एक्स्प्लोर
Pune Hording : पिंपरीच्या मोशीत सुसाट्याच्या वाऱ्यानं होर्डिंग कोसळलं, गाड्यांचं मोठं नुकसान, सुदैवाने जिवीतहानी नाही!
मुंबईतील घाटकोपरची होर्डिंग पडल्याची घटना ताजी असताना आता पिंपरी- चिंचवड शहरातील मोशी येथे रस्त्याच्या कडेला असणारे लोखंडी होर्डिंग कोसळले आहे.
पुणे : मुंबईतील घाटकोपरची होर्डिंग पडल्याची घटना ताजी असताना आता पिंपरी- चिंचवड शहरातील मोशी येथे रस्त्याच्या कडेला असणारे लोखंडी होर्डिंग कोसळले आहे. मोशीत दुपारी साडेचारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह शहरातील काही भागात पाऊस झाला त्यात सोसाट्याचा वारा आल्याने हे होर्डिंग थेट कोसळलं.
सुदैवाने यात कुणीही जखमी किंवा जीविहितहानी झालेली नाही. मोशीतील वादळी वाऱ्याने जय गणेश साम्राज्य चौक येथील रस्त्यालगत असलेले भले मोठे लोखंडी होर्डिंग कोसळले आहे. यात चार दुचाकी आणि टेम्पोच नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे. सुदैवाने हे होर्डिंग रस्त्यावर कोसळले नसल्याने वाहतुकीला कोणतीची अडचण निर्माण झाली नाही.
मागील वर्षी एप्रिल महिन्यात अशाच प्रकारचं होर्डिंग कोसळल्याची घटना घडली होती. त्यात पाच जणांचा जीव गेला होता. त्यानंतर पिंपरी-चिंचवडच्या महापालिका प्रशासनाकडून वेळोवेळी अनधिकृत होर्डिंगची माहिती घेतली जात होती. मात्र त्यावर किती कारवाई केली याची कोणतीही माहिती समोर आली नाही. त्यासोबत आता घाटकोपरमध्ये झालेल्या घटनेनंतरही पिंपरी-चिंचवड महापालिका होर्डिंगची पाहणी करत असल्याचं सांगते आहे. मात्र अनधिकृत होर्डिंगवर कारवाई होताना दिसत नाही आहे.
पुण्यातील होर्डिंगची पाहणी
मुंबईतील होर्डिंग दुर्घटनेनंतर पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी आज पुण्यातील होर्डिंग्जची पाहणी केली आणि नियमबाह्य पद्धतीने उभारण्यात आलेल्या हार्डिंग्जवर कारवाई करण्याचे आदेश दिले . पुणे महापालिकेच्या हद्दीत दोन हजार एकोणपन्नास अधिकृत होर्डिंग्ज आहेत . या होर्डिग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट महापालिकेकडून करण्यात येते . मात्र तरीही धोकादायक वाटणाऱ्या होर्डींग्जवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. पाच वर्षांपूर्वी पुण्यातील मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकात रेल्वेच्या जागेत अनधिकृतपणे उभारलेलं होर्डिंग कोसळून तिघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर रेल्वेच्या जागेतील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यात आली. तेव्हापासून रेल्वे प्रशासनाकडून स्वतः च्या जागेत स्वतः होर्डिंग उभारून ती भाड्याने दिली जातात.
इतर महत्वाची बातमी-
बंगळुरूत 'यलो अलर्ट'; संपूर्ण आठवडाभर वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा, मुंबईतील परिस्थिती काय?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
क्राईम
विश्व
Advertisement