एक्स्प्लोर

Pooja Khedkar : पोलिस अॅक्शन मोडमध्ये! पोलिसांचं पथक बंगल्यावर दाखल; खेडकर पती-पत्नी गायब, 7 जणांवर गुन्हा दाखल

Pooja Khedkar : पौड पोलिसांच्या मदतीने खेडकर कुटुंबाचा शोध घेतला जात आहे. मोबाईल फोन देखील ऑफ असल्याचं पोलीसांनी म्हटलं आहे.

पुणे: राज्यासह देशभरात चर्चेत आलेली वादग्रस्त ट्रेनी आयएएस आधिकारी पूजा खेडकर आणि कुटुंबिय यांच्यावर (IAS Probationers Pooja Khedkar) पोलिसांनी कारवाईला सूरूवात केली आहे. पोलिसांनी त्यांच्या घराबाहेर नोटीसा लावल्या आहेत, जेव्हा पोलिस त्यांच्या घरी कारवाईसाठी बाणेर भागातील बंगल्यात पोहोचले तेव्हा तिथे कोणीच नसल्याचं आढळून आलं आहे. त्याचबरोबर खेडकर कुटुंबाचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरु करण्यात आला असून खेडकर कुटुंबाशी संपर्क होत नसल्याचं पुणे पोलिसांनी म्हटलं आहे. खेडकर कुटुंब आणि त्यांच्यासह गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सात जणांचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथके तयार केली आहेत. 

पौड पोलिसांच्या मदतीने खेडकर कुटुंबाचा शोध घेतला जात आहे. या सर्वांचे मोबाईल फोन देखील स्वीच ऑफ असल्याचं पोलीसांनी म्हटलं आहे. पुणे पोलिसांनी रविवारी खेडकर कुटुंबाच्या पुण्यातील बाणेर भागातील बंगल्यात जाऊन तपासण्याचा प्रयत्न केला. मात्र बंगल्याचे गेट बंद असल्याचे आढळूनआल्यानंतर पोलिसांनी या बंगल्याचे चित्रीकरण केले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांचे पथक खेडकर यांच्या बंगल्यावर पोहोचले मात्र तिथे कोणीच नसल्याचं निदर्शनास आल्यानंतर त्यांचा शोध घेण्यात येत आहे. त्यांचे फोन देखील बंद आहेत, त्यांचा ठावठिकाणा लागत नाही असंही पोलिसांनी म्हटलं आहे.

मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांना पोलिसांनी चौकशीसाठी उपस्थित राहावं असं म्हटलं होतं, पण ते दोघेही चौकशीसाठी गैरहजर राहिले. गेल्या दोनदिवसांपासून पुणे पोलिस त्यांच्या बंगल्यावरती जात आहेत मात्र तिथेही कोणीही नसल्याचं निदर्शनास आलं आहे. 

याबाबत माहिती देताना पोलिस म्हणाले, आम्ही त्यांचा शोध घेत आहोत. त्यांचे मोबाईल देखील बंद आहेत. ते सापडल्यानंतर आम्ही कायदेशीर कारवाई करू. जो गुन्हा झाला आहे त्याबाबत आम्ही त्यांना काही प्रश्न विचारून माहिती घेऊ. एकूण 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील काहीचे मोबाईल नंबर आमच्याकडे नाहीत. त्या सर्वांचा शोध सुरू आहे. आम्ही त्यांचा शोध घेत आहोत.

खेडकर कुटुंबीयांचे पंकजा मुंडेंशी राजकीय संबंध? मुंडे प्रतिष्ठानला 12 लाखांची देणगी

खेडकर कुटुंबीयांचे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासोबत संबंध असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. 
पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान या ट्रस्टला मनोरमा खेडकर यांनी 12 लाख रुपयांची देणगी दिल्याचं समोर आलं आहे. तीन ऑक्टोबर 2023 ला चेकद्वारे ही देणगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी, यासाठी दिलीप खेडकर यांनी पाथर्डीमधील मोहटा देवीला चांदीचा मुकुट देखील अर्पण केला होता. तसेच, दिलीप खेडकर यांचे भाऊ माणिक खेडकर हे पाच वर्षे भाजपचे पाथर्डी तालुका अध्यक्ष राहिलेले आहेत.

 

खेडकर कुटुंबीयांशी संपर्क होईना 

खेडकर कुटुंबाचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला आहे. खेडकर कुटुंबाशी संपर्क होत नसल्याचं पुणे पोलिसांचं म्हणणं आहे. खेडकर कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सात जणांचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथकं तयार केली आहेत. पौड पोलिसांचं एक पथक खेडकर यांच्या घरी आज येऊन गेल्याची माहिती पौड पोलिसांनी दिली आहे. 

मनोरमा खेडकर यांच्यावर पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने पौड पोलिसांचं एक पथक बाणेर रस्त्यावर असलेल्या खेडकर यांच्या घराची पाहणी करून गेलं. खेडकर कुटुंबानं कुठलाही प्रतिसाद न दिल्यानं पोलीस निघून गेले. त्यामुळे पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मनोरमा खेडकर यांनी पिस्टल ने शेतकऱ्यांना धमकावण्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर पौड पोलिसांनी मनोरमा खेडकर यांच्यासह काही जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पौड पोलीस यासंदर्भात मनोरमा खेडकर यांची चौकशी करण्यासाठी आले होते. त्यामुळे आता पोलीस पुढील काय कारवाई करणार हे पाहवं लागेल. 

दरम्यान, वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रशिक्षण काळात बदल करण्यात आला आहे. तसेच, आठवडाभर वाशिम जिल्ह्यात वनविभाग आणि वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात  प्रशिक्षणाचा काळ घालवावा लागणार आहे.                       

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत व्हीएसआर कंपनीचा मालक सीआयडीच्या अधिकाऱ्यांना म्हणाला, 'माझी चूक असेल, तर मला...'
अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत व्हीएसआर कंपनीचा मालक सीआयडीच्या अधिकाऱ्यांना म्हणाला, 'माझी चूक असेल, तर मला...'
Israel-Iran War Affect India: युद्धाची भारतातील लघुउद्योगांनाही झळ, उत्पादन निम्म घटलं; साडे सात हजार कंपन्यांना फटका?
युद्धाची भारतातील लघुउद्योगांनाही झळ, उत्पादन निम्म घटलं; साडे सात हजार कंपन्यांना फटका?
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
2019 च्या मिस इंडिया स्पर्धेतील सुंदरीचं शुद्धीकरण, पुण्यातील सायलीची हिंदू धर्मात वापसी; खासदार-आमदारांची उपस्थिती
2019 च्या मिस इंडिया स्पर्धेतील सुंदरीचं शुद्धीकरण, पुण्यातील सायलीची हिंदू धर्मात वापसी; खासदार-आमदारांची उपस्थिती

व्हिडीओ

BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangola News: दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
Buldhana Crime: तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Shots Fired At Pop Star Rihanna Home: सुप्रसिद्ध गायिकेच्या घरावर 10 राउंड फायरिंग; संशयित महिलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सुप्रसिद्ध गायिकेच्या घरावर 10 राउंड फायरिंग; संशयित महिलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Maharashtra Live blog updates: नागपूरमध्ये म्हशीच्या हल्ल्यात वृद्ध व्यक्तीचे निधन
Maharashtra Live blog updates: नागपूरमध्ये म्हशीच्या हल्ल्यात वृद्ध व्यक्तीचे निधन
Embed widget