Pune Murder : मध्यरात्री रस्त्यात अडवलं अन् सपासाप वार केले; पुण्यातील कोथरुडमध्ये मध्यरात्री हत्येचा थरार
शरद मोहोळांच्या हत्येनंतर पुन्हा एकदा पुण्यातील कोथरुड परिसर चांगलाच चर्चेत आला आहे. कोथरुड परिसरात चार ते पाच जणांच्या कोयता गॅंगच्या टोळक्याकडून हत्येचा थरार घडला.
पुणे : पुण्यात गुन्हेगारी काही थांबायचं नाव घेत नाही आहे. अनेक परिसरात दहशत पसरवण्याचं काम तर अनेक ठिकाणी किरकोळ कारणावरुन कोयते हल्ले करुन हत्या करण्याच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे. अशीच एक घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. शरद मोहोळांच्या हत्येनंतर पुन्हा एकदा पुण्यातील कोथरुड परिसर चांगलाच चर्चेत आला आहे. कोथरुड परिसरात चार ते पाच जणांच्या कोयता गॅंगच्या टोळक्याकडून हत्येचा थरार पाहायला मिळाला. कोयत्याने वार करत 22 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
पुण्यातील कोथरूड परिसरात गुरुवारी मध्यरात्री एका तरुणाची कोयत्याने वार करत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. श्रीनिवास शंकर वत्सलावर (वय 22, राहणार लक्ष्मी नगर डहाणूकर कॉलनी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे कोथरुड परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. श्रीनिवास हा रात्री त्याच्या मित्रासोबत घरी निघाला होता. कर्वे नगर परिसरातील गांधी चौकात पाच सहा जणांच्या टोळीने त्याला आणि त्याच्या मित्राला अडवलं आणि त्यांच्यावर जोरदार वार करायला सुरुवात केली.
हा सगळा प्रकार पाहून श्रीनिवासचा मित्र पळून गेला. यावेळी श्रीनिवासवर जोरदार वार करण्यात आले. वार एवढे जोरात होते. की श्रीनिवास रस्त्यातच रक्ताच्या थारोळ्यात पडला. रात्र असल्याने फार रहदारी नव्हती मात्र तरीही काही आजूबाजूच्या लोकांनी श्रीनिवासला पाहून त्यांची मदत केली आणि त्याला जवळच्या खासगी दवाखान्यात दाखल केलं. मात्र त्यापूर्वीच श्रीनिवासचा जीव गेला होता. याबाबतचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत अलंकार पोलीस स्टेशन येथे सुरू होती.
हल्ल्याचं कारण अस्पष्ट
कोयताघेऊन तरुणांनी श्रीनिवासवर हल्ला केला. रात्रीच्यावेळी हल्ला केल्याने संशय व्यक्त केला जात आहे. हा हल्ला नेमका कशामुळे केला असावा, असा प्रश्न निर्माण केला जात आहे. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे. प्रेमसंबंधाचं प्रकरण होतं का?, किंवा कोणासोबत काही भांडणं होती का? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. रात्र त्याच्यासोबत असलेल्या मित्राकडूनदेखील पोलीस सखोल चौकशी करत आहेत. पोलिसांच्या तपासातून हल्लेमागचं कारण लवकरच स्पष्ट होईल.
ही बातमी वाचा:
- Travel : रिमझिम पाऊस..निसर्गसौंदर्य अन् बेभान मन! पावसाळ्यात महाराष्ट्रातील 'ही' ठिकाणं पाहाल, तर सगळं टेन्शन विसराल..
- महाराष्ट्रात अवकाळी पावसाचं धूमशान! पुढील तीन दिवसांसाठी यलो अलर्ट, मुंबई, ठाण्यातही बरसणार
- Mahayuti Sabha at Shivaji Park : उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी मोदी-राज एकत्र येणार; शिवाजी पार्कवर आज ऐतिहासिक सभा!