एक्स्प्लोर

Pune Khadakwasla Dam: खडकवासला धरणाचे दरवाजे उघडले, पाण्याच्या प्रचंड लोंढ्यात कुत्रा वाहून गेला, स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला पण...

Pune Khadakwasla Dam: शहर परिसरातील पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला धरणांच्या पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. तर खडकवासला धरणातून सुरू केलेल्या विसर्गाचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

पुणे: राज्यात सर्वत्र पावसाचा जोर दिसून येत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये आज देखील मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पुणे (Pune Rain) जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील (Dam) पाणीसाठ्यांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. तर आज खडकवासला धरणातून (Khadakwasla Dam) पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. शहर परिसरातील पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला धरणांच्या (Khadakwasla Dam) पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. तर खडकवासला धरणातून सुरू केलेल्या विसर्गाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर पाण्याच्या प्रवाहासोबतच एक कुत्रा देखील वाहत जाताना दिसत आहे. 

पाण्याचा प्रवाहासोबत एक कुत्रा वाहतानाचा व्हिडिओ समोर आला. त्यानंतर पुढे तो पाण्याचा वेग कमी झाल्यावर काठावर आला असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण (Khadakwasla Dam) 88.53 टक्के भरले आहे. खडकवासला धरण (Khadakwasla Dam) साखळीत गेल्या 24 तासांत दीड टीएमसीची भर पडली आहे. मुठा - पानशेत खोयासह रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील घाटमाथ्यावर मंगळवारी सकाळपासून मुसळधार पाऊस पडल्यानं धरण साखळीत वाढ झाल्याचं दिसून येत आहे. खडकवासला धरणात मंगळवारी सायंकाळी पाच वाजता 88.53 टक्के पाणीसाठा झाला होता.

कोणत्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

वरसगाव-  50.66 टक्के
पानशेत- 64.64 टक्के
टेमघर- 44.41 टक्के
खडकवासला-88.63 टक्के

लोणावळ्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, रस्त्यांना नदीचं स्वरूप

पर्यटननगरी लोणावळ्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. या पावसाने सखल भागात पाणी साचलेलं आहे. तर रस्त्यांवर पाणीचं पाणी झाल्यानं, रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं आहे. त्यामुळं स्थानिकांची मोठी तारांबळ उडाली आहे. शर्थीचे प्रयत्न करत, चाकरमानी कार्यालयात पोहचत आहेत. गेल्या चोवीस तासांमध्ये पावसाने तुफान बॅटिंग केली आहे, चोवीस तासांत या मोसमातील उच्चांकी पाऊस बरसला आहे. तब्बल 275 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे.

पुणे शहर परिसरात सोमवारपासून पाऊस सुरूच

आठवड्याच्या सुरूवातीला म्हणजेच सोमवारी रात्रीपासून शहर परिसरात संततधार पावसाला सुरुवात झाली. मंगळवारी रात्रीपर्यंत पाऊस सुरू होता. पावसाची संततधार सुरूच राहिल्याने जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झालेले दिसून आले. शहरातील मध्य भागात पावसाचा (Pune Rain) काहीसा जोर दिसून आला, तर  शिवाजीनगर परिसरात 24 तासांत सरासरी 15.5, तर चिंचवडमध्ये 39 मिमी पावसाची नोंद झाली आहे. शहरातील चारही धरणांत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

मान्सून सुरू झाल्यापासून पुणे शहर परिसरात पहिल्यांदाच चोवीस तास पावसाची संततधार सुरू होती. पावसाचा जोर कमी असल्याने सोमवारी 11.5, तर मंगळवारी 4.5, असा 24 तासांत एकूण 15 मिमी पाऊस शिवाजीनगर भागात झाला.

जिल्ह्यात 24 तासांतील पाऊस 

 लोणावळा 134, लवासा 134, निमगिरी 58, चिंचवड 39.5, माळीण 34.5, खेड 25.5, तळेगाव 23, एनडीए 21, राजगुरुनगर 17, वडगाव शेरी 14, दापोडी 13.5, पाषाण 12.2, शिवाजीनगर - 15, तळेदाव ढमढेरे 7, हडपसर 6.5.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Embed widget