एक्स्प्लोर

Guillain Barre Syndrome : पुण्यात जीबीएसची रूग्णसंख्या शंभरी पार; 17 रुग्ण व्हेंटिलेटरवर, केंद्र अलर्ट, पुण्याला पाठवले तज्ज्ञांचे पथक

Guillain Barre Syndrome : गेल्या आठ दिवसात गुलेन बॅरी सिंड्रोम रुग्णांची संख्या शंभरी पार गेल्याने महानगरपालिका मोठ्या प्रमाणावर उपायोजना करत आहे.

पुणे: पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) आजारांच्या रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. रूग्णांचा आकडा शंभरी पार गेला आहे. पुण्यातील एकूण जीबीएस रुग्णांची संख्या रविवारी 111 वर पोहोचली असून त्यात 68 पुरुष आणि 33 महिलांचा समावेश आहे. यापैकी 17 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.  याबाबतची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे. 1500 हून अधिक घराचं निरीक्षण करण्यात आलं आहे. गेल्या आठ दिवसात गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) रुग्णांची संख्या शंभरी पार गेल्याने महानगरपालिका मोठ्या प्रमाणावर उपायोजना करत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोमवारी सात जणांच्या तज्ज्ञांचे पथक राज्यात तैनात केले आहे. हे पथक वाढत्या रुग्णसंख्येचे निरीक्षण आणि व्यवस्थापन करण्यासाठी राज्य सरकारला मदत करणार आहे.

एकीकडे रुग्ण गंभीर होताना दिसत आहेत तर  दुसरीकडे आरोग्यमंत्री रुग्णांना थोडाफार त्रास होत असल्याचं सांगत आहेत. दरम्यान गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome)च्या रूग्णांवर कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार केले जाणार आहेत. पण एका रुग्णाला आजारातून बर होण्यासाठी किमान एका महिन्याचा कालावधी लागत आहे. त्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. 50 बेड पुरेसे पडतील का? सोबतच महापालिका अजून कोणत्या रुग्णालयात रुग्णांसाठी सोय करणार का? असे अनेक प्रश्न सध्या नागरिकांकडून उपस्थित होत आहेत.

गुलेन बॅरी सिंड्रोमच्या रूग्णाचा पिंपरीत मृत्यू

गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) ची (जीबी सिंड्रोम) लागण झालेल्या एका 64 वर्षीय महिलेचा संत तुकारामनगर येथील महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. या महिलेला जीबी सिंड्रोमची लागण झाली असली तरी, तिचा मृत्यू न्यूमोनिया या आजाराने झाला असल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी सांगितले आहे.

संबंधित महिलेला पिंपरीतील खासगी रुग्णालयामध्ये 17 नोव्हेंबरला दाखल केले होते. तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर 24 नोव्हेंबरला डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयामध्ये हलवण्यात आले. तिला न्यूमोनियाचा त्रास होता. आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. त्यानंतर 29 डिसेंबरला तिला वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं. दाखल करताना फुप्फुसामध्ये मोठ्या प्रमाणावर इन्फेक्शन पसरलेले होते. त्यामध्ये जीबी सिंड्रोमची लागण झाली होती.

काय काळजी घ्यावी

पाणी उकळून व गाळून प्यावे.
उघड्यावरील व शिळे अन्न खाणे टाळावे.
अचानकपणे हातापायाच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा जवळील शासकीय रुग्णालयात जावे.

कॅम्पिलोबॅक्टरमुळे जीबीएस कसा होतो?

दूषित पाणी किंवा अन्न खाल्यावर कॅम्पिलोबॅक्टर जेजुनीचा संसर्ग होऊ शकतो.
संसर्गामुळे अतिसार आणि ओटीपोटात वेदना होऊ शकतात.
काही व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती मज्जातंतूंना लक्ष्य करते. ज्यामुळे १ ते ३ आठवड्यांच्या आत जीबीएसचे निदान होते.
याशिवाय, डेंग्यू, चिकनगुनियाचे विषाणू किंवा इतर बॅक्टेरियाच्या संक्रमणामुळे मज्जातंतूंविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती हल्ला करते.

