एक्स्प्लोर

पहिल्याच दिवशी CoWIN वर अडीच लाखांहून अधिक मुलांची नोंदणी, 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटासाठी लसीकरणाला सुरुवात

Corona Vaccination For Children : देशात येत्या 3 जानेवारीपासून 15 ते 18 या वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होणार असून त्यासाठी कोविन (CoWIN) अ‍ॅपवर नोंदणी करावी लागणार आहे. 

मुंबई : देशातील 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना 3 जानेवारीपासून कोरोनाची लस दिली जाणार आहे. यासाठी आजपासून कोविन (CoWIN) अ‍ॅपवर नोंदणी सुरु झाली आहे. या वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी नाव नोंदणीला भरघोस प्रतिसाद मिळाला  असून पहिल्याच दिवशी तब्बल अडीच लाखांहून जास्त नोंदणी करण्यात आली आहे. देशातील 15 ते 18 वर्षांच्या मुलांना लस देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर त्याची तयारी प्रशासनानं पूर्ण केली आहे. 

ज्या मुलांचा जन्म 2007 किंवा त्यापूर्वी झाला आहे अशी मुलं या लसीकरणासाठी पात्र ठरणार आहेत. CoWIN पोर्टलवर आपला COVID-19 वॅक्सिन स्लॉट बुक करण्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्या आयकार्डचा वापर करावा लागणार आहे. ज्या मुलांकडे आधार कार्ड नसेल त्यांच्या लसीकरणात अडथळा येऊ नये म्हणून आयकार्डचा वापर करण्याचा पर्याय केंद्राकडून अंमलात आणण्यात आला आहे. भारत सरकारनं 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी दोन लसींना मंजुरी दिली आहे. भारत बायोटेकची कोवॅक्सिन लसीचे दोन डोस आणि Zydus Cadila's ZyCoV-D चे तीन डोस या लसींमधून पर्याय निवडावा लागणार आहे. 

लसीसाठी कोविन पोर्टलवर नोंदणी कशी कराल?

  • कोविनच्या वेबसाईटवरून किंवा कोविन अॅपवरून लसीकरणासाठी नोंदणी करणं बंधनकारक आहे. जेणेकरून लसीकरण केंद्र, तारीख, वेळ इत्यादी माहिती तुम्हाला आधीच कळवलं जाईल.
  • नोंदणीसाठी  https://www.cowin.gov.in/home या वेबसाईटवर जा.
  • वेबसाईट उघडल्यानंतर उजव्या कोपऱ्यातील Register / Sign in yourself  या पिवळ्या रंगाच्या बटणावर क्लिक करा.
  • त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर विचारला जाईल आणि त्यावर OTP येईल. तो OTP टाकल्यानंतर नवीन विंडो उघडेल.
  • त्यानंतर Register for Vaccination ची विंडो दिसेल. फोटो आयडी प्रूफ, फोटो आयडी नंबर, नाव, जन्मतारीख, लिंग आणि सहव्याधी इत्यादी माहिती इथे तुम्हाला द्यावी लागेल. त्यानंतर Register पर्यायावर क्लिक करा.
  • तुम्हाला अकाऊंट डिटेल्स दिसतील. एका मोबाईल नंबरच्या नोंदणीत तुम्हाला तीन जणांसाठी लसीकरणाची नोंद करता येऊ शकते. त्यासाठी Add या पर्यायावर क्लिक करून पुढील नावं आणि त्यांची माहिती समाविष्ट करता येईल. एखादं नाव डिलिट करण्याचाही पर्याय देण्यात आला आहे.
  • लसीकरणासाठी तुम्हाला नोंदणी करण्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्र स्लॉट बुक करावा लागेल.
  • पिन कोड टाकल्यानंतर तुम्हाला तिथल्या लसीकरण केंद्रांची यादी दिसेल.
  • तुम्ही जिल्हावार किंवा तुमच्या शहरानुसार यादीही शोधू शकता.
  • तुम्हाला एखाद्या लसीकरण केंद्रावर स्लॉट उपलब्ध आहेत वा नाहीत, हे दिसेल. स्लॉट्स उपलब्ध असल्यास ते कोणत्या वयोगटासाठी आहेत, कोणती लस उपलब्ध आहे, हे देखील तुम्हाला स्क्रीनवर दिसेल.
    तुमच्या वयोगटासाठी हा स्लॉट उपलब्ध असल्यास तुम्ही तो बुक करू शकता. तसा मेसेज तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर येईल.

लहान मुलांच्या लसीकरणासाठी 1 हजार 500 व्यक्तींच्या स्टाफला प्रशिक्षण देण्यात आलंय. दरम्यान, खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनाही प्रशिक्षण देण्यात आलंय. महत्वाचं म्हणजे, लसीकरणानंतर लहान मुलांना काही रिअॅक्शन झालं तर यापूर्वीच उभारलेल्या पेडिएट्रीक वॉर्डचा वापर करण्यात येईल. लहान मुलांच्या लसीकरणाकरताही महापालिका जनजागृती मोहिम हातात घेईल. प्रायोगिक तत्वावर ज्या लहान मुलांना आतापर्यंत लसी देण्यात आल्या आहेत त्यांच्यावर कोणतेही गंभीर रिअॅक्शन झाली नसल्याची माहिती आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्वारगेट बसमधील बलात्कार घटनेचा अहवाला आला, मंत्री प्रताप सरनाईकांनी विधानसभेत सांगितला
स्वारगेट बसमधील बलात्कार घटनेचा अहवाला आला, मंत्री प्रताप सरनाईकांनी विधानसभेत सांगितला
Pakistan Train Hijack आधी स्फोट, नंतर रेल्वेचं अपहरण; पाकिस्तान 'जाफर एक्सप्रेस हायजॅक' करतानाचा व्हिडिओ अन् फोटो समोर
आधी स्फोट, नंतर रेल्वेचं अपहरण; पाकिस्तान 'जाफर एक्सप्रेस हायजॅक' करतानाचा व्हिडिओ अन् फोटो समोर
Video: 50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून कमी होणार; भास्कर जाधवांचा दावा, विधानसभेतच मांडलं गणित
Video: 50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून कमी होणार; भास्कर जाधवांचा दावा, विधानसभेतच मांडलं गणित
पुणे महापालिकेची मोठी कारवाई; पुण्यातील सिंहगड कॉलेजच्या 50 मिळकती जप्त, एकाचा लिलाव होणार?
पुणे महापालिकेची मोठी कारवाई; पुण्यातील सिंहगड कॉलेजच्या 50 मिळकती जप्त, एकाचा लिलाव होणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 8  PM TOP Headlines 8 PM 11 March 2025Job Majha | भारतीय नौदलात नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा? शैक्षणिक पात्रता काय?Jayant Patil : दादांना शरण गेल्याशिवाय मंत्र्यांना  पर्याय नाही, मी जुना खेळाडू आहे ...तर कपात  होणाSunil Shinde Statement On Walmik Karad : वाल्मिक कराडचे 'कर्म'काडं उघड, अवादा कंपनीच्या सुनील शिंदेंच्या जबाबात काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्वारगेट बसमधील बलात्कार घटनेचा अहवाला आला, मंत्री प्रताप सरनाईकांनी विधानसभेत सांगितला
स्वारगेट बसमधील बलात्कार घटनेचा अहवाला आला, मंत्री प्रताप सरनाईकांनी विधानसभेत सांगितला
Pakistan Train Hijack आधी स्फोट, नंतर रेल्वेचं अपहरण; पाकिस्तान 'जाफर एक्सप्रेस हायजॅक' करतानाचा व्हिडिओ अन् फोटो समोर
आधी स्फोट, नंतर रेल्वेचं अपहरण; पाकिस्तान 'जाफर एक्सप्रेस हायजॅक' करतानाचा व्हिडिओ अन् फोटो समोर
Video: 50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून कमी होणार; भास्कर जाधवांचा दावा, विधानसभेतच मांडलं गणित
Video: 50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून कमी होणार; भास्कर जाधवांचा दावा, विधानसभेतच मांडलं गणित
पुणे महापालिकेची मोठी कारवाई; पुण्यातील सिंहगड कॉलेजच्या 50 मिळकती जप्त, एकाचा लिलाव होणार?
पुणे महापालिकेची मोठी कारवाई; पुण्यातील सिंहगड कॉलेजच्या 50 मिळकती जप्त, एकाचा लिलाव होणार?
बीडनंतर आता लातूर; 5 जणांकडून एकास भररस्त्यात बेदम मारहाण, प्रकृती गंभीर; व्हिडिओ व्हायरल
बीडनंतर आता लातूर; 5 जणांकडून एकास भररस्त्यात बेदम मारहाण, प्रकृती गंभीर; व्हिडिओ व्हायरल
मोठी बातमी : विधानपरिषदेसाठी भाजपची तीन नावं ठरली, माधव भंडारींचं नाव दिल्लीला पाठवलं, अन्य दोन नावंही समोर!
मोठी बातमी : विधानपरिषदेसाठी भाजपची तीन नावं ठरली, माधव भंडारींचं नाव दिल्लीला पाठवलं, अन्य दोन नावंही समोर!
भाषणात बोललेलं खरं असतं का, निवडणुकीत 10 कोटी खर्चल्याच्या मुद्द्यावरुन बीडच्या आमदराचा यु-टर्न
भाषणात बोललेलं खरं असतं का, निवडणुकीत 10 कोटी खर्चल्याच्या मुद्द्यावरुन बीडच्या आमदराचा यु-टर्न
उध्दव ठाकरेंना ग्रामपंचायतीचा अभ्यास नाही, ते बजेट काय सांगणार? रामदास कदमांचा हल्लाबोल 
उध्दव ठाकरेंना ग्रामपंचायतीचा अभ्यास नाही, ते बजेट काय सांगणार? रामदास कदमांचा हल्लाबोल 
Embed widget