एक्स्प्लोर

Dattatray Gade Arrested : पोलीस शोधण्यासाठी आल्याचं समजताच दत्तात्रय गाडेने ठोकली धूम; घराच्या छतावरून उडी मारली अन्...या कारणामुळे जाळ्यात येत नव्हता

Dattatray Gade Arrested : गुन्हे शाखा, स्थानिक पोलिस पथके त्याच्या मागवर होती. तब्बल अडीचशेपेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला होता, तर नराधम गाडेला पकडून देण्यासाठी स्थानिक नागरिकांची पोलिसांनी मदत घेतली.

पुणे: पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी सराईत गुन्हेगार दत्तात्रय गाडे याला पकडण्यात पोलिसांना चौथ्या दिवशी यश आले आहे. स्वारगेट पोलिसांच्या पथकाने त्याच्या शिरूर तालुक्यतील त्याच्या मुळगावी गुनाट गावातून शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास ताब्यात घेतले आहे. फरार झाल्यापासून तो उसाच्या फडात लपून बसला होता अशी माहिती समोर आली आहे. गुन्हे शाखा, स्थानिक पोलिस पथके त्याच्या मागवर होती. तब्बल अडीचशेपेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला होता, तर नराधम गाडेला पकडून देण्यासाठी स्थानिक नागरिकांची पोलिसांनी मदत घेतली.

 ज्या शेतात दत्ता गाडेला शोधण्यासाठी सर्च ॲापरेशन सुरु होतं तिथं तो नव्हताच, तिथं तो सापडलाच नाही. दत्ता गाडे रात्री नोतेवाईक महेश बहिरटी यांच्या घरी साडे दहा वाजता आला. त्यानंतर तो आल्याची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली.दत्ता गाडेने नातेवाईकांकडून पाण्याची बाटली घेतली. आणि माझी मोठी चुक झालीय, मला सरेंडर करायचं असं सांगून तिथुन निघुन गेला. ⁠त्यानंतर पोलीसांनी या घराच्या परीसरात दत्ता गाडेचा शोध सुरु केला. डॅाग स्कॅाड ही त्या ठिकाणी आणले.⁠पोलीसांना त्याचा बदलेला शर्ट सापडला , त्याचा वास डॅाग स्कॅाडला दिला. ⁠त्याआधारे डॅाग स्कॅाडने पुढील रस्ता पोलीसांना दाखवला , पण गाडे ज्या ठिकाणावरून आला होता तिथे परतलाच नाही. ⁠तर तो नातेवाईकांच्या घराच्या परिसरात असलेल्या बेबी कॅनलमध्ये झोपून राहीला. ⁠याच ठिकाणी तो ग्रामस्थांना आढळला. ग्रामस्थांनी तो दत्ता गाडेच असल्याचं स्पष्ट केल्यानंतर पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतलं.⁠दत्ता गाडे ताब्यात आल्यानंतर पोलिसांनी लगेचच पुण्याकडे कुच केली.

नातेवाईकांना गाडे म्हणाला, मला पश्चात्ताप होतोय !

रात्री दीडच्या सुमारास दत्तात्रय गाडे नातेवाईकांकडे पाणी प्यायला आल्यानंतर, मला पश्चाताप होत आहे. मला सरेंडर व्हायचं आहे, असे तो बोलला. गेल्या दोन दिवसांपासून तो उसाच्या शेतात अन्न पाण्याशिवाय लपून बसून होता. आरोपीला घेऊन पुणे पोलिसांचे पथक पहाटे पुण्यात दाखल झाले आहे.

पोलिसांच्या देखत त्याने ठोकली धूम

स्वारगेटमध्ये त्याने 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्यानंतर आरोपी दत्तात्रय गाडे बसने घरी गेला. त्यानंतर त्याने बुधवारी गावातील काल्याच्या कीर्तनात सकाळी हजेरी लावली, तर दुपारी पोलिस त्याचा शोध घेण्यासाठी त्याच्या गावी पोहोचले. त्यावेळी पोलिस आल्याचे पाहताच त्याने छतावरून उडी मारून शेताच्या दिशेने पळून गेला. त्याचा मोबाइल बंद झाल्याने पोलिसांना त्याचे लोकेशन ट्रॅक करण्यात अडचणी येत होत्या.

गाडेचा ड्रोनद्वारे शोध, 250 पोलिसांचा फौजफाटा

आरोपी दत्तात्रय गाडेच्या शोधासाठी पुणे पोलिसांची 13 पथके रवाना करण्यात आली होती. त्याच्या गुनाट (ता. शिरूर) या गावी डॉग स्क्वॉड व ड्रोनच्या मदतीने शोध घेण्यात आला होता. गावाच्या परिसरात उसाची शेती मोठ्या प्रमाणावर असल्याने तो शेतात लपून बसल्याची शक्यता होती. काल गुरूवारी दुपारपासून ते संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास पोलिसांनी ड्रोनद्वारे त्याचा शोध थांबवला.
मात्र, गावात ये-जा करण्यासाठी 3 असलेल्या प्रत्येक मार्गावर 24 तास नाकाबंदी सुरू असून, सुमारे 250 पोलिसांचा फौजफाटा गुनाट गावात आहे. पोलिसांनी बुधवारी रात्री गाडेच्या मित्र-मैत्रिर्णीसह आई-वडिलांकडेही चौकशी केली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लग्न पुढे ढकलल्याच्या उलट सुलट चर्चा; स्मृती मानधनासह  पलाशनीही इंस्टाग्राम बायो केला अपडेट, चर्चांना उधाण
लग्न पुढे ढकलल्याच्या उलट सुलट चर्चा; स्मृती मानधनासह पलाशनीही इंस्टाग्राम बायो केला अपडेट, चर्चांना उधाण
Salil Deshmukh : मनाला पटेल अशा योग्य उमेदवाराचाच प्रचार करणार, सलील देशमुखांची रोखठोक भूमिका; नागपुरातील निवडक प्रचारानं चर्चेला उधाण
आधी राजीनामा, आता म्हणताय, मनाला पटेल अशा योग्य उमेदवाराचाच प्रचार करणार; सलील देशमुखांचा निवडक प्रचार चर्चेत
Karnataka Congress Crisis: डीके आणि सीएम सिद्धरामय्यांची ब्रेकफास्ट पे चर्चा! दोघांमधील खूर्ची वादावर आता तरी 'ब्रेक' लागणार?
डीके आणि सीएम सिद्धरामय्यांची ब्रेकफास्ट पे चर्चा! दोघांमधील खूर्ची वादावर आता तरी 'ब्रेक' लागणार?
Shani Sade Sati: 2026 वर्षात शनिची साडेसाती तुमच्यावर नाही ना? फार कमी लोकांना माहीत, ठरवलेले प्लॅन रद्द होण्याची शक्यता, ज्योतिषी म्हणतात..
2026 वर्षात शनिची साडेसाती तुमच्यावर नाही ना? फार कमी लोकांना माहीत, ठरवलेले प्लॅन रद्द होण्याची शक्यता, ज्योतिषी म्हणतात..
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray Nashik Tree cutting: दुसरीकडे झाडं लावायला पाचपट जागा असेल तर साधुग्राम तिकडेच करा
Top 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट 29 नोव्हेंबर 2025
Sayaji Shinde Nashik Tapovan Tree Cutting : एकही झाड तुटू देणार नाही, झाडं तोडल्यास माफी नाही
