Avinash Bhosale And Sanjay Chabriya ED: ईडीची मोठी कारवाई; संजय छाब्रिया आणि अविनाश भोसले यांची 415 कोटींची मालमत्ता जप्त
ईडीने येस बँक-डीएचएफएल फसवणूक प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात ईडीने संजय छाब्रिया आणि अविनाश भोसले या दोन बांधकाम व्यावसायिकांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत.

Avinash Bhosale And Sanjay Chabriya ED: ईडीने येस बँक-डीएचएफएल फसवणूक प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात ईडीने संजय छाब्रिया (sanjay Chabriya) आणि अविनाश भोसले या दोन बांधकाम व्यावसायिकांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. ईडीने संजय छाब्रिया यांची 251 कोटी रुपये आणि अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांची 164 कोटी रुपये अशी एकूण 415 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा, 2002 (PMLA) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी रेडियस डेव्हलपर्सचे (Radius Developer) संजय छाब्रिया आणि एबीआयएल इन्फ्रास्ट्रक्चरचे (ABIL Infrastructure) अविनाश भोसले यांना अटक करण्यात आली होती.
सीबीआयने नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने येस बँकेचे राणा कपूर आणि डीएचएफएलचे कपिल वाधवन आणि धीरज वाधवन प्रवर्तकांच्या विरोधात चौकशी सुरू केली आहे. राणा कपूरने मेसर्स डीएचएफएलचे प्रवर्तक संचालक कपिल वाधवन आणि इतरांसोबत येस बँक लिमिटेडद्वारे मेसर्स डीएचएफएलला आर्थिक सहाय्य देण्यासाठी गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना लाभ देण्यात आला.
या प्रकरणाच्या तपासासंदर्भात सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहेत. दोन्ही केंद्रीय एजन्सींनी येस बँकेचे सह-संस्थापक राणा कपूर आणि DHFL कपिल वाधवन आणि धीरज वाधवन या दोन बिल्डर्सविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात दोन्ही वाधवनांना ईडीने मे महिन्यात अटक केली होती, तर कपूर यांना मार्चमध्ये अटक केली होती. ते दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
राणा कपूर यांनी येस बँक लिमिटेडच्या माध्यमातून डीएचएफएलच्या अल्पकालीन नॉन-कन्व्हर्टेबल 'डिबेंचर्स'मध्ये 3,700 कोटी रुपये आणि डीएचएफएलच्या 'मसाला बाँड्स'मध्ये 283 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचा आरोप ईडीने केला आहे.डीएचएफएलशी संबंधित 34,615 कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी नुकतेच सीबीआय पुण्यातील बिल्डर अविनाश भोसले यांच्या परिसरातून ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर जप्त केले. 2011 मध्ये वर्वा एव्हिएशनने AW109AP हेलिकॉप्टर 36 कोटी रुपयांना विकत घेतल्याचा आरोप आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
