एक्स्प्लोर
आंतरजातीय प्रेमाला विरोध : तरुणीला धमकावणाऱ्या काकाविरोधात गुन्हा दाखल, हायकोर्टात याचिका दाखल केल्यानंतर कारवाई
आंतरजातीय प्रेमप्रकरणाला विरोध करणाऱ्या जन्मदात्या माता पित्यांकडूनच जीवाला धोका असल्याचा आरोप करत 19 वर्षीय प्रियंका शेटेनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हायकोर्टानं या याचिकेची दखल घेत तळेगाव पोलिसांना मुलीची रितसर तक्रार नोंदवून तिच्या सुरक्षेचे उपाय करण्याचे निर्देश दिले होते.
![आंतरजातीय प्रेमाला विरोध : तरुणीला धमकावणाऱ्या काकाविरोधात गुन्हा दाखल, हायकोर्टात याचिका दाखल केल्यानंतर कारवाई Inter caste Love Priyanka Shete case, Talegaon MIDC police lodge FIR आंतरजातीय प्रेमाला विरोध : तरुणीला धमकावणाऱ्या काकाविरोधात गुन्हा दाखल, हायकोर्टात याचिका दाखल केल्यानंतर कारवाई](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/05/07135014/Pune-Girl.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : पुण्यातील धाडसी तरूणी प्रियंका शेटेला देशी पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावणाऱ्या तिच्या काकांविरोधात अखेर तळेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच याप्रकरणी तिच्या आईवडीलांसह इतर नातेवाईकांविरोधात चौकशीनंतर कारवाई केली जाईल असं आश्वासनही पोलिसांनी प्रियंकाला दिलं आहे.
आंतरजातीय प्रेमप्रकरणाला विरोध करणाऱ्या जन्मदात्या माता पित्यांकडूनच जीवाला धोका असल्याचा आरोप करत 19 वर्षीय प्रियंका शेटेनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हायकोर्टानं या याचिकेची दखल घेत तळेगाव पोलिसांना मुलीची रितसर तक्रार नोंदवून तिच्या सुरक्षेचे उपाय करण्याचे निर्देश दिले होते.
पुण्यातील तळेगावानजीक नवलाख उंबरे या गावात राहणाऱ्या प्रियंका शेटे या महाविद्यालयीन तरुणीनं स्वतःचा आणि प्रियकराचा जीव वाचविण्याची मागणी करत अॅड. नितीन सातपुते यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. तरुणीचे दुसऱ्या जातीतील विराज अवघडे या युवकावर प्रेम आहे.
या प्रेमसंबंधांना आणि लग्नाला तिच्या आई-वडिलांचा आणि इतर नातेवाईकांचा विरोध आहे. लग्न केले तर नातेवाईकांकडून आपल्या आणि प्रियकराच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती प्रियंकानं या याचिकेत व्यक्त केली आहे. या प्रकरणी घरच्यांच्या त्रासाला कंटाळून प्रियंकानं एकदा आत्महत्येचा प्रयत्नही केला आहे.
'संबंधित तरुण गरीब असला तरी त्याच्या बरोबर मी सुखी राहीन आणि सज्ञान असल्याने मला कोणा बरोबर राहायचे याचा निर्णय घेण्याचे अधिकार आहे', असं या याचिकेतून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आई-वडिल आणि अन्य नातेवाईकांकडून संरक्षण मिळावे, आणि मनाप्रमाणे जगण्याचा मूलभूत अधिकार मिळावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. तसेच तिला घरामध्ये डांबून ठेवणाऱ्यांवरही तातडीनं कारवाई करावी, अशी मागणीही याचिकेतून करण्यात आली आहे.
VIDEO | अहमदनगरमध्ये 'सैराट'ची पुनरावृत्ती, आंतरजातीय विवाह केल्याने मुलगी आणि जावयाला पेटवलं | एबीपी माझा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)