एक्स्प्लोर

Kasba By-election Results 2023 : पहिल्या फेरीपासून कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर आघाडीवर; भाजपची धाकधूक वाढली

ही जनतेची आघाडी आहे. जनतेचा माझ्यावर विश्वास आहे. त्यामुळे ते मतांच्या रुपात आपल्याला दिसत आहे, असं रविंद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे भाजपचे हेमंत रासने हे शंकर महाराज समाधी मठात ध्यानाला बसले आहे. 

Kasba By-election Results 2023 : कसबा आणि चिंचवड (Pune Bypoll Election) पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. कसब्यात कांटे की टक्कर बघायला मिळत आहे. कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीपासून आघाडीवर आहेत. सातव्या फेरीपर्यंत रवींद्र धंगेकर आघाडीवर आहेत. ही जनतेची आघाडी आहे. जनतेचा माझ्यावर विश्वास आहे. त्यामुळे ते मतांच्या रुपात आपल्याला दिसत आहे, असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे भाजपचे हेमंत रासने हे शंकर महाराज समाधी मठात ध्यानाला बसले आहेत. 

रवींद्र धंगेकर यांना विजयाचा विश्वास

मतमोजणीला जाण्यापूर्वी कसब्याचे कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचं त्यांच्या पत्नीने औक्षण केलं. घरातील देवाच्या पायापडून त्यांनी मतमोजणीच्या दिवसाची सुरुवात केली आहे. आज मीच विजयी होणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. काही वेळातच ते पुण्याचं ग्रामदैवत कसबा गणपतीचं दर्शन घेऊन ते सगळ्या कार्यकर्त्यांसोबत चहापान करत आहे. मला काहीही टेन्शन नाही आहे. आज मीच बाजी मारणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मतपेटीत मतांचा पाऊस, 20 हजारांपेक्षा जास्त मताधिक्याने विजय मिळवेन : रवींद्र धंगेकर

ज्या दिवशी फॉर्म भरला त्याचदिवशी माझा विजय झाला होता. यामुळे भाजप आणि शिंदे गटाने लाखो रुपयांचा पाऊस पाडला. मतपेटीत मतांचा पाऊस पडत आहे. 30 वर्ष जनतेने मला मुलासारखं सांभाळलं. हेमंत रासने यांच्याकडे कमळाचं चिन्ह होतं म्हणून ते निवडून येत होते. चिन्हाशिवाय ते शून्य आहेत, अशी प्रतिक्रिया काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी दिली. तसंच मी 20 हजार मताधिक्याने विजय मिळवेन, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भाजपची धाकधूक वाढली

पुण्याच्या पेठांमधूनदेखील रवींद्र धंगेकरांना आघाडी मिळाल्यानंतर भाजपची धाकधूक वाढली आहे. शनिवार पेठ आणि बाकी काही पेठांवर भाजपच्या हेमंत रासने यांचं वर्चस्व आहे. मात्र याच भागातून धंगेकर यांनी आघाडी घेतल्याने भाजपचं टेन्शन काही प्रमाणात वाढलं आहे. हेमंत रासने पिछाडीवर असल्याने शंकर महाराज समाधी मठात ध्यानाला बसले. समाधी मंदिरात आल्यानंतर तिसऱ्या चौथ्या फेरीत रासने यांनी आघडी घेतली होती. त्यानंतरच्या फेरीत ते पिछाडीवर आहे. एकीकडे मतमोजणी सुरू दुसरीकडे रासने यांचे देवदर्शन सुरू असल्याचं दिसत आहे.

भाजपचा गड धंगेकर राखणार?

कसबा पेठेतील भाजपचं वर्चस्व असलेल्या सदाशिव पेठे, नारायण पेठ आणि शनिवार पेठेत जनतेचे भाजपला डावलल्याचं दिसत आहे. त्यामुळे या भागातही धंगेकरांनाच जास्त मतं मिळाली आहे. हेमंत रासने यांनी या सगळ्या परिसरात कायम काम केलं आहे. तिथल्या मतदारांचा त्यांना पाठिंबा असतो. मात्र त्याच भागात जनतेने भाजपला पाठिंबा न दिल्याचं दिसत आहे. त्यामुळे भाजपचा गड धंगेकर राखतील असं म्हटलं जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Pune Jamavbandi: पुण्यात आज मध्यरात्रीपासून 14 दिवसांसाठी जमावबंदी लागू; पुणे पोलिसांनी घेतला मोठा निर्णय, कारणही आलं समोर
पुण्यात आज मध्यरात्रीपासून 14 दिवसांसाठी जमावबंदी लागू; पुणे पोलिसांनी घेतला मोठा निर्णय, कारणही आलं समोर
Pune Crime News: नात्यातील महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवला; पुण्यातून अपहरण, सांगलीत संपवले, तपासानंतर पोलिसही चक्रावले!
नात्यातील महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवला; पुण्यातून अपहरण, सांगलीत संपवले, तपासानंतर पोलिसही चक्रावले!
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget