एक्स्प्लोर

Ajit Pawar : पुण्यातील संचेती पुलाखाली अपघात, अजितदादांनी तत्काळ ताफा थांबवला अन् अपघातग्रस्ताला दिला मदतीचा हात, पाहा व्हिडिओ

Ajit Pawar Helps Accident Victim: शिवाजीनगर परिसरातील संचेती हॉस्पिटलच्या पुलाखाली एका दुचाकीस्वाराचा आणि रिक्षाचा अपघात झाला. यावेळी पुण्याच्या पालकमंत्री असलेल्या अजित पवारांनी तत्परता दाखवत ताफा थांबवून अपघातग्रस्तांची मदत केली.

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज पुणे दौऱ्यावरती आहेत. आज(मंळवारी) सकाळी ते शिवाजीनगर येथील निवासस्थान येथून सर्किट हाऊसच्या दिशेने निघाले. त्याचवेळी शिवाजीनगर परिसरातील संचेती हॉस्पिटलच्या पुलाखाली एका दुचाकीस्वाराचा आणि रिक्षाचा अपघात झाला. यावेळी पुण्याच्या पालकमंत्री असलेल्या अजित पवारांनी तत्परता दाखवत ताफा थांबवून अपघातग्रस्तांची मदत केली. 

यावेळी अजित पवारांनी (Ajit Pawar) अपघात झालेल्या व्यक्तीची विचारपूस केली, त्यांना धीर दिला. ताफ्यातील अँब्युलन्समधील डॉक्टर यांना ताबडतोब उपचार करण्यासाठी देखील त्यांनी सांगितले. त्यानंतर अजित पवार आपल्या पुढील नियोजित कामासाठी रवाना झाले, या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. 

नेमकं काय घडलं?

या अपघातग्रस्ताना अजित पवार (Ajit Pawar) मदत करताना त्यांच्याशी बोलताना व्हिडिओमध्ये दिसत आहे, एक व्यक्ती अपघात झाल्यावर खाली पडल्याचं दिसतो आहे. यावेळी अजित पवारांच्या गाड्यांचा ताफा थांबतो. अजित पवारांचे कर्मचारी, सुरक्षारक्षक अपघातग्रस्त व्यक्तीच्या मदतीला येताना दिसतात. अजित पवार देखील गाडीतून उतरतात आणि कोणाला तरी फोन करून सूचना देताना दिसतात. त्यानंतर ते जखमी व्यक्तीजवळ जातात आणि त्याची विचारपूस करतात.

या अपघातात तो व्यक्ती किरकोळ जखमी झाल्याचं व्हिडिओमधून दिसते आहे. जखमी व्यक्तीला सर्व प्रकारची मदत करण्याच्या सूचना देऊन अजित पवार (Ajit Pawar) आपल्या पुढील नियोजित कामासाठी रवाना होतात. या व्हिडिओमधून अजित पवारांची कार्यतत्परता दिसून येते आहे, यामुळं त्यांचं कौतुक देखील केलं जात आहे. 

यावेळी अजित पवारांनी (Ajit Pawar) अपघात कसा काय झाला? असे दुचाकीस्वाराला विचारले. त्यावर रिक्षा आडवी आल्याने किरकोळ अपघात झाला. जास्त लागलं नाही फक्त हाताला खरचटलं आणि अंगठ्याला लागलं असल्याचं अपघातग्रस्त व्यक्तीने सांगितलं. मी ठीक आहे, असे दुचाकीस्वाराने अजित पवार यांना सांगितले. अपघातग्रस्तावर ‘संचेती’ रुग्णालयात प्राथमिक उपचार करा, अशा सूचना अजित पवार यांनी दिल्या व त्यानंतर ते आपल्या पुढील कामासाठी रवाना झाले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jio Server Down : गणपती विसर्जनाच्या दिवशीच 'जिओ'वर गंडांतर! सकाळपासून नेटवर्क गायब, युजर्स हैराण
गणपती विसर्जनाच्या दिवशीच 'जिओ'वर गंडांतर! सकाळपासून नेटवर्क गायब, युजर्स हैराण
Ganesh Visarjan 2024 : भिवंडीतील 22 फूट उंच गणेश मूर्तीच्या विसर्जनात अतिक्रमणामुळे अडथळे, मार्ग बदलण्याची वेळ
भिवंडीतील 22 फूट उंच गणेश मूर्तीच्या विसर्जनात अतिक्रमणामुळे अडथळे, मार्ग बदलण्याची वेळ
Pune Ganesh Visarjan: पुण्यात गणपती विसर्जनासाठी येताय? तर मग जाणून घ्या दुचाकी, चारचाकी पार्किंगची सोय कुठे अन् मेट्रोचं काय?
पुण्यात गणपती विसर्जनासाठी येताय? तर मग जाणून घ्या दुचाकी, चारचाकी पार्किंगची सोय कुठे अन् मेट्रोचं काय?
Ganesh Visarjan 2024 : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी डॉल्बी साऊंड लावताना मेंदुतून रक्तस्राव, डीजेवाला जागीच कोसळला अन्...
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी डॉल्बी साऊंड लावताना मेंदुतून रक्तस्राव, डीजेवाला जागीच कोसळला अन्...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Solapur Ganpati Visarjan : सोलापुरात बाप्पाचं विसर्जन, वाजत गाजत बाप्पाला निरोपLalbaugacha Raja Visarjan : लालबागच्या राजाचं मंडपातून प्रस्थान, लाखो भक्तांची मांदीयाळीLalbaugcha Raja Visarjan 2024 :लालबागमध्ये विसर्जन मिरवणुकीसाठी तुफान गर्दी; पोलिसांचा मोठा बंदोबस्तLalbughcha Raja Visarjan Aarti LIVE : सुखकर्ता दुःखहर्ता ... विसर्जनाआधी लालबाग राजाची आरती लाईव्ह

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jio Server Down : गणपती विसर्जनाच्या दिवशीच 'जिओ'वर गंडांतर! सकाळपासून नेटवर्क गायब, युजर्स हैराण
गणपती विसर्जनाच्या दिवशीच 'जिओ'वर गंडांतर! सकाळपासून नेटवर्क गायब, युजर्स हैराण
Ganesh Visarjan 2024 : भिवंडीतील 22 फूट उंच गणेश मूर्तीच्या विसर्जनात अतिक्रमणामुळे अडथळे, मार्ग बदलण्याची वेळ
भिवंडीतील 22 फूट उंच गणेश मूर्तीच्या विसर्जनात अतिक्रमणामुळे अडथळे, मार्ग बदलण्याची वेळ
Pune Ganesh Visarjan: पुण्यात गणपती विसर्जनासाठी येताय? तर मग जाणून घ्या दुचाकी, चारचाकी पार्किंगची सोय कुठे अन् मेट्रोचं काय?
पुण्यात गणपती विसर्जनासाठी येताय? तर मग जाणून घ्या दुचाकी, चारचाकी पार्किंगची सोय कुठे अन् मेट्रोचं काय?
Ganesh Visarjan 2024 : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी डॉल्बी साऊंड लावताना मेंदुतून रक्तस्राव, डीजेवाला जागीच कोसळला अन्...
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी डॉल्बी साऊंड लावताना मेंदुतून रक्तस्राव, डीजेवाला जागीच कोसळला अन्...
Lalbaugcha Raja: लालबागचा राजाच्या चरणांपाशीची ती चिठ्ठी चर्चेत, सुधीर साळवींना ठाकरे गटाची उमेदवारी, अजय चौधरींचा पत्ता कट होणार?
लालबागचा राजाच्या चरणांपाशीची ती चिठ्ठी चर्चेत, सुधीर साळवींना ठाकरे गटाची उमेदवारी, अजय चौधरींचा पत्ता कट होणार?
Lalbughcha Raja Visarjan Aarti LIVE : सुखकर्ता दुःखहर्ता ... विसर्जनाआधी लालबाग राजाची आरती लाईव्ह
Lalbughcha Raja Visarjan Aarti LIVE : सुखकर्ता दुःखहर्ता ... विसर्जनाआधी लालबाग राजाची आरती लाईव्ह
Delhi Chief Minister दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी आतिशी यांना संधी; केजरीवालांकडून प्रस्ताव, भाजपचा दावा ठरला खोटा
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी आतिशी यांना संधी; केजरीवालांकडून प्रस्ताव, भाजपचा दावा ठरला खोटा
Sherlyn Chopra Shocking Confession :   होय, पैशांसाठी देहविक्रीचा व्यवसाय केलाय; अभिनेत्रीच्या कबुलीने उडाली एकच खळबळ
होय, पैशांसाठी देहविक्रीचा व्यवसाय केलाय; अभिनेत्रीच्या कबुलीने उडाली एकच खळबळ
Embed widget