखाद्या खेळात त्याने यश संपादन करावं. हे यश संपादन केल्यानंतर खेळातून बाहेर पडल्यानंतर त्याला एखादी नोकरी मिळावी अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचा महाआघाडीच्या सरकारचा प्रयत्न असेल. त्यामुळे खेळाडूंनी काळजी करू नये. पवार मंडळी कुस्तीचं मैदानही गाजवतात हे आजच समजलं - पवार मंडळी फक्त राजकिय मैदान गाजवतात असा माझा आजवर समज होता. पण पवार मंडळी कुस्तीचं मैदानही गाजवतात हे मला आज समजलं. म्हणजे इथेही पवार काही कमी नाहीत हे पुणेकरांनी लक्षात ठेवावे, असे गमतीने म्हणताच एकच हास्याची लाट उठली. Shivbhojan Yojna | पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शिवभोजन थाळी योजनेचं उद्घाटन | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
Sitaram Yechury आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 7.00 PM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNitesh Rane : मुस्लिमांसबत व्यवहार करायचा नाही, नितेश राणेंचं टोकाचं वक्तव्यSitaram Yechury Demise : सीताराम येचुरी यांचं निधन; दिल्लीतील एम्स रुग्णालयात सुरु होते उपचारRajesaheb Deshmukh  : बीडचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुखांनी घेतली शरद पवारांची भेट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
Sitaram Yechury आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
निरोप कॉम्रेड...  कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
निरोप कॉम्रेड... कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
Raosaheb Danve: ''राहुल गांधी भ्रमिष्ट, त्यांना समजत नाही कुठे काय बोलायचं'', रावसाहेब दानवेंची कडवी टीका, 40 जागांच्या मतभेदावर म्हणाले..
''राहुल गांधी भ्रमिष्ट, त्यांना समजत नाही कुठे काय बोलायचं'', रावसाहेब दानवेंची कडवी टीका, 40 जागांच्या मतभेदावर म्हणाले..
दोन महिन्यांनी लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांचे तीन हजार होणार; राऊतांची घोषणा
दोन महिन्यांनी लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांचे तीन हजार होणार; राऊतांची घोषणा
Embed widget