एक्स्प्लोर
महाराष्ट्र बंद : पुण्यात आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड
महाराष्ट्र बंद : एवढंच नाही तर या संपूर्ण घटनेचं वृत्तांकन करणाऱ्या मीडियाच्या प्रतिनिधींनाही धक्काबुक्की केली. तसंच आंदोलकांनी एबीपी माझाच्या कॅमेऱ्यावर हात ठेवून वृत्तांकन रोखण्याचा प्रयत्न केला.
पुणे : सकल मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाला पुण्यात हिंसक वळण लागलं. आंदोलन संपल्यानंतर आंदोलकांनी आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड केली. तसंच आंदोलकांनी भिंतीवर चढून घोषणाबाजी दिल्या. भिंतीवरील दिवेही फोडले. एवढंच नाही तर या संपूर्ण घटनेचं वृत्तांकन करणाऱ्या मीडियाच्या प्रतिनिधींनाही धक्काबुक्की केली. तसंच आंदोलकांनी एबीपी माझाच्या कॅमेऱ्यावर हात ठेवून वृत्तांकन रोखण्याचा प्रयत्न केला.
दुपारी एक-सव्वा एकच्या सुमारास मराठा क्रांती मोर्चाचे आयोजक राजेंद्र कोंढरे, शांताराम कुंजीर, तुषार काकडे हे निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्याच्या पाचव्या मजल्यावरील कार्यालयात निघाले. मात्र आंदोलनातील एका गटाची मागणी होती की जिल्हाधिकाऱ्यांनी खाली येऊन निवेदन स्वीकारावे. आयोजकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आणि त्यानंतर खाली तोडफोड सुरु झाली.
"जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी खाली येऊन निवेदन स्वीकारावं, अशी मागणी आम्ही केली होती. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी यास नकार दिल्याने तोडफोड केल्याचा दावा मराठा आंदोलकांनी केला होता.
मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी हा आरोप फेटाळला आहे. "निवदेन स्वीकारल्यानंतर आंदोलक हिंसक झाले आणि त्यानंतर तोडफोड केली," असं स्पष्टीकरण जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं. जिल्हाधिकारी म्हणाले की, "निवेदन कसं देणार याबाबत आधीच चर्चा झाली होती. त्यानुसार रितसर निवेदन स्वीकारलं. ऑफिसमध्ये 30 ते 40 जण आले आणि निवेदन दिलं. मी हे निवेदन मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवेन असंही आंदोलकांना सांगितलं. यावेळी सर्व परिस्थिती सुरळीत होती. पण त्यामधील काही जणांनी क्षणातच तोडफोडीला सुरुवात केली."
"खाली येऊन निवेदन घ्या, अशी मागणी कोणीही केली नव्हती. मी त्यांच्या सतत संपर्कात होतं. मी निवेदन स्वीकारलं नाही, हे चुकीचं आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे," असंही जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी सांगितलं.
आंदोलकांचा एक गट अजूनही कार्यालयाबाहेरच्या भिंतीवर चढून आहे. मराठा समन्वयकांकडून आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतु आंदोलकांचा आक्रमक पवित्रा कायम आहे. पुण्याचे सहआयुक्त घटनास्थळी दाखल झाले असून आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र बंद क्रांती दिनाचं औचित्य साधून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. मराठा आरक्षणासाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मराठा आंदोलकांनी बंद पुकारला आहे. मात्र 'महाराष्ट्र बंद'साठी सकल क्रांती मराठा समाजाची आचारसंहिता आंदोलकांनी काही ठिकाणी भंग केल्याचं चित्र आहे. 'महाराष्ट्र बंद'साठी सकल मराठा समाजाची आचारसंहिता - बंद हा शांततेच्या मार्गाने असला पाहिजे - कोणत्याही शासकीय वा खाजगी मालमतेची तोडफोड अथवा मोडतोड करु नये - मराठा समाजाने आपापले विभाग कडकडीत बंद करायचे - कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणे आपली जबाबदारी आहे - पोलिस प्रशासनला सहकार्य करा - बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत - अफवांवर विश्वास ठेवू नका - मराठा सेवकांनी शांत राहून अॅक्शन प्लॅन तयार करायचा आहे - बंद असा करायचा की पुढच्या वर्षी फक्त क्रांती दिन नाही तर "मराठा क्रांती दिन" असं नमूद केलं पाहिजे कुठे कुठे इंटरनेट बंद? महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून अनेक जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. सोशल मीडियाद्वारे अफवा पसरु नये यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे, कोल्हापूर, सांगली, पंढरपूर, औरंगाबाद इथली इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे. नवी मुंबई, ठाण्यात बंद नाही आजच्या महाराष्ट्र बंदमध्ये मुंबईचा समावेश असला, तरी नवी मुंबई आणि ठाण्यातील मराठा समाज सहभागी होणार नाही. मराठा समाज समन्वयक आणि पोलिसांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. वारंवार नागरिकांना वेठीस धरणं योग्य नसल्याचं सांगून नवी मुंबई आणि ठाण्यातील मराठा संघटनांनी बंदमधून माघार घेतली आहे. या ठिकाणी बंदऐवजी ठिय्या करुन निषेध नोंदवला जाणार आहे. अनेक शाळांना सुट्टी मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यातील अनेक शाळांनी महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. काही दिवसांपूर्वीच शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सुट्टीचा निर्णय मुख्याध्यापकांकडे सोपवला होता. यानुसार काही शाळांच्या मुख्याध्यापकांनी हा निर्णय घेतला आहे. मात्र आजच्या बंदमधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलं आहे. त्यामुळं दूध आणि वैद्यकीय सेवा नेहमीप्रमाणे सुरु राहतील. मराठा आंदोलकांच्या मागण्या मराठा समाजाला आरक्षण द्यावं, आरक्षण जाहीर होईपर्यंत मेगा भरती स्थगित करावी, कोपर्डी बलात्कारातील आरोपींना फाशी द्यावी या प्रमुख मागण्यात मराठा आंदोलकांच्या आहेत. त्यापैकी मेगा भरती स्थगित करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 ऑगस्ट रोजी केली.पुण्यात मराठा मोर्चाकडून जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड https://t.co/ebW9gbS23K
— ABP माझा (@abpmajhatv) August 9, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement