एक्स्प्लोर
पिंपरीत भाजप नगरसेवकाची हत्या
आळंदीचे नगरसेवक बालाजी कांबळे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला आहे. हल्ल्यात बालाजी कांबळे यांचा मृत्यू झाला आहे. आज मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला.

पिंपरी : आळंदीचे नगरसेवक बालाजी कांबळे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला आहे. हल्ल्यात बालाजी कांबळे यांचा मृत्यू झाला आहे. आज मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. वडमुखवाडी येथे बालाजी कांबळे यांच्यावर अज्ञातांनी धारदार शस्त्रांनी वार करत हल्ला केला. हल्ल्यात कांबळेंचा मृत्यू झाला. बालाजी कांबळे आळंदी नगरपरिषदेचे भाजपचे नगरसेवक आहेत. ते पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांचा छोटेखानी बांधकामाचा व्यवसाय होता. पिंपरी चिंचवडमध्ये एका आर्किटेक्टकडे बालाजी कांबळे आले होते. पुढे ते पुण्याला गेल्याचं बोललं जातंय, तिथून परतत असताना हा हल्ला झाल्याची माहिती त्यांच्या मित्रांनी दिली. पण त्यांच्यासोबत कोण होतं? तसंच हल्ल्याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
Before You Go
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















