Pune Crime News : ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरी मोठा दरोडा; 25 लाखांचे दागिने लंपास
Pune Crime news : ख्रिसमस साजरा (pune) करण्यासाठी रात्री घराबाहेर पडलेल्या (theft) कुटुंबियांच्या घरात मोठा दरोडा पडला आहे. यात चोरांनी 25 लाख रुपयांचे (pune crime) दागिने लंपास केले आहे.
Pune Crime news : ख्रिसमस साजरा (pune) करण्यासाठी रात्री घराबाहेर पडलेल्या कुटुंबियांच्या घरात मोठा दरोडा (Robbery) पडला आहे. यात चोरांनी 25 लाख रुपयांचे (pune crime) दागिने लंपास केले आहेत. यात सोने, हिऱ्यांचे दागिन्यांचा समावेश आहे. त्यासोबतच 12 हजार रुपयांची रोकडही चोरट्यांनी लंपास केली. (Crime news) या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील महंमदवादी परिसरातील एक कुटुंब रात्री ख्रिसमसचं सेलिब्रेशन करण्यासाठी पुण्यातील चर्चमध्ये गेलं होतं. ते रात्री नऊच्या सुमारास ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला घरातून बाहेर पडले होते. त्यांच्या बंगल्यावर चोर नजर ठेवून होते. कुटुंबीय घराबाहेर पडताच चोरांनी बेडरुमच्या खिडकीच्या दोन लोखंडी जाळ्या तोडून घरात प्रवेश केला. त्यांच्या घरातील सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने लंपास केले. घरात असलेली 12 हजार रुपयांची रोकडदेखील या चोरांनी लंपास केली. मध्यरात्री ख्रिसमस सेलिब्रेशन झाल्यानंतर कुटुंबीय घरी परतले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
सीसीटीव्ही तपास सुरु
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या घटनेची माहिती घेतली. चोरांनी बेडरुमच्या दोन खिडकांच्या जाळ्या तोडून चोरी केल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं. पोलिसांचं तपास पथक निवासी सोसायटीच्या परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज चेक करत आहे. या प्रकरणातील चोरांना लवकरात लवकर जेरबंद करु, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
यंदा ख्रिसमस जोरात साजरा
कोरोनानंतर निर्बंधमुक्त ख्रिसमस साजरा झाला. पुण्यात ख्रिश्चन धर्माच्या नागरिकांची संख्या मोठी आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात ख्रिसमस साजरा केला जातो. यावर्षीही अनेक ख्रिश्चन धर्मीय लोक उत्साहाने ख्रिसमस साजरा करण्यासाठी पुण्यातील कॅम्प, एमजी रोज परिसरात एकत्र आले होते. पुण्यात अनेक प्राचीन चर्च आहेत. या चर्चमध्ये रात्री बारा वाजता शेकडो नागरिक एकत्र येत जल्लोष करतात.
चोरीच्या घटनेत वाढ
पुण्यात सध्या गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे. त्यात हत्या, बलात्कार आणि सायबर क्राईमसोबतच चोरीच्या घटनेतदेखील वाढ झाली आहे. रोज नवी शक्कल लढवून चोरी केल्याच्या घटना समोर येतात. त्यामुळे पुण्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दोन दिवसांपूर्वी लोहेगाव परिसरात चोरीची घटना समोर आली होती. यात चोरांनी 3 लाख 15 हजार रुपयांचे दागिने लंपास केले होते. लोहेगाव परिसरात 40 वर्षीय महिलेच्या घरात ही चोरी करण्यात आली होती, असं लोहगाव पोलिसांनी सांगितलं आहे.