एक्स्प्लोर

Ghotawade Phata Pune Fire : पुण्याच्या आगीतील मृतकांच्या परिवाराला राज्य सरकारकडून पाच तर केंद्राकडून दोन लाख रुपयांची मदत

पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. जखमी व्यक्तींना 50,000 रुपये भरपाई देण्यात येणार आहे.

पुणे : पुण्यातील घोटावडे फाटा येथील कंपनीला भीषण आग लागली आहे. या आगीत 18 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून एक कर्मचारी बेपत्ता आहे. आग लागली त्यावेळी कंपनी 37 कर्मचारी होते त्यापैकी 18 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल, अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. तर पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. जखमी व्यक्तींना 50,000 रुपये भरपाई देण्यात येणार आहे.

पवार म्हणाले, अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी बचावासाठी शर्थीचे प्रयत्न करुनही काहींना वाचवता आलं नाही, हे अधिक दु:खदायक आहे. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांबद्दल सहानुभूती असून मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल.

मुळशी दुर्घटनेसंदर्भात अधिक माहिती देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आग विझली असली तरी कुलींग ऑपरेशन सुरु आहे. ते पूर्ण झाल्यानंतर आगीचं प्राथमिक कारण कळू शकेल. मावळ प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील तज्ञांच्या समितीकडून आगीच्या कारणांची चौकशी करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्या चौकशीतून आगीची नेमकी कारणे कळतील व दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करता येईल. या आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल व स्थानिक प्रशासन तात्काळ घटनास्थळी पोहचलं होतं. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिसप्रमुख, पीएमआरडीए आयुक्तांकडून यासंदर्भत अधिकची माहिती घेतल्यानंतर त्यांनाही तात्काळ दुर्घटनास्थळी पोहचून आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. 

जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थितीची पाहणी करुन चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांच्या आदेशानुसार आगीची चौकशी होईल. पोलिसांनी प्राथमिक गुन्हा नोंदवून घेतला आहे. सद्यस्थितीत आग पूर्णपणे विझवणे आणि जखमींवर उपचारांना प्राधान्य देण्यात दिलं जात आहे. अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नयेत, यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात येतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या :

Ghotawade Phata Pune Fire : पुण्यातील घोटावडे फाट्याजवळील कंपनीला भीषण आग, 18 जणांचा मृत्यू

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News:  बंगला हडपण्यासाठी बिल्डर अजित पवाराने दिली सुपारी, वृद्ध दाम्पत्यावर घडवून आणला हल्ला
बंगला हडपण्यासाठी बिल्डर अजित पवाराने दिली सुपारी, वृद्ध दाम्पत्यावर घडवून आणला हल्ला
Eknath Khadse : एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश नेमका का रखडला? समोर आली मोठी अपडेट
एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश नेमका का रखडला? समोर आली मोठी अपडेट
Pankaja Munde: मुंबईत कोट्यवधीचं घर, सोनं, शेतजमीन;पंकजा मुंडेंच्या संपत्तीत पाच वर्षात 10 कोटी रुपयाची वाढ
मुंबईत कोट्यवधीचं घर, सोनं, शेतजमीन;पंकजा मुंडेंच्या संपत्तीत पाच वर्षात 10 कोटी रुपयाची वाढ
Nashik Lok Sabha : नाशिकच्या जागेवरून महायुतीत नवा ट्विस्ट, आता भाजपकडून थेट प्रीतम मुंडे निवडणुकीच्या रिंगणात?
नाशिकच्या जागेवरून महायुतीत नवा ट्विस्ट, आता भाजपकडून थेट प्रीतम मुंडे निवडणुकीच्या रिंगणात?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Tamannaah Bhatia : अभिनेत्री तमन्ना भाटियाला महाराष्ट्र सायबर सेलकडून समन्सPankaja Munde : पंकजा मुंडेंच्या संपत्तीत पाच वर्षात 10 कोटी रुपयाची वाढ, आता किती संपत्ती?Amit Shah vs Sharad Pawar : अमित शाहांच्या टिकेला शरद पवारांचं प्रत्युत्तरMurlidhar Mohol पुणेकर कर्ज रुपाने मत देतील, मी त्यांच्या अपेक्षा कामातून व्याजासहित पूर्ण करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News:  बंगला हडपण्यासाठी बिल्डर अजित पवाराने दिली सुपारी, वृद्ध दाम्पत्यावर घडवून आणला हल्ला
बंगला हडपण्यासाठी बिल्डर अजित पवाराने दिली सुपारी, वृद्ध दाम्पत्यावर घडवून आणला हल्ला
Eknath Khadse : एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश नेमका का रखडला? समोर आली मोठी अपडेट
एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश नेमका का रखडला? समोर आली मोठी अपडेट
Pankaja Munde: मुंबईत कोट्यवधीचं घर, सोनं, शेतजमीन;पंकजा मुंडेंच्या संपत्तीत पाच वर्षात 10 कोटी रुपयाची वाढ
मुंबईत कोट्यवधीचं घर, सोनं, शेतजमीन;पंकजा मुंडेंच्या संपत्तीत पाच वर्षात 10 कोटी रुपयाची वाढ
Nashik Lok Sabha : नाशिकच्या जागेवरून महायुतीत नवा ट्विस्ट, आता भाजपकडून थेट प्रीतम मुंडे निवडणुकीच्या रिंगणात?
नाशिकच्या जागेवरून महायुतीत नवा ट्विस्ट, आता भाजपकडून थेट प्रीतम मुंडे निवडणुकीच्या रिंगणात?
Ranbir Kapoor :  'अॅनिमल' ते 'रामायण', तीन वर्षात रणबीरचं जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशन; पाहा हैराण करणारे फोटो
'अॅनिमल' ते 'रामायण', तीन वर्षात रणबीरचं जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशन; पाहा हैराण करणारे फोटो
Babil Khan  Irrfan Khan: आता हार मानून बाबाकडे जावं....बाबिल खानच्या मनाच चाललंय काय? चाहत्यांकडून चिंता व्यक्त
आता हार मानून बाबाकडे जावं....बाबिल खानच्या मनाच चाललंय काय? चाहत्यांकडून चिंता व्यक्त
Sandeepan Bhumare EXCLUSIVE : माझे सगळे व्यवहार रेकॉर्डवर, दोन नंबरचे धंदे करत नाही Sambhaji Nagar
Sandeepan Bhumare EXCLUSIVE : माझे सगळे व्यवहार रेकॉर्डवर, दोन नंबरचे धंदे करत नाही Sambhaji Nagar
Tamannaah Bhatia : तमन्ना भाटीयाचीही  2023चं आयपीएल फेअरप्लेवर प्रसारित केल्याच्या प्रकणात चौकशी होणार, महाराष्ट्र सायबर सेलकडून समन्स 
तमन्ना भाटीयाचीही  2023चं आयपीएल फेअरप्लेवर प्रसारित केल्याच्या प्रकणात चौकशी होणार, महाराष्ट्र सायबर सेलकडून समन्स 
Embed widget