एक्स्प्लोर

Ghotawade Phata Pune Fire : पुण्यातील घोटावडे फाट्याजवळील कंपनीला भीषण आग, 18 जणांचा मृत्यू

पुण्यातील घोटावडे फाटा येथील कंपनीला भीषण आग लागली आहे. या आगीत  18 जणांचा मृत्यू झाला आहे. अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीची प्रयत्न सुरू आहे.

पुणे : पुण्यातील घोटावडे फाटा येथील कंपनीला भीषण आग लागली आहे. या आगीत 18 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून एक कर्मचारी बेपत्ता आहे. आग लागली त्यावेळी कंपनी 37 कर्मचारी होते त्यापैकी 18 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे.

आता आग आटोक्यात आली असून कुलिंग आणि कर्मचाऱ्यांच सर्च ऑपरेशन सुरू आहे. आग लागलेली कंपनी ही मुळशीतील उरवडे गावाच्या हद्दीत आहे. आग लागलेली  कंपनीत क्लोरीन क्लोराईड बनवण्याचे काम करण्यात येत होते. क्लोरीन क्लोराईड असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले असावे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. क्लोरीन क्लोराईडचे बॉक्स असल्यानं आग धूमसत गेली आहे. आगीत आतापर्यंत 18 जणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला असून पीएम आरडीए अग्निशमन दलाचे अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी आगीच्या चौकशीसाठी समिती नेमली आहे.  कंपनी मालकाला पोलिसांनी चौकशीसाठी  ताब्यात घेतलं आहे. 

खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत कंपनीत मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, ही घटना अतिशय  दु:खद आणि वेदनादायी आहे. दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. जखमी कर्मचाऱ्यांवर उपचार सुरु असून ते सुखरुप घरी परतावेत ही प्रार्थना. ही घटना समजल्यापासून  सतत पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून त्यांच्याकडून या संपूर्ण घटनेची सातत्याने माहिती घेत आहे.

पुण्याच्या मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी, क्लेशदायक आहे. अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी, बचावासाठी शर्थीचे प्रयत्न करुनही काहींना वाचवता आलं नाही, हे अधिक दु:खदायक आहे. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांबद्दल सहानुभूती असून मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. मुळशी दुर्घटनेसंदर्भात अधिक माहिती देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “आग विझली असली तरी कुलींग ऑपरेशन सुरु आहे. ते पूर्ण झाल्यानंतर आगीचं प्राथमिक कारण कळू शकेल. मावळ प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील तज्ञांच्या समितीकडून आगीच्या कारणांची चौकशी करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

Pune Ganesh Visarjan 2026: पुण्यात गणेश मंडळांची मनमानी, 29 तास उलटूनही मिरवणुका सुरुच, वरिष्ठ पोलीस अधिकारी कानात हेडफोन घालून शांतपणे समोर घडेल ते पाहत राहिले
पुण्यात गणेश मंडळांची मनमानी, 29 तास उलटूनही मिरवणुका सुरुच, वरिष्ठ पोलीस अधिकारी कानात हेडफोन घालून शांतपणे समोर घडेल ते पाहत राहिले
Police Vijay Koli Death: पिंपरी चिंचवड पोलीस दलात खळबळ, कुटुंबात वाद होताच पोलीस कर्मचारी घरातून निघून गेला अन् टोकाचं पाऊल उचललं
पिंपरी चिंचवड पोलीस दलात खळबळ, कुटुंबात वाद होताच पोलीस कर्मचारी घरातून निघून गेला अन् टोकाचं पाऊल उचललं
Ganesh Visarjan Pune 2026 Live: पुण्याची गणेश विसर्जन मिरवणुक उत्साहात सुरू, आतापर्यंत 83 गणेश मंडळे विसर्जनासाठी पोहोचली मुठा नदीच्या घाटावर
Ganesh Visarjan Pune 2026 Live: पुण्याची गणेश विसर्जन मिरवणुक उत्साहात सुरू, आतापर्यंत 83 गणेश मंडळे विसर्जनासाठी पोहोचली मुठा नदीच्या घाटावर
Pune Ganesh Visarjan 2026 : पुण्यातील गणपती मंडळांचा 'हम करे सो कायदा'! रात्री डीजे बंद होताच मिरवणुका जागेवर थांबवल्या, दुसरा दिवस उजाडताच पुन्हा दणदणाट
पुण्यातील गणपती मंडळांचा 'हम करे सो कायदा'! रात्री डीजे बंद होताच मिरवणुका जागेवर थांबवल्या, दुसरा दिवस उजाडताच पुन्हा दणदणाट