Sharad Pawar on Congress :  मुंबई पालिकेसाठी काँग्रेसचा 'स्वबळाचा' नारा: महाविकास आघाडीत तणाव! उद्धव ठाकरे, शरद पवारांकडून नाराजी व्यक्त
chunkey Pandey Majha Katta : तिच्या वडिलांचा विरोध होता, चंकी पांडेंची लव्ह स्टोरी ऐका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लग्न पुढे ढकलल्याच्या उलट सुलट चर्चा; स्मृती मानधनासह  पलाशनीही इंस्टाग्राम बायो केला अपडेट, चर्चांना उधाण
लग्न पुढे ढकलल्याच्या उलट सुलट चर्चा; स्मृती मानधनासह पलाशनीही इंस्टाग्राम बायो केला अपडेट, चर्चांना उधाण
Salil Deshmukh : मनाला पटेल अशा योग्य उमेदवाराचाच प्रचार करणार, सलील देशमुखांची रोखठोक भूमिका; नागपुरातील निवडक प्रचारानं चर्चेला उधाण
आधी राजीनामा, आता म्हणताय, मनाला पटेल अशा योग्य उमेदवाराचाच प्रचार करणार; सलील देशमुखांचा निवडक प्रचार चर्चेत
Karnataka Congress Crisis: डीके आणि सीएम सिद्धरामय्यांची ब्रेकफास्ट पे चर्चा! दोघांमधील खूर्ची वादावर आता तरी 'ब्रेक' लागणार?
डीके आणि सीएम सिद्धरामय्यांची ब्रेकफास्ट पे चर्चा! दोघांमधील खूर्ची वादावर आता तरी 'ब्रेक' लागणार?
Shani Sade Sati: 2026 वर्षात शनिची साडेसाती तुमच्यावर नाही ना? फार कमी लोकांना माहीत, ठरवलेले प्लॅन रद्द होण्याची शक्यता, ज्योतिषी म्हणतात..
2026 वर्षात शनिची साडेसाती तुमच्यावर नाही ना? फार कमी लोकांना माहीत, ठरवलेले प्लॅन रद्द होण्याची शक्यता, ज्योतिषी म्हणतात..
Raj Thackeray: काही कोटी झाडं लावल्याची घोषणा भाजप सरकारने काही वर्षांपूर्वी केली, जी झाडं कुठे दिसली नाहीत; सुधीर मुनगंटीवारांचं नाव न घेता राज ठाकरेंचा गिरीश महाजनांना खोचक टोला
काही कोटी झाडं लावल्याची घोषणा भाजप सरकारने काही वर्षांपूर्वी केली, जी झाडं कुठे दिसली नाहीत; सुधीर मुनगंटीवारांचं नाव न घेता राज ठाकरेंचा गिरीश महाजनांना खोचक टोला
'तेव्हाही तुम्ही पुरावा मागणार का?' विद्यापीठात काम करणाऱ्या महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना मासिक पाळीचा पुरावा मागताच सुप्रीम कोर्टाचा संतप्त सवाल
'तेव्हाही तुम्ही पुरावा मागणार का?' विद्यापीठात काम करणाऱ्या महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना मासिक पाळीचा पुरावा मागताच सुप्रीम कोर्टाचा संतप्त सवाल
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांचा आता नवा तुघलकी फतवा! या 19 गरीब देशातील निर्वासितांना नो एन्ट्री; नव्याने कोणाला हाकलून देणार ते सुद्धा सांगितलं
डोनाल्ड ट्रम्प यांचा आता नवा तुघलकी फतवा! या 19 गरीब देशातील निर्वासितांना नो एन्ट्री; नव्याने कोणाला हाकलून देणार ते सुद्धा सांगितलं
Palghar News: सात कोटी बाजार मूल्य असलेल्या सहकारी संस्थेच्या जमिनीची केवळ 70 लाखांना विक्री, सहाय्यक निबंधकांचं पालघर पोलिसांना पत्र
मोठी बातमी! सात कोटी बाजार मूल्य असलेल्या सहकारी संस्थेच्या जमिनीची केवळ 70 लाखांना विक्री, सहाय्यक निबंधकांचं पालघर पोलिसांना पत्र
Embed widget