एक्स्प्लोर
MIT कॉलेजमध्ये 160 विद्यार्थ्यांना विषबाधा, 16 जण आयसीयूत
अल्पोपहारावेळी गुलाबजाम खाल्याने अधिक त्रास झाल्याचे काहींनी सांगितले. या विद्यार्थ्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पुणे : पुण्यातील लोणी काळभोर येथील एमआयटी महाविद्यालयातील 160 विद्यार्थ्यांना कॅन्टीनमधील जेवणातून विषबाधा झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर तातडीने विद्यार्थ्यांना रुग्णालयात नेण्यात आले. सध्या 80 विद्यार्थ्यांवर विश्वकर्मा रुग्णालयाच्या जनरल वॉर्ड, तर 16 विद्यार्थ्यांवर अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरु आहेत. लोणी काळभोर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर येथील एमआयटी महाविद्यालयातील मॅनेजमेंट विभागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी काल (28 ऑगस्ट) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अल्पोपहार केला. काही वेळानंतर त्यातील काही विद्यार्थ्याना उलट्या आणि जुलाब होण्याचा त्रास झाल्यानंतर त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अल्पोपहारावेळी गुलाबजाम खाल्याने अधिक त्रास झाल्याचे काहींनी सांगितले. या विद्यार्थ्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