व्हिडीओ

Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?
Maharashtra Dushkal Jahir : राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, 75 टक्के दुष्काळ जाहीर
Lalbaug Cha Raja Visarjan : लालबाग राजाच्या विसर्जनाला यंदाही विलंब होणार?
Lalbaugcha Raja Visarjan 2026: नको पुन्हा जाऊ आत्ता, अजून थोडासा थांब ना...; लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारावर आला तेव्हा..., 20 मिनिटांचा VIDEO
Mumbaicha Raja Aarti : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; मिरवणुकीला सुरुवात, कार्यकर्ते भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mamata Banerjee: इकडं नजरकैद केल्याचा ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप, तिकडं तृणमुलच्या आमदारावर चार महिन्यात तिसऱ्यांदा हल्ला, कारवर अंडी फेकली, म्हणाले हे जंगलराज
इकडं नजरकैद केल्याचा ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप, तिकडं तृणमुलच्या आमदारावर चार महिन्यात तिसऱ्यांदा हल्ला, कारवर अंडी फेकली, म्हणाले हे जंगलराज
Asian Games : कबड्डीत भारतानं दुसरं सुवर्णपदक मिळवलं, टीम इंडियाचा अटीतटीच्या लढतीत विजय, 40-34 नं इराणला हरवलं
कबड्डीत भारतानं दुसरं सुवर्णपदक मिळवलं, टीम इंडियाचा अटीतटीच्या लढतीत विजय, 40-34 नं इराणला हरवलं
Mumbai Ganpati Visarjan : मुंबईत विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषणाचे सर्व नियम धुळीस, 'या' भागात नोंदवला गेला सर्वाधिक 107 डेसिबल आवाज!
मुंबईत विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषणाचे सर्व नियम धुळीस, 'या' भागात नोंदवला गेला सर्वाधिक 107 डेसिबल आवाज
Ram Mandir Case: राम मंदिरातील लुटीविरोधात SIT कडून आरोपपत्र दाखल; श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या चंपत राय, अनिल मिश्रा आणि गोपाल राव यांना 'क्लिनचिट'
राम मंदिरातील लुटीविरोधात SIT कडून आरोपपत्र दाखल; श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या चंपत राय, अनिल मिश्रा आणि गोपाल राव यांना 'क्लिनचिट'
Vinod Kambli Viral Video: Video: विनोद कांबळीचा वृद्धाश्रमातील व्हिडिओ व्हायरल; म्हणाला, 'मला इथं आल्यापासून..'
Video: विनोद कांबळीचा वृद्धाश्रमातील व्हिडिओ व्हायरल; म्हणाला, 'मला इथं आल्यापासून..'
Police Vijay Koli Death: पिंपरी चिंचवड पोलीस दलात खळबळ, कुटुंबात वाद होताच पोलीस कर्मचारी घरातून निघून गेला अन् टोकाचं पाऊल उचललं
पिंपरी चिंचवड पोलीस दलात खळबळ, कुटुंबात वाद होताच पोलीस कर्मचारी घरातून निघून गेला अन् टोकाचं पाऊल उचललं
Maharashtra Drought: राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळाच्या घोषणेचा जीआर, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळाच्या घोषणेचा जीआर, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..
Gyanesh Kumar: 'ज्ञानेश कुमारांना पद्मभूषण किरकोळ गोष्ट, थेट पंतप्रधान केलं पाहिजे..' भाजप प्रदेध्याक्षांच्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या पद्मभूषण मागणीवर कोणी केला हल्लाबोल?
'ज्ञानेश कुमारांना पद्मभूषण किरकोळ गोष्ट, थेट पंतप्रधान केलं पाहिजे..' भाजप प्रदेध्याक्षांच्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या पद्मभूषण मागणीवर कोणी केला हल्लाबोल?
Embed widget