(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा! पुण्यात अजित पवार, हर्षवर्धन पाटील यांची प्रतिष्ठा पणाला
पुणे जिल्ह्यात 231 ग्रामपंचायतीसाठी आज मतदान होत आहे. त्यापैकी 37 ग्रामपंचायतींची निवडणूक पूर्णपणे बिनविरोध पार पडली. या निवडणुकीत अजित पवार, हर्षवर्धन पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
पुणे : पुणे जिल्ह्यात 231 ग्रामपंचायतीसाठी आज मतदान होत आहे. त्यापैकी 37 ग्रामपंचायतींची निवडणूक पूर्णपणे बिनविरोध पार पडली. तर 231 ग्रामपंचायत पैकी 49 ग्रामपंचायत मध्ये सरपंच बिनविरोध निवडले गेलेत याचा अर्थ 231 पैकी बारा ग्रामपंचायती अशा आहेत ज्या ग्रामपंचायतमध्ये फक्त सदस्यांच्या निवडीसाठी मतदान होणार आहे. त्यांचे सरपंच हे बिनविरोध निवडले गेले.
पुणे जिल्ह्यातील इंटरेस्टिंग लढतींमध्ये बारामतीच्या काटेवाडी ग्रामपंचायतचा समावेश होतो. अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांचे मतदान काटेवाडी ग्रामपंचायतमध्ये आहे. या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पॅनलच्या विरोधात भारतीय जनता पक्षाकडून पॅनेल निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आले. मात्र, तब्येतीच्या कारणास्तव अजित पवार या ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाला येण्याची शक्यता कमी आहे. मात्र, त्यांचं कुटुंबीय मतदान करणार आहे.
शेजारच्या इंदापूर तालुक्यामध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे मतदान बावडा ग्रामपंचायतमध्ये आहे. त्या ठिकाणी देखील हर्षवर्धन पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आंबेगाव ग्रामपंचायत मध्ये खासदार अमोल कोल्हे यांचे मतदान आहे. मात्र अमोल कोल्हे देखील तब्येतीच्या कारणास्तव मतदानाला येणार नाहीत. या ठिकाणी ही ग्रामपंचायत कोण जिंकेल?, याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.
त्यानंतर खेड तालुक्यात आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे मतदान त्यांच्या सेल पिंपळगाव गावातील ग्रामपंचायतमध्ये आहे. ही ग्रामपंचायत आमदार दिलीप मोहिते जिंकणार का? याकडे पुणे जिल्ह्याचे लक्ष असेल. याशिवाय भोर मुळशी मावळ या पुणे जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये प्रतिष्ठानला लागलेली असेल.पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात किती ग्रामपंचायतीसाठी लढत?
पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात किती ग्रामपंचायतीसाठी लढत?
-भोर – 46ग्रामपंचायती
-खेड - 46ग्रामपंचायती
-आंबेगाव – 44 ग्रामपंचायती
-जुन्नर – 41 ग्रामपंचायती
-बारामती - 32 ग्रामपंचायती
-दौंड – 16 ग्रामपंचायती
-शिरूर – 16 ग्रामपंचायती
-इंदापूर - 14 ग्रामपंचायती
-हवेली – 14 ग्रामपंचायती
-वेल्हे – 31 ग्रामपंचायती
-मावळ – ३१ ग्रामपंचायती
-पुरंदर – 22 ग्रामपंचायती
-मुळशी – 37 ग्रामपंचायती
विजयासाठी जादुटोण्याचा प्रकार
पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील नारायणगावमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत(Pune Crime News) धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. चक्क ग्रामपंचायत निवडणुकीच्या उमेदवारांच्या फोटोला काळी, बाहुली, लिंबू टाचण्या टोचून जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. ग्रामपंचायत निवडणुकीत जादूटोण्याचा वापर केल्याने याबाबत चिड व्यक्त केली जात आहे.
इतर महत्वाची बातमी-
पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात किती ग्रामपंचायतीसाठी लढत?