Pune Crime News : बहीण झाली वैरी! विवाहित बहिणीने केले लहान बहिणीसोबत अश्लील चाळे; पुण्यातील लाजिरवाणी घटना
Pune Crime News: मोठ्या बहिणीनेच लहान बहिणीसोबत अश्लील कृत्य केल्याची घडना घडली आहे. पुण्यातील विमान नगर परिसरात ही घडना घडली आहे.

Pune Crime News : पुण्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ (Pune Crime)होत आहेत. पुण्यातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मोठ्या बहिणीनेच लहान बहिणीसोबत अश्लील कृत्य केल्याची घडना घडली आहे. पुण्यातील विमान नगर (Pune Viman Nagar) परिसरात ही घडना घडली आहे. ही घटना ऐकून पोलीसदेखील चक्रावले आहे. विमानतळ पोलिसांनी मोठ्या बहिणीवर गुन्हा दाखल (Police Filed Case against Sister) केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघीही सख्या बहिणी आहेत. 24 वर्षीय मोठ्या बहिणीने 18 वर्षीय लहान मुलीसोबत अश्लिल कृत्य केलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी 24 वर्षीय मोठ्या बहिणी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 22 जानेवारी 2023 रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास विमान नगर येथील एक उच्चभ्रू सोसायटीमध्ये घडला. याप्रकरणी 18 वर्षीय तरुणीने तक्रार नोंदवली आहे.
हॉलमध्ये घडला हा प्रकार
लहान बहिणीचं वय 18 वर्ष आहे आणि मोठ्या बहिणीचं वय 24 वर्ष आहे. त्या दोघी बहिणी एकत्र राहतात. लहान बहिण घराच्या हॉलमध्ये झोपली असताना तिच्या शरीरावरून हात फिरवीत तिच्याशी अश्लील कृत्य करायला सुरुवात केली. त्यानंतर दोघींमध्ये वादावादी झाली. तरीही मोठ्या बहिणीने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र लहान बहिणीने वारंवार कृत्याला विरोध केला. या दोघींमधील वाद वाढला आणि लहान बहिणीने थेट पोलिसांत धाव घेतली. पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. हा प्रकार ऐकून पोलिसही चक्रावले त्यांनी तक्रार दाखल करुन घेतली आणि मोठ्या बहिणीवर गुन्हा दाखल केला आहे.
लग्न झालेल्या बहिणीकडून अश्लील चाळे
तक्रारदार लहान बहिण ही सध्या बारावीमध्ये शिक्षण घेत आहे. तर संशयित आरोपी असलेल्या बहिणीचे लग्न झाले. तीचे देखील पदवीपर्यंत शिक्षण झाले आहे. मात्र ती वडिलांकडेच राहते. मोठ्या बहिणीने गैरप्रकार केल्याबाबत लहान बहीण पोलिस ठाण्यात आली होती. तिने दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असं पोलिसांनी सांगितलं आहे. या घटनेने सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे. नेमका विश्वास कोणावर ठेवावा? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाणा वाढत आहेत. त्यात महिलांसंदर्भात घडणाऱ्या गुन्ह्यांची संख्या जास्त आहे. या गुन्ह्यांमध्ये चौरी किंवा बाकी पेक्षा महिलांच्या लैंगिक छळाचे गुन्हे जास्त प्रमाणात आहे. या सगळ्या गुन्ह्यांवर वेळीच आळा घालणं गरजेचं आहे. त्यामुळे पुणे शहरातील गुन्हेगारी थांबवण्याचं पुणे पोलिसांसमोर आव्हान आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
