एक्स्प्लोर

चिथावणीखोर वक्तव्याप्रकरणी कालीचरण महाराजांसह मिलिंद एकबोटे यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल

पुण्यातील खडकमाळ पोलीस ठाण्यात कालीचरण महाराज,  मिलिंद एकबोटे यांच्यासह इतर काही जणांवर चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी कालीचरण महाराज आणि मिलिंद एकबोटे यांच्याविरुद्ध आता पुण्यातही  गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुण्यातील नातूबागेत 19 डिसेंबरला समस्त हिंदू आघाडीच्यावतीने अफझलखान वधाचा आनंदोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला होता. यावेळी कालीचरण महाराज,  मिलींद एकबोटे  आणि इतरांनी समाजामधे तेढ निर्माण होईल, अशी भाषणे केली.  त्याची व्हिडीओ क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यावर पोलीसांनी त्याची दखल घेतली आणि चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा गुन्हा नोंद केला आहे. 

दाखल करण्यात आलेला गुन्हा अजामीनपात्र असल्याने तपास करुन यातील आरोपींना अटक केली जाईल असं पुणे पोलिसांनी म्हटले आहे. पुण्यातील नातूबागेत 19 डिसेंबरला  समस्त हिंदू आघाडीच्या वतीने अफझलखान वधाचा आनंदोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला होता. यावेळी कालीचरण महाराज,  मिलींद एकबोटे  आणि इतरांनी समाजामधे तेढ निर्माण होईल अशी भाषणे केली.  त्याची व्हिडीओ क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यावर पोलीसांनी त्याची दखल घेतली आणि चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा गुन्हा नोंद केला.  पुण्यातील खडकमाळ पोलीस ठाण्यात कालीचरण महाराज,  मिलिंद एकबोटे,  नंदकुमार एकबोटे,  मोहन शेटे, भाजपच्या पुण्यातील नगरसेविका मंजुषा नागपुरे यांचे पती दीपक नागपुरे आणि दिगेंद्रकुमार यांच्या विरोधात हा गुन्हा नोंद करण्यात आलाय.  कालीचरण महाराजाने काही दिवसांपूर्वी महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल त्याच्यावर छत्तीसगडमधे गुन्हा नोंद करण्यात आलाय तर मिलिंद एकबोटेवर कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाबरोबरच इतरही अनेक गुन्हे नोंद आहेत.

नुकत्याच रायपूर इथं झालेल्या धर्मसंसदेत कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत अपशब्द वापरले होते. मुस्लिम हे राजकारणाच्या माध्यमातून देशावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या डोळ्यासमोरच त्यांनी 1947 मध्ये देशावर ताबा मिळवला होता. त्यांनी प्रथम इराण, इराक आणि अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आहे. तसेच राजकारणाच्या माध्यमातून त्यांनी पाकिस्तान आणि बांगलादेशवरही कब्जा केला आहे. मी नथूराम गोडसे यांना सलाम करतो की त्यांनी महात्मा गांधींची हत्या केली. असे वादग्रस्त वक्तव्य कालीचरण महाराज यांनी केले होते. याप्रकरणी त्यांच्याविरोधात काँग्रेससह इतर सामाजिक संघटनांनी रायपूर येथे गुन्हा दाखल केला आहे. तसेच, त्यांच्याविरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्राच्या विधीमंडळात देखील कालीचरण महाराज यांच्या वक्तव्याचे पडसाद पडले होते. त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. अशातच आता 19 डिसेंबरला पुण्यात झालेल्या कार्यक्रमात कालीचरण महाराज आणि मिलिंद एकबोटे यांच्यासह विविध वक्त्यांनी चिथावणीखोर वक्तव्य केली होती, याप्रकरणी त्यांच्यावर गुन्ह नोंद करण्यात आला आहे.

