Maharashtra Cabinet Expansion: पुण्यातील आमदार माधुरी मिसाळ यांना मंत्रिपद मिळणार?
पुण्यातून दोन नावाची चर्चा होताना दिसत आहे.त्यात भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांना देखील मंत्रीपद दिलं जाणार असल्याच्या चर्चा आहे.
Maharashtra Cabinet Expansion: गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळाच्या विस्ताराचा अखेर मुहूर्त ठरला. उद्या 11 वाजता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळात कोणाला संधी मिळणार, या बाबत काही नावांची चर्चा आहेत. त्यात उदय सामंत, दादा भुसे, संजय शिरसाठ, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, भरत गोगावले आणि शंभूराज देसाई यांचे नाव फायनल असल्याची माहिती आहे. शिंदे गटाकडून हे मंत्री उद्या शपथ घेणार आहेत, असंही बोललं जात आहे. मात्र पुण्यातून दोन नावाची चर्चा होताना दिसत आहे. भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ (madhuri misal) यांना देखील मंत्रीपद दिलं जाणार असल्याच्या चर्चा आहे.
पुण्यातील दोन नावं सध्या चर्चेत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांना मंत्रीपद मिळणाऱ असल्याच्या चर्चा आहे. या दोघांनाही नेमकं कोणतं खात दिलं जाणार?, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. माधुरी मिसाळ या पुण्यातील पर्वती विधानसभा मतदार संघातून सलग तीन वर्ष निवडून आल्या आहेत. पुण्यातील भाजपचं वजनदार नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. मंडई परिसारातून त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या सोबतच 2019 मध्ये त्यांनी पुण्याच्या भाजपच्या शहराध्यक्ष पदाची धुरा सांभाळली होती.
कोणत्या आमदारांची लागेल मंत्रीपदी वर्णी?
शिंदे सरकाराच्या या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातून दादा भुसे, गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे, उदय सामंत, अब्दुल सत्तार, शंभुराजे देसाई, राजेंद्र यड्राव्हकर, संजय राठोड यांची यांची मंत्रीपदी वर्णी लागू शकते. यात अब्दुल सत्तार यांच्या नावाचीही चर्चा आहे. मात्र टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तारांच्या मुलींचे नाव समोर आल्यानंतर त्यांची मंत्रीपदी वर्णी लागणार की, नाही हे अद्याप गुलदस्त्यात आहे. तर भाजपकडून चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, प्रवीण दरेकर यांच्यसह काही नवीन चेहऱ्यांना भाजप संधी देऊ शकते.