एक्स्प्लोर

Daund Kala Kendra Firing : गोळीबार केला एका आमदाराच्या भावानं अन् दुसऱ्याच आमदारासह भावाची केली बदनामी; पोलिसात तक्रार दाखल, माऊली कटकेंसह भाऊ अनंता कटकेंच्या पोस्ट व्हायरल

Daund Kala Kendra Firing : दौंड येथील गोळीबार प्रकरणाच्या बातम्या प्रसारमाध्यमांमधून प्रसारित झाल्यानंतर काही विरोधकांनी सोशल मीडियावर आमदार माऊली कटके आणि त्यांचे बंधू अनंता कटके यांचे नाव जोडून खोटी पोस्ट व्हायरल केली.

पुणे: दौंड गोळीबार प्रकरणात शिरूर हवेलीचे आमदार माऊली कटके आणि अनंता कटके यांची बदनामी झाल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. सुरूवातीला जेव्हा घटनेची माहिती समोर आली होती, तेव्हा फक्त आमदाराच्या भावाने गोळीबार केला अशी माहिती होती, मात्र दौंड येथील कला केंद्रावरील गोळीबार प्रकरणाशी शिरूर हवेलीचे आमदार माऊली कटके आणि त्यांचे बंधू अनंता कटके यांचा संबंध जोडून सोशल मीडियावर बदनामीचा प्रयत्न केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. वाघोली, उरुळी कांचन,रांजणगाव आणि लोणी काळभोर पोलिसात कार्यकर्त्यांनी तक्रारी नोंदवल्या आहेत.

दौंड येथील गोळीबार प्रकरणाच्या बातम्या प्रसारमाध्यमांमधून प्रसारित झाल्यानंतर काही विरोधकांनी सोशल मीडियावर आमदार माऊली कटके आणि त्यांचे बंधू अनंता कटके यांचे नाव जोडून खोटी पोस्ट व्हायरल केली. यामुळे परिसरात खळबळ उडाली. प्रत्यक्षात या प्रकरणाशी त्यांचा कोणताही संबंध नसताना बदनामी झाल्याने अनंता कटके यांनी वाघोली पोलिस ठाण्यात रविकांत वर्पे, अनिल जगताप, विकास लवांडे आणि महादेव बालगुडे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे. शिरूर हवेलीतील कार्यकर्त्यांनीही विविध पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. या प्रकरणात भोरचे आमदार शंकर मांडेकर आणि त्यांच्या बंधू बाळासाहेब मांडेकर याचे नाव समोर आले आहे.

नेमकं प्रकरण काय?

वाखारी येथील न्यू अंबिका कला केंद्रामध्ये सोमवारी रात्री साडेदहा ते 11 वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाला होता. यात सत्ताधारी पक्षातील आमदाराच्या भावाचा समावेश असल्याची चर्चाही होती. पोलिसांकडून हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न सुरू होते. याबाबत विरोधकांनी देखील पोलिसांवर आणि सत्ताधाऱ्यांवर टीका केली, टीका होऊ लागल्याने 36 तासांनंतर स्वतः पोलिसांनी पत्रकार परिषदेत गोळीबाराचा प्रकार घडल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार यांनी चार संशयितांवर गुन्हा दाखल केल्याचे सांगितले.

सोमवारी रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास गोळीबार झाला होता. गोळीबारात कोणीही जखमी झालेलं नाही अशी माहिती समोर आली आहे. बाळासाहेब मांडेकर, गणपत जगताप, चंद्रकांत मारणे यासह आणखी एका अनोळखी व्यक्तीवर दौंडच्या यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहे.

गोळीबार करणारा आमदार शंकर मांडेकरांचा सख्खा भाऊ

पुणे जिल्ह्यातील यवतमध्ये कला केंद्रात गोळीबार करणारा बाळासाहेब मांडेकर हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भोर-वेल्हा मतदारसंघाचे आमदार शंकर मांडेकर यांचा सख्खा भाऊ आहे. शंकर मांडेकर यामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. शकंर मांडेकर हे अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पुणे जिल्ह्यातील भोर वेल्हा मतदारसंघाचे आमदार आहेत. शकंर मांडेकर हे सर्वात आधी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून मुळशी जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. मात्र पाच वर्षानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि शिवसेनेकडून जिल्हा परिषद सदस्य बनले. शिवसेनेत फुट पडल्यानंतर देखील ते उद्धव ठाकरेंच्या पक्षासोबतच राहिले. मात्र 2024 च्या विधानसभा निवडणूकीचा अर्ज दाखल करण्याच्या काही दिवस आधी ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आले आणि त्यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली आणि पहिल्याच निवडणूकीत ते आमदार बनले. शंकर मांडेकर हे बांधकाम आणि जमीन खरेदी विक्रीचे व्यवसाय करतात. त्यांच्या सख्ख्या भावाने दौंडमधील कला केंद्रात गोळीबार केल्याने आता ते चर्चेत आले आहेत.

