पिंपरीत एका दिवसात दोन आगीच्या घटना, पाच जखमी
सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र एका घटनेत पाच जण जखमी झाले आहे.
पिंपरी-चिंचवड : पिंपरीत रात्रीपासून दोन आगीच्या घटना समोर आल्या आहे. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र एका घटनेत पाच जण जखमी झाले आहे.
पिंपरी-चिंचवडच्या कासारवडवली परिसरात सोमवारी सकाळी गॅस लीक झाल्याने एका घरात स्फोट झाला. घराचा दरवाजा, खिडकी बंद असल्याने गॅस बाहेर जाण्यात जागा नसल्याने हा स्फोट झाला. या स्फोटात घरातील पाच जण जखमी झाले असून सर्वांवर यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
घरातील सर्व जण झोपेत असताना ही घटना घडली. त्यामुळे घरातून लवकर बाहेर पडणे त्यांना शक्य झालं नाही. या स्फोटात घराचं मोठं नुकसान झालं आहे.
तर दुसरीकडे पिंपरी चिंचवडच्या कुदळवाडीत रविवारी रात्री आगीच्या घटनेत नऊ ते दहा भंगारीची दुकानं जळून खाक झाली आहेत. दुकानात प्लास्टिक आणि रबरचे साहित्य अधिक असल्यानेच आगीने रौद्ररुप धारण केल्याचा अंदाज अग्निशमन दलाने वर्तवला.