एक्स्प्लोर
लोणावळ्यात आयटीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
प्रतिकने तो राहत असलेल्या राजगड हॉस्टेलमध्ये गळफास घेतला. हे हॉस्टेल सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातच आहे.

प्रातिनिधीक फोटो
पुणे : लोणावळ्यातील सिंहगड महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. प्रतिक वरपे असे विद्यार्थ्यांचं नाव आहे. तो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत होता.
प्रतिकने तो राहत असलेल्या राजगड हॉस्टेलमध्ये गळफास घेतला. हे हॉस्टेल सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातच आहे.
राजगड हॉस्टेलमध्ये प्रतिक इतर तीन मित्रांसोबत तो राहत होता. एकजण गावी सुट्टीला गेला होता, तर दोघे सकाळी सव्वा नऊच्या सुमारास नाश्ता करायला बाहेर पडले होते. तेव्हा प्रतिकने गळफास घेत जीवनयात्रा संपवली.
नाश्त्याला गेलेले मित्र परत आल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला.
प्रतिक हा मूळचा पुण्याच्या नारायणगाव येथील रहिवाशी आहे.
प्रतिकच्या आत्महत्येचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी प्रतिकचे कुटुंबीय आणि मित्रांकडे विचारपूस करण्यास सुरुवात केली आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
कोल्हापूर
महाराष्ट्र
क्राईम























