Omicron Variant : पिंपरी-चिंचवडमध्ये ओमायक्रॉनचा विळखा, दैनंदिन तपासणीतही आढळत आहेत रुग्ण
पिंपरी चिंचवडमध्ये ओमायक्रोनचा धोका मागील काही दिवसांपासून वाढत असल्याचं दिसून येत आहे. दैनंदिन तपासणीत रुग्ण आढळू लागले आहेत.
![Omicron Variant : पिंपरी-चिंचवडमध्ये ओमायक्रॉनचा विळखा, दैनंदिन तपासणीतही आढळत आहेत रुग्ण In Pimpri-Chinchwad, as the graph of omicron increases, patients are being examined on a daily basis Omicron Variant : पिंपरी-चिंचवडमध्ये ओमायक्रॉनचा विळखा, दैनंदिन तपासणीतही आढळत आहेत रुग्ण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/02/3dfb7186897ff037f8c1768386ec63e0_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पिंपरी चिंचवड : मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे (Omicron Variant) रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) देखील ओमयक्रॉनचा आलेख विळखा वाढू लागला आहे. आता सलग दुसऱ्या दिवशी रुटीन चेकअपमध्ये अर्थात दैनंदिन तपासणीत ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. हे रुग्ण परदेशातून आलेल्या ओमायक्रॉन रुग्णांच्या संपर्कात आले नसूनही त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
आतापर्यंत पिंपरी चिंचवडमध्ये 5, शनिवारी 2 त्याआधी एक असे एकूण 8 रुग्ण दैनंदिन तपासणीमध्ये आढळून आले आहेत. त्यामुळे शहरात ओमायक्रॉन पाय पसरत असल्याने प्रशासनासह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहेत. पिंपरी चिंचवड शहरात आत्तापर्यंत एकूण 33 ओमायक्रोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यापैकी 8 हे रुटीन चेकअपमध्ये आढळले असून आतापर्यंत 16 रुग्णांनी ओमायक्रॉन वर मात केली आहे.
राज्यात कुठे किती ओमायक्रॉन रुग्ण?
अ.क्र. |
जिल्हा /मनपा |
आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण |
१ |
मुंबई |
३२७* |
२ |
पिंपरी चिंचवड |
३३ |
३ |
पुणे ग्रामीण |
२१ |
४ |
पुणे मनपा |
१३ |
५ |
ठाणे मनपा |
१२ |
६ |
नवी मुंबई, पनवेल |
प्रत्येकी ८ |
७ |
कल्याण डोंबिवली |
७ |
८ |
नागपूर आणि सातारा |
प्रत्येकी ६ |
९ |
उस्मानाबाद |
५ |
१० |
वसई विरार |
४ |
११ |
नांदेड |
३ |
१२ |
औरंगाबाद, बुलढाणा, भिवंडी निजामपूर मनपा, मीरा भाईंदर |
प्रत्येकी २ |
१३ |
लातूर, अहमदनगर, अकोला, कोल्हापूर |
प्रत्येकी १ |
|
एकूण |
४६० |
महत्वाच्या बातम्या
- Mumbai Corona : मुख्यमंत्र्यांच्या आवाहनास शिवसैनिकांकडूनच हरताळ; मालवणी जत्रोत्सवात तुफान गर्दी, कोरोना नियमांची ऐशीतैशी
- Video : राष्ट्रवादी काँग्रेसच्या डान्स स्पर्धेत कोरोना नियमांचा फज्जा, व्हिडीओ व्हायरल
- पहिल्याच दिवशी CoWIN वर अडीच लाखांहून अधिक मुलांची नोंदणी, 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटासाठी लसीकरणाला सुरुवात
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)