![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
मोठी बातमी! पिंपरी चिंचवडच्या आगीत सहा कामगारांचा होरपळून मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल
Pimpri Chinchwad : ज्वालाग्राही पदार्थ हा बेकायदा वापरला जात होता, याप्रकरणी आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
![मोठी बातमी! पिंपरी चिंचवडच्या आगीत सहा कामगारांचा होरपळून मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल firecracker godown terrible fire in Pimpri Chinchwad Six people died case has been registered against the firecracker factory owner मोठी बातमी! पिंपरी चिंचवडच्या आगीत सहा कामगारांचा होरपळून मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/09/a82a08d833088217efab3d52308c5c5e1702094685561737_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : पिंपरी- चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) तळवडे आगीप्रकरणी (Fire) कारखाना चालक आणि मालक यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभांगी शरद सुतार, शरद सुतार, जन्नत नजीर शिकलगार आणि नजीर अमीर शिकलगार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यापैकी, नजीर अमीर शिकलगार याला देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. तळवडे या ठिकाणी शुक्रवारी तीनच्या सुमारास स्पार्कल कॅण्डल बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागली होती. यात सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला होता, तर 10 जण जखमी आहेत. जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) उपचार सुरू आहेत. विनापरवाना कारखाना त्याचबरोबर कामगारांच्या सुरक्षतेबाबत केलेली तडजोड, स्पार्कल कॅण्डल बनवण्यासाठी वापरण्यात आलेली स्फोटक, ज्वालाग्राही पदार्थ हा बेकायदा वापरला जात होता, याप्रकरणी आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये शुक्रवारी दुपारच्या सुमरास एका फटाक्यांच्या गोदामाला मोठी आग लागल्याची घटना समोर आली होती. या आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला. पिंपरी- चिंचवडमधील तळवडे एमआयडीसीत असलेल्या या फटाक्यांच्या गोदामाला आग लागली होती. दरम्यान, याची माहिती मिळताच काही वेळातच अग्निशमन दलाच्या जवानांना आग आटोक्यात आणली होती. मात्र, तोपर्यंत 6 जणांचा बळी गेला होता. दरम्यान, या प्रकरणात आता पोलिसांनी प्राथमिक चौकशी करत गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे कामगारांच्या सुरक्षतेबाबत देखील तडजोड करण्यात आल्याचे समोर आले आहेत. तर, पोलिसांच्या तपासात आणखी काही माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
अनधिकृत फटाक्याचा कारखाना,
पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक कारखाने अवैधरित्या चालत असल्याचे आरोप नेहमी केले जातात. दरम्यान, फटका गोदामात लगलेल्या भीषण आगीच्या निमित्ताने पुन्हा एकदा अवैधरित्या चालणाऱ्या गोदामाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे आता अशा अवैध कंपन्या किंवा गोदामावर पिंपरी-चिंचवड महापालिका काय कारवाई करणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. विशेष म्हणजे अशा घटना घडल्यावर संबंधित यंत्रणांकडून तात्पुरते पद्धतीने कारवाई होते. मात्र, पुढे पुन्हा या गोष्टींचा विसर पडतो. त्यामुळे किमान यापुढे तरी संबंधित विभागाकडून कारवाई केली जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जखमींची नावं
उषा पाडवी (वय- 40)
कविता राठोड (वय-35)
रेणुका तातोड (वय-20)
कमल चोरे (वय-35)
शरद सुतार (वय-50)
प्रियंका यादव (वय-32)
सुमन राधा (वय-40)
अपेक्षा तोरणे (वय-18)
Pimpri Chinchwad Fire : पिंपरी-चिंचवडमध्ये फटाक्याच्या गोदामाला भीषण आग, सहा जणांचा होरपळून मृत्यू
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)