एक्स्प्लोर

OBC आरक्षणाला धक्का नाही, ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळणार; देवेंद्र फडणवीसांचे ओबीसींना आश्वासन

Devendra Fadnavis : ओबीसी समाजाला मुख्य प्रवाहात आणल्याशिवाय त्यांचा विकास होणार नाही, त्यासाठी आवश्यक त्या योजना राबवल्या जातील असं आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पुणे : मराठा आरक्षण देताना आम्ही ओबीसींना कोणताही धक्का लावला नाही, मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र न देता ज्यांची कुणबी नोंद सापडली आहे त्यांनाच फक्त आरक्षणाचा लाभ मिळणार आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ओबीसी समाजाच्या विकासासाठी सरकार कटीबद्ध आहे. पुण्यातील पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची 234 वी शासकीय जयंती सोहळा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी देवेंद्र फडणवीसांनी हे वक्तव्य केलं.

मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहणार नाही, ओबीसींच्या ताटातील काढून घेऊन सरसकट प्रमाणपत्र देणार नाही. काहीही झाले तर ओबीसींचे नुकसान होऊ देणार नाही. ओबीसींकरता योजना करणारे हे सरकार आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ज्यांच्याकडे नोंदी, त्यांनाच प्रमाणपत्र

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आमच्या सरकारची नीती पक्की आहे. एकाचे काढून दुसऱ्याला द्यायचे नाही. इंग्रजांनी जे केलं ते आम्ही करणार नाही. मराठा आरक्षण देताना ओबीसींना धक्का लागणार नाही. मराठावाड्यात 1948 पर्यंत इंग्रज राज्य नव्हते, तर निजाम राज्य होते. मराठवाड्याचे रेकॉर्ड हैदराबाद गॅझेटमध्ये होते. आता ज्यांच्याकडे नोंद असेल त्याला प्रमाणपत्र दिले जाईल असे आपण सागितले आहे."

ओबीसी समाजाच्या मागण्या पूर्ण करू

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, "ओबीसींना जोपर्यंत मुख्य प्रवाहात आणणार नाही त्यावर त्याचा विकास होणार नाही. ओबीसी विकास होईपर्यंत शिवकार्य पूर्ण होऊ शकत नाही. कोणीही मनात शंका घेऊ नका."

Devendra Fadnavis Speech On Umaji Naik Jayanti : देवेंद्र फडणवीसांचे भाषण खालीलप्रमाणे,

उमाजी नाईक यांना मानाचा मुजरा करतो. दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या रामोशी समाजाचा संबंध हा प्रत्यक्ष श्रीराम याच्याशी आहे. रामोशी समाजाच्या राजाचे कार्य अतुलनीय आहे. शिवाजी महाराज याच्या स्वराज्यामध्ये बहिर्जी नाईक रामोशी हे महाराजाचा विश्वासू होते, गुप्तहेर होते. बहिर्जी नाईक हे तिसरा डोळा म्हणून काम करत होते.

देव देश धर्माच्या लढ्यात हा रामोशी समाज अग्रेसर होता. ब्रिटिशांना पहिला विरोध राजे उमाजी नाईक यांनी केला. त्यांनी सेना तयार करून इंग्रजांना पळवले. रॉबर्ट यांनी पत्र लिहिले का उमाजी नाईक शिवाजी महाराज झाले असते. उमाजी नाईक हे उत्तम प्रशासक होते, स्वतःच्या हाताने त्यांनी पत्र लिहिले आहेत.

उमाजी नाईक सापडले नसते पण फितुरी झाली. शुभराजे पण असेच पकडले गेले. राजे उमाजी नाईक यांना पकडून इंग्रजांनी फाशी दिली. पण समाजाची लढाई थांबली नाही. इंग्रजांनी गुन्हेगारी कायदा करून समाजाला गुन्हेगार ठरवले. यांना नाही दाबले तर राज्य करता येणार नाही हे माहिती होते. पण इतिहासाने या समाजाचा इतिहास कधीच पुढे येऊ दिला नाही,.

जवळपास 80 वर्षे गुन्हेगारी म्हणून समाज मागे गेला, त्यांचा विकास नाही झाला. आता सरकारचा प्रयत्न आहे की त्यांना त्यांचा विकास शौर्य आठवण करून द्यायचा आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणायचं.

हा कार्यकम जयंती पुरता नाही, तुम्ही कोण आहे लक्षात आले पाहिजे. आता मागे राहता कामा नये. आता पुढे गेले पाहिजे. समाज पाठीमागे राहणार नाही यासाठी राजे उमाजी नाईक महामंडळ स्थापन केले. त्यामाध्यमातून 15 लाखांपर्यंत कर्ज द्या, दोन लाखांपर्यंत बिगर तारण कर्ज देण्यात येईल. हा समाज नोकरी देणारा झाला पाहिजे. महाज्योतीमधून स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

ही बातमी वाचा:

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Girls Students News : राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Embed widget