एक्स्प्लोर

Eknath Shinde In Purandar: मला निवडून येण्यासाठी कोणत्याही निशाणीची आवश्यकता नाही: एकनाथ शिंदे

आम्ही जर बंडखोर आणि गद्दार असतो तर महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला स्वीकारलं नसतं. एवढ्या मोठ्या संख्येने सभेला लोक आले नसते. याचा अर्थ आमची भूमिका या जनतेने स्वीकारली आहे.

Eknath Shinde In Purandar: आम्ही जर बंडखोर आणि गद्दार असतो तर महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला स्वीकारलं नसतं. एवढ्या मोठ्या संख्येने सभेला लोक आले नसते. याचा अर्थ आमची भूमिका या जनतेने स्वीकारली आहे. मी काम करणारा कार्यकर्ता आहे फाईलींमध्ये काम करणारा नाही. सरकार बदललं आहे. बाळासाहेबांचं आणि प्रमाेद महाजनांंचं सरकार आलं आहे, त्यामुळे नक्कीच योग्य काम होईल, असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. ते पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथे बोलत होते.

आपण सगळ्यांनी मतदान शिवसेना भाजपला मतदान केलं. या दोघांच्या युतीचं सरकार येणार या भावनेनं आपण निवडणूका लढवल्या. त्यानंतर जनतेनीही तोच कौल दिला. शिवसेनेचे 56 आणि भाजपचे 105 आमदार निवडून आले. बहूमत जनतेनं दिलं होतं. शिवसेना भाजप युतीचं सरकार स्थापन होईल असं वाटतं होतं. मात्र दुर्दैवाने महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि समोरचं चित्र आपण सगळ्यांनी बघितलंच, असंही ते म्हणाले.

आतापर्यंतच्या इतिहासात लोक विरोधी पक्षाकडून सत्ताधारी पक्षाकडे जात असतात. आम्ही सत्तेत होतो. आमच्या सारखे मंत्री सत्ता सोडून पाय उतार झाले. मात्र मी सांगतो मला निवडून यायला कोणत्याही निशाणीची आवश्यकता लागत नाही एवढं काम मी मतदार संघात केलं आहे. ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. 40 आमदार त्यांच्या मतदार संघातली कहाणी मला सांगत होते. मला बंड काहीच आवश्यकता नव्हती या सगळ्यांच्या समस्या ऐकून मी हा बंड केला. हे केलं नसतं तर येत्या निवडणुकांमध्ये हातावर मोडण्याइतकेच आमदार निवडून आले असते, अशी परिस्थिती निर्माण झाली असती, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

माविआ  सत्तेतल्या पदाधिकाऱ्यांना मोठे निधी उपलब्ध झाले. त्यांनी कामाला सुरुवात केली. भुमिपुजनं केली. मात्र आमच्या नेत्यांना बघ्याची भूमिका घ्यावी लागली. आम्ही तक्रारी केल्या मात्र त्याचं काहीच झालं नाही. गेल्या २ वर्षात शिवसैनिकांचं खच्चीकरण झालं.  शिवसैनिकांना खोट्या चौकशींना सामोरं जावं लागलं. शिवसैनिक जेलमध्ये जावं लागलं. त्यावेळी शिवसैनिकांना राष्ट्रवादीचे लोक बोलवून चौकशी गृहमंत्र्यांकडे लावू अशी लालसा दाखवण्यात आली, असेही आरोप त्यांनी केले आहे.

अन्याया विरुद्ध पेटून उठा, अशी बाळासाहेबांची शिकवण होती. त्याविरुद्ध आम्ही लढलो आणि जिंकलो.  सर्वांनी आमच्या ऐतिहासिक बंडाची नोंद घेतली. थोडं जरी काही झालं असतं तर आमचा कार्यक्रम झाला असता. एकनाथ शिंदे आणि 50 लोकांनी राजकीय आत्महत्या केली असं अनेकांना वाटत होतं. मात्र अशा परिस्थितीत आमचा प्रवास सुरु झाला अनेक उपमा आम्हाला दिल्या. मात्र विजय केसरकर यांच्या सारखा संत माणूस भेटला. त्यामुळे आमचा भार हलका झाला, असंही ते म्हणाले. 

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
Mumbai Crime Police: कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
Embed widget