एक्स्प्लोर
सचिन अग्रवाल न सापडायला तो काय दाऊद आहे का? : अजित पवार

पुणे : ‘आपलं घर’ योजनेतून पाच लाखांत घर देण्याचं स्वप्न दाखवणारा मेपल ग्रुपचा सचिन अग्रवाल सापडत नाही, म्हणजे तो काय दाऊद आहे का? असा सवाल करत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. दरम्यान, पाच लाखात पुण्यात घराचं स्वप्न दाखवून लोकांचे पैसे उकळून पसार झालेल्या सचिन अग्रवालचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला आहे. सचिन अग्रवालनं पुणे कोर्टाच अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र कोर्टानं जामीन अर्ज फेटाळला आहे. मेपलच्या जाहिरातीत पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचा फोटो वापरणं ही गंभीर बाब असल्याच म्हणत कोर्टानं जामीन अर्ज फेटाळला आहे. दरम्यान, मेपलचा संचालक सचिन अग्रवाल अजूनही फरार आहे.
आणखी वाचा