पुण्यातील 19 डिसेंबरला समस्त हिंदू आघाडीच्यावतीने कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. यावेळी कालीचरण महाराज, मिलिंद एकबोट यांच्यासह इतर वक्त्यांनी मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मीयांबद्दल वादग्रस्त आणि चिथावणीखोर वक्तव्य केली होती. तसेच आक्षेपार्ह हातवारे देखील केले होते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Shivsena UBT Loksabha Samparkhapramukh List: सुषमा अंधारेंपासून वरुण सरदेसाई, सचिन पडवळांपर्यंत...; ठाकरेंच्या शिवसेनेकडून 40 लोकसभा मतदार संघांसाठी संपर्कप्रमुख जाहीर, कुणाकुणाला संधी?, पाहा संपूर्ण यादी!
अंधारेंपासून सरदेसाई, पडवळांपर्यंत...; ठाकरेंच्या शिवसेनेकडून 40 लोकसभा मतदार संघांसाठी संपर्कप्रमुख जाहीर, कुणाकुणाला संधी?, पाहा संपूर्ण यादी!
Vidyanand Bapat Marathi News: विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस; 48 तासांत बिनशर्त माफी मागण्याची मागणी, नेमकं काय घडलं?
विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस; 48 तासांत बिनशर्त माफी मागण्याची मागणी, नेमकं काय घडलं?
Pune Case : पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
Pune Dahi Handi : राधा पाटील पाठोपाठ निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह 8 जणींवर गुन्हा; दहीहंडीतील अश्लील नृत्यावर पुणे पोलिसांचा बडगा
राधा पाटील पाठोपाठ निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह 8 जणींवर गुन्हा; दहीहंडीतील अश्लील नृत्यावर पुणे पोलिसांचा बडगा

व्हिडीओ

Vidyanand Bapat News : डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस : ABP Majha
DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha
Garba Controversy : दांडियाला मुस्लिम तरुणांच्या प्रवेशावरुन वादाचा गरबा | Special Report ABP Majha
Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
iPhone 18 Series Marathi News: 18 Pro, 18 Pro Max आणि Duo; ॲपलकडून 3 जबरदस्त आयफोन लाँच; पाहा 10 फोटो
18 Pro, 18 Pro Max आणि Duo; ॲपलकडून 3 जबरदस्त आयफोन लाँच; पाहा 10 फोटो
Mumbai News: विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण नको, पर्यूषण पर्वाचा वाद थेट विद्यार्थ्यांच्या डब्यापर्यंत पोहचला; मिरा-भाईंदर अन् वसईतील पालकांना शाळेचा मेसेज, नेमकं प्रकरण काय?
विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण नको, पर्यूषण पर्वाचा वाद थेट विद्यार्थ्यांच्या डब्यापर्यंत पोहचला; मिरा-भाईंदर अन् वसईतील पालकांना शाळेचा मेसेज, नेमकं प्रकरण काय?
Rani Mukerji In Maharashtra State Film Awards: 'महाराष्ट्र माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग...'; राणी मुखर्जीच्या मराठमोळ्या अंदाजानं जिंकली मनं, भाषणाची सुरुवात मराठीतून करत भरभरुन बोलली... VIDEO
'महाराष्ट्र माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग...'; राणी मुखर्जीच्या मराठमोळ्या अंदाजानं जिंकली मनं, भाषणाची सुरुवात मराठीतून करत भरभरुन बोलली... VIDEO
Eknath Shinde Honoured Sith Commonwealth Public Leadership Award: ब्रिटिश संसदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गौरव; 'कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन' पुरस्कार प्रदान, पाहा Photo
ब्रिटिश संसदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गौरव; 'कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन' पुरस्कार प्रदान, पाहा Photo
iPhone Duo Marathi News: ॲपलचा पहिला फोल्डेबल फोन 'iPhone Duo' लाँच; सगळ्यांचं लक्ष वेधलं, किंमतीत एखादी कार विकत घेता येईल, पाहा A टू Z माहिती
ॲपलचा पहिला फोल्डेबल फोन 'iPhone Duo' लाँच; सगळ्यांचं लक्ष वेधलं, किंमतीत एखादी कार विकत घेता येईल, पाहा A टू Z माहिती
iPhone 18 Pro 18 Pro Max And iPhone Duo Marathi News: ॲपलकडून iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max लाँच; iPhone Duo च्या एन्ट्रीने सोशल मीडियावर धुमाकूळ, भारतात किंमत किती?, आयफोन 18 सिरीजची A टू Z माहिती
ॲपलकडून iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max लाँच; iPhone Duo च्या एन्ट्रीने सोशल मीडियावर धुमाकूळ, भारतात किंमत किती?, आयफोन 18 सिरीजची A टू Z माहिती
MPSC : परीक्षेचा मार्किंग पॅटर्न लीक झाला होता, तर पेपर का घेतला? MPSC च्या निवेदनावर रोहित पवारांचा प्रश्न
परीक्षेचा मार्किंग पॅटर्न लीक झाला होता, तर पेपर का घेतला? MPSC च्या निवेदनावर रोहित पवारांचा प्रश्न
MPSC : राज्यसेवा मुख्य परीक्षेतील गुणांच्या तफावतीची तक्रार, MPSC कडून 'गुणपडताळणी'ची संधी 
राज्यसेवा मुख्य परीक्षेतील गुणांच्या तफावतीची तक्रार, MPSC कडून 'गुणपडताळणी'ची संधी 
Embed widget