dilip walse patil : वडिलांकडून राजकारणाचं बाळकडू, शरद पवारांचे स्वीय सहाय्यक ते अजित पवारांच्या बंडातील मंत्री; कोण आहेत दिलीप वळसे पाटील?
दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जातात. राजकारणात उतरल्यापासून शरद पवार यांचा शब्द शेवटचा असायचा मात्र ते आज अजित पवारांच्या बंडात सामील झाले आणि मंत्रीपदाची शपथ घेतली.
dilip walse patil : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉलमध्ये अजित पवार यांच्यासह 9 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर इतर आठ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या 9 जणांमध्ये सगळ्यात महत्वाचं नाव होतं ते म्हणजे दिलीप वळसे पाटील यांचं. दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जातात. राजकारणात उतरल्यापासून शरद पवार यांचा शब्द शेवटचा असायचा मात्र ते आज अजित पवारांच्या बंडात सामील झाले आणि मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांनी काही काळ शरद पवारांचे स्वीय सहाय्यक म्हणूनपण त्यांनी काम पाहिलं आहे.
Dilip Walse Patil : कोण आहेत दिलीप वळसे पाटील?
-दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहे.
-त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले आहे.
-दिलीप वळसे पाटील यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1956 ला झाला.
-1990 साली आंबेगाव तालुक्यात युवा नेतृत्व म्हणून दिलीप वळसे-पाटील याची सुरुवात झाली.
-वडील दत्तात्रेय गोविंदराव वळसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकारणाची सुरुवात केली.
-दिलीप वळसे पाटील हे आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून सलग सात वेळा आमदार झाले आहेत.
2009 ते 2014 या काळात त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली.
-वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ऊर्जा, उत्पादन शुल्क, कामगार विभागासारख्या महत्त्वाचे खात्यांचे मंत्री म्हणून काम सांभाळले आहे.
-अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर दिलीप वळसे यांना गृहमंत्री कऱण्यात आलं होतं.
राष्ट्रवादीचे प्रमुख नेते
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढच्या पिढीचा विचार केला तर अजित पवार, जयंत पाटील आणि दिलीप वळसे-पाटील हे चौघेजण पक्षाचे प्रमुख आधारस्तंभ मानले जायचे. त्यात आता दिलीप वळसे-पाटील यांनी अजित पवारांना पाठिंबा देऊन बंडात सामील झाले आहेत. जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष पदावर आहे. पक्षातील मातब्बर नेत्यांपैकी अनेक नेत्यांचा अजित पवारांना पाठिंबा आहे. त्यात जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे दिसले नाहीत. त्यांनी शरद पवारांसोबत असल्याचं ट्विटदेखील केलं आहे. त्यामुळे अजित पवारांनी राष्ट्रवादीत फुट पाडल्याचं स्पष्ट झालं आहे. दिलीप वळसे-पाटीलांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पुणे जिल्ह्यातील आंबेगावात नागरिकांनी फटाके फोडून आनंद साजरा केला आहे. गावकऱ्यांनी गावातील चौकात एकत्र येत जल्लोष केला आहे.
हेही वाचा:
Maharashtra Politics : शिंदे-फडणवीस सरकारमधील पहिली महिला मंत्री, अदिती तटकरेंनी शपथ घेतली