कॅम्पिलोबॅक्टर संसर्गाची लक्षणे

अतिसार
पोटदुखी
ताप
मळमळ किंवा उलट्या

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

शिवानी पांढरे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari: 'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
Gaja Marne: कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
Jain Muni Nilesh Chandra Maha Katta: 'पण तुम्ही चापट मारणार असाल, तर आम्ही मारवाडी...' जैन मुनी निलेश चंद्र राज ठाकरेंना मराठीच्या वादावर काय काय म्हणाले?
Video: 'पण तुम्ही चापट मारणार असाल, तर आम्ही मारवाडी...' जैन मुनी निलेश चंद्र राज ठाकरेंना मराठीच्या वादावर काय काय म्हणाले?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahayuti Politics : महायुतीचा सस्पेन्स, शिंदेंचा डिफेन्स! रविंद्र चव्हाणांच्या विधानाचं गूढ वाढलं! Special Report
Mahayuti Politics : 50 खोके, महायुतीत खटके, राजकारणात काढली एकमेकांची कुंडली Special Report
Yash Birla Majha Maha Katta : शाळेत वडील मर्सिडीजमध्ये सोडायचे, पण मी गाडी शाळेच्या बाहेर थांबवायचो
Yash Birla Majha Maha Katta : विमानातून प्रवास करताना सुट-बूट का घालायचं? -यश बिर्ला
Anup Jalota Majha Katta : अनुप जलोटा-पंकज उदास यांची गाण्यातून सेवा, कॅन्सर पेशंटला मदत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari: 'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
Gaja Marne: कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
Jain Muni Nilesh Chandra Maha Katta: 'पण तुम्ही चापट मारणार असाल, तर आम्ही मारवाडी...' जैन मुनी निलेश चंद्र राज ठाकरेंना मराठीच्या वादावर काय काय म्हणाले?
Video: 'पण तुम्ही चापट मारणार असाल, तर आम्ही मारवाडी...' जैन मुनी निलेश चंद्र राज ठाकरेंना मराठीच्या वादावर काय काय म्हणाले?
Video : हातात पेट्रोल घेऊन आला, बाॅयफ्रेंडनं नर्स गर्लफ्रेंडसमोर स्वतःला पेटवलं, जळत्या अवस्थेत रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारल्यानंतही जिवंत जळत राहिला
Video : हातात पेट्रोल घेऊन आला, बाॅयफ्रेंडनं नर्स गर्लफ्रेंडसमोर स्वतःला पेटवलं, जळत्या अवस्थेत रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारल्यानंतही जिवंत जळत राहिला
SMAT : अभिषेक शर्माला दोनदा बाद केलं, अंशुल कंबोजनं करुन दाखवलं, सुपर ओव्हरमध्ये हरियाणाचा पंजाबवर रोमांचक विजय
अभिषेक शर्माला दोनदा बाद केलं, अंशुल कंबोजनं करुन दाखवलं, सुपर ओव्हरमध्ये हरियाणाचा पंजाबवर विजय
Ramraje Naik Nimbalkar :  प्रोटोकॉल बाजूला ठेवून आलो,  मी कोणत्या पार्टीत यावर मुंबईत चर्चा होईल, त्यांना एकच सांगेन... : रामराजे नाईक निंबाळकर
मी कोणत्या पार्टीत यावर मुंबईत चर्चा होईल, त्यांना एकच सांगेन... : रामराजे नाईक निंबाळकर
Imran Khan: इम्रान खान जिवंत आहे की नाही? पहिल्यांदा पुरावे द्या! मुलाचा पाकिस्तानात आक्रोश, पोलिसांनी समर्थक मुख्यमंत्र्याला रस्त्यात चोपलं
Video: इम्रान खान जिवंत आहे की नाही? पहिल्यांदा पुरावे द्या! मुलाचा पाकिस्तानात आक्रोश, पोलिसांनी समर्थक मुख्यमंत्र्याला रस्त्यात चोपलं
Embed widget