एक्स्प्लोर
घरचं भांडण सोशल मीडियावर, पत्नीची हत्या करुन पतीचा गळफास
पुणे : पत्नी घरगुती गोष्टी सोशल मीडियावर शेअर करते या रागातून पत्नीची हत्या करत पतीनं आत्महत्या केली आहे. पुण्याच्या हडपसरमध्ये ही घटना घडली आहे.
पुण्याच्या हडपसरमध्ये राहणाऱ्या सोनाली गांगुर्डे घरगुती गोष्टी सोशल मीडियावर शेअर करतात असं पत्रात लिहीत पती राकेश गांगुर्डेनं आत्महत्या केली आहे. "माझी पत्नी फेसबुक, व्हॉट्सअॅपवर मित्रमैत्रीणींबरोबर वारंवार चॅटिंग करीत असते व घरगुती विषय शेअर करत असते, यामुळे मी तिची हत्या करत आहे. यामुळे कोणास दोषी धरु नये" असं त्यानं पत्रात लिहिलं आहे. बुधवारी दुपारी ही घटना घडली आहे.
पत्नीची गळा आवळून हत्या केल्यावर पतीन गळफास घेत आत्महत्या केली आहे. मृत तरुणीच्या भावाला संशय आल्यानं त्यानं पोलिसांच्या मदतीनं दार उघडलं. तेव्हा हा सगळा प्रकार समोर आला. दरम्यान मुळचे नाशिक असलेलं हे दाम्पत्य उच्चशिक्षीत आहे. पती खासगी कंपनीत इंजिनिअर होता. मात्र तीन वर्षांपासून हडपसरमध्ये राहायला आले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement