एक्स्प्लोर
गर्भाशय प्रत्यारोपणातून कन्येचा जन्म, आशियातील पहिला चमत्कार पुण्यात
गर्भाशय प्रत्यारोपण शास्त्रक्रियेनंतर देशातीलच नव्हे, तर आशिया खंडातील पहिल्या बाळाचा पुण्यात जन्म झालाय. त्यामुळे भारताच्या वैद्यकीय क्षेत्रात इतिहास घडलाय.

पुणे : भारतातील पाहिल्या गर्भाशय प्रत्यारोपणानंतर गर्भवती असलेल्या महिलेची प्रसूती झालीय. या महिलेला मुलगी झाली. गर्भाशय प्रत्यारोपणानंतर जन्मलेलं हे देशातील पहिलेच बाळ आहे. पुण्यातील गॅलॅक्सी केअर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सिझेरियन करुन प्रसूती केली. 12 वाजून 12 मिनिटांनी बाळाचा जन्म झाला. बाळाचं वजन 1400 ग्रॅम आहे. गर्भाशय प्रत्यारोपण शास्त्रक्रियेनंतर देशातीलच नव्हे, तर आशिया खंडातील पहिल्या बाळाचा पुण्यात जन्म झालाय. त्यामुळे भारताच्या वैद्यकीय क्षेत्रात इतिहास घडलाय. 18 मे 2017 रोजी पुण्यातल्या गॅलेक्सी केअर हॉस्पिटलमधल्या 17 डॉक्टरांच्या टीमने इतिहास घडवला आणि भारतातली पहिली गर्भाशय प्रत्यारोपणाची यशस्वीपणे पार पाडली होती. गर्भाशय अशक्त असल्यामुळे मिनलला (नाव बदलले आहे) गर्भधारणा होत नव्हती. मात्र गर्भशाय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिला ही अनुभूती घेता आली. पुण्यातील गॅलेक्सी केअर हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या टीममुळे तिचं स्वप्न प्रत्यक्षात अवतरलंय.
विशेष म्हणजे, जगातील अशा प्रकारचं फक्त नववं बाळ असल्याचा दावाही रुग्णालयाकडून करण्यात आलाय. मिनल आणि रमेशने गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. पण पुढचा प्रश्न होता तो म्हणजे की, गर्भाशय दान कोण करणार? मग मिनलचीच आई पुढे आली आणि तिने आपल्या मुलीला गर्भाशय दान केलं होतं. ज्या गर्भशयात मिनल वाढली, त्याच गर्भाशयात आता मिनलचं बाळही वाढत आहे. गॅलेक्सी केअर हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉ. शैलेश पुणतांबेकर यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या टीमने हे देशातलं पहिलं गर्भशय प्रत्यारोपण यशस्वी करुन दाखवण्याचं आव्हान लीलया पेललं होतं. आयव्हीएफ या तंत्राच्या सहाय्याने हे शक्य झालं.
विशेष म्हणजे, जगातील अशा प्रकारचं फक्त नववं बाळ असल्याचा दावाही रुग्णालयाकडून करण्यात आलाय. मिनल आणि रमेशने गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. पण पुढचा प्रश्न होता तो म्हणजे की, गर्भाशय दान कोण करणार? मग मिनलचीच आई पुढे आली आणि तिने आपल्या मुलीला गर्भाशय दान केलं होतं. ज्या गर्भशयात मिनल वाढली, त्याच गर्भाशयात आता मिनलचं बाळही वाढत आहे. गॅलेक्सी केअर हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉ. शैलेश पुणतांबेकर यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या टीमने हे देशातलं पहिलं गर्भशय प्रत्यारोपण यशस्वी करुन दाखवण्याचं आव्हान लीलया पेललं होतं. आयव्हीएफ या तंत्राच्या सहाय्याने हे शक्य झालं. आणखी वाचा