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Weather Update: पूर्व विदर्भासह मराठवाड्यात पावसाचे हायअलर्ट, मध्य महाराष्ट्रातही जोर वाढणार, IMD चा अंदाज काय ?
पूर्व विदर्भासह मराठवाड्यात पावसाचे हायअलर्ट, मध्य महाराष्ट्रातही जोर वाढणार, IMD चा अंदाज काय ?
Nashik Crime : तुमच्या नावाने बनावट खातं अन् दहशतवादासाठी फंडिंग, नाशिकच्या चार जणांना 'डिजिटल अरेस्ट'; कोट्यवधींचा घातला गंडा
तुमच्या नावाने बनावट खातं अन् दहशतवादासाठी फंडिंग, नाशिकच्या चार जणांना 'डिजिटल अरेस्ट'; कोट्यवधींचा घातला गंडा
हिंजवडीत कामासाठी जाणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; वाहतूक कोंडी कमी होणार? पुन्हा मेट्रोझिप बससेवा सुरू करण्याचा निर्णय
हिंजवडीत कामासाठी जाणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; वाहतूक कोंडी कमी होणार? पुन्हा मेट्रोझिप बससेवा सुरू करण्याचा निर्णय
Babajani Durrani : काँग्रेसकडून शरद पवारांना मोठा हादरा, परभणीतील मातब्बर नेता गळाला लावला, पक्ष प्रवेशाची तारीखही ठरली!
काँग्रेसकडून शरद पवारांना मोठा हादरा, परभणीतील मातब्बर नेता गळाला लावला, पक्ष प्रवेशाची तारीखही ठरली!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Anmol Ratna Award 2025 : महाराष्ट्राचे अनमोल रत्न पुरस्कार 2025 : ABP Majha
Majha Katta Yasmin Shaikh:मी धर्माने मुस्लिम नाही.. यास्मिन शेख असं का म्हणाल्या, लग्न कसं घडलं?
Majha Katta Yasmin Shaikh : माटे मास्तरांनी यास्मिन शेख यांना काय आशीर्वाद दिला?
Majha Katta Yasmin Shaikh : यास्मिन शेख यांनी भारताचा स्वातंत्र्यदिन प्रत्यक्ष अनुभवला..
Majha Katta Yasmin Shaikh:पंढरपूरच्या शाळेतील डब्बाबाबत घडलेला तो प्रसंग यास्मिन शेख यांनी सांगितला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Weather Update: पूर्व विदर्भासह मराठवाड्यात पावसाचे हायअलर्ट, मध्य महाराष्ट्रातही जोर वाढणार, IMD चा अंदाज काय ?
पूर्व विदर्भासह मराठवाड्यात पावसाचे हायअलर्ट, मध्य महाराष्ट्रातही जोर वाढणार, IMD चा अंदाज काय ?
Nashik Crime : तुमच्या नावाने बनावट खातं अन् दहशतवादासाठी फंडिंग, नाशिकच्या चार जणांना 'डिजिटल अरेस्ट'; कोट्यवधींचा घातला गंडा
तुमच्या नावाने बनावट खातं अन् दहशतवादासाठी फंडिंग, नाशिकच्या चार जणांना 'डिजिटल अरेस्ट'; कोट्यवधींचा घातला गंडा
हिंजवडीत कामासाठी जाणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; वाहतूक कोंडी कमी होणार? पुन्हा मेट्रोझिप बससेवा सुरू करण्याचा निर्णय
हिंजवडीत कामासाठी जाणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; वाहतूक कोंडी कमी होणार? पुन्हा मेट्रोझिप बससेवा सुरू करण्याचा निर्णय
Babajani Durrani : काँग्रेसकडून शरद पवारांना मोठा हादरा, परभणीतील मातब्बर नेता गळाला लावला, पक्ष प्रवेशाची तारीखही ठरली!
काँग्रेसकडून शरद पवारांना मोठा हादरा, परभणीतील मातब्बर नेता गळाला लावला, पक्ष प्रवेशाची तारीखही ठरली!
Team India Schedule: इंग्लंडविरुद्धचा दौरा संपला, आता टीम इंडिया पाकिस्तानसोबत भिडणार; पाहा संपूर्ण वेळापत्रक!
इंग्लंडविरुद्धचा दौरा संपला, आता टीम इंडिया पाकिस्तानसोबत भिडणार; पाहा संपूर्ण वेळापत्रक!
Mumbai Kabutar Khana News: कबुतरांना दाणे टाकू नका सांगताच लोखंडी रॉड घेऊन आला, मीरा-भाईंदरमध्ये महिलेसह वृद्ध वडिलांना मारहाण
कबुतरांना दाणे टाकू नका सांगताच लोखंडी रॉड घेऊन आला, मीरा-भाईंदरमध्ये महिलेसह वृद्ध वडिलांना मारहाण
Hyderabad Crime News : मला देवाला भेटायचंय; नवरा कामावर जाताच बायकोने पाचव्या मजल्यावरून मारली उडी, शेजाऱ्यांची माहिती ऐकून पोलीसही चक्रावले
मला देवाला भेटायचंय; नवरा कामावर जाताच बायकोने पाचव्या मजल्यावरून मारली उडी, शेजाऱ्यांची माहिती ऐकून पोलीसही चक्रावले
Sambhaji Bhide: सर्वधर्म समभाव म्हणजे नपुंसकपणा, लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्यासाठी काम करा: संभाजी भिडे
सर्वधर्म समभाव म्हणजे नपुंसकपणा, लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्यासाठी काम करा: संभाजी भिडे
Embed widget