(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune News: पुण्यात खळबळजनक घडामोड, कमला नेहरू हॉस्पिटलमधून रुग्णांना तातडीने बाहेर काढलं, बांगलादेशी तरुण शिरल्याचा संशय
Pune News: पुण्यातील कमला नेहरू रूग्णालयात बांगलादेशी तरुण या रुग्णालयात शिरल्याचा पोलिसांना संशय असल्याची माहिती समोर आली आहे.
Pune News: पुण्यातील कमला नेहरू रूग्णालयात (Kamla Nehru Hospital) बांगलादेशी तरुण या रुग्णालयात शिरल्याचा पोलिसांना संशय असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस कमला नेहरू रूग्णालयात (Kamla Nehru Hospital) दाखल झाले. खबरदारीचा उपाय म्हणून रूग्णांना बाहेर काढण्यात आलं आहे. बांगलादेशी तरुण रूग्णालयात शिरल्याचा संशय पोलिस व्यक्त करत आहेत. तरूण या रूग्णालयात कसा शिरला याचा तपास सुरू आहे.
यामध्ये आढलेला संशियत ताब्यात घेण्यात आलेला हा तरुण बिहारचा असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील हॉस्पिटलमध्ये तो रक्ताची चाचणी करण्यासाठी आला होता अशी माहिती समोर आली आहे. कमला नेहरू रुग्णालयात (Kamla Nehru Hospital) तो रक्ताची चाचणी करण्यासाठी आला होता असं त्याने पोलिसांना सांगितले आहे. त्याच्याकडे सध्या आधार कार्ड सापडले असून पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू आहे. आज(बुधवारी) सकाळी 11 वाजता पोलिसांना एक फोन आला आणि एक संशयित तरुण कमला नेहरू रुग्णालयात आल्याचे सांगितले गेले.
रूग्णालयात आत्तापर्यंत 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिस त्यांची चौकशी करत आहेत. त्या ठिकाणी 4 बांगलादेशी तरुण शिरल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. त्यांच्याकडे पोलिसांना बांगलादेशी कागदपत्रे मिळाली आहे. त्यामुळे सखोल चौकशी सुरू आहे.