एक्स्प्लोर

कोरोनाबाधित रुग्णाचा नायडू रुग्णालयातून पळून जाण्याचा प्रयत्न; सुरक्षा रक्षकांकडे पीपीई किट नसल्यामुळे गोंधळ

पुणे शहरातील नायडू रुग्णालयातून एका कोरोनाबाधित रुग्णाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षा रक्षकांकडे पीपीई किट नसल्यामुळे गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

पुणे : शहातील नायडू रुग्णालय हे कोरोनाबाधित रुग्णांचे केंद्रबिंदू आहे. आजघडीला या रुग्णालयात पुण्यातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. परंतु, याच रुग्णालयातील एका वृद्ध कोरोनाबाधित रुग्णाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. हा रुग्ण रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ गेला. परंतु, सुराक्षकांजवळ पीपीई किट नसल्यामुळे त्याला थांबवण्यास कुणीही पुढे येईना. प्रशासनाचीही धावपळ उडाली. गुरुवारी झालेल्या या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

कोरोनाची बाधा झालेले काही रुग्ण अनेक दिवस एकाच खोलीत राहिल्याने कंटाळले आहेत. त्यामुळे काहीही करून बाहेर पडायचे असाही काही रुग्णांचा प्रयत्न असतो. पुणे महापालिकेच्या संसर्गजन्य रोगांसाठी असलेल्या नायडू रुग्णालयात गुरुवारी असाच प्रकार घडला. एक वृद्ध रुग्ण रुग्णालयातून घरी जाण्यासाठी निघाला. रुग्णालय प्रशासनाने त्याची खूप समजूत काढली. पण तो कुणाचे काही ऐकायला तयार नव्हता. सोबत आणलेल्या पिशवीसह तो रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचला. सुरक्षारक्षकांनी त्याला अडवण्याचा खूप प्रयत्न केला. पण व्यर्थ. पीपीई किट घातले नसल्यामुळे सुरक्षा रक्षकांना त्याच्या जवळही जाता येईना.

राज्यात आतापर्यंत 6 हजार 564 रुग्ण कोरोनामुक्त तर, आज नवीन 1576 कोरोनाबाधित

हा रुग्ण प्रवेशद्वारातून जेव्हा बाहेर जाण्यास निघाला. तेव्हा एका सुरक्षा रक्षकाने लांब बांबूच्या सहाय्याने त्याला ढकलत खाली पाडले. त्यानंतर काही वेळाने पीपीई किट घालून आलेल्या एका कर्मचाऱ्याने त्याला हाताला धरून वॉर्डमध्ये नेले. आणि इतरांनी सुटकेचा निश्वास टाकला.

रुग्णांचे मनोधैर्य वाढवण्याची आवश्यकता कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने होताना दिसत आहे. या आजारावर कोणत्याही प्रकारची लस अद्याप उपलब्ध झालेली नाही. परिणाणी या आजाराविषयी लोकांच्या मनात अनेक गैरसमज निर्माण झाले आहे. त्यामुळे ज्या रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह येतो, अशा व्यक्तींचे मनोधैर्य खचण्याची शक्यता आहे. किमान 14 दिवस एकाच खोलीत उपचार घ्यावे लागत असल्याने एकटेपणाचीही काहींना भीती वाटते. त्यामुळे अशा रुग्णांचे मनोधैर्य वाढवण्याची गरज असल्याचे तज्ञांचे मत आहे.

Corona Ground Report | कोरोनाचा ग्रामीण भागातील ग्राऊंड रिपोर्ट! तुमच्या जिल्ह्यातील कोरोना अपडेट

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: नात्यातील महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवला; पुण्यातून अपहरण, सांगलीत संपवले, तपासानंतर पोलिसही चक्रावले!
नात्यातील महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवला; पुण्यातून अपहरण, सांगलीत संपवले, तपासानंतर पोलिसही चक्रावले!
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Nitin Gadkari : मुंबई ते बंगळुरू 5 तासांत तर पुणे ते छत्रपती संभाजीनगर 2 तासांत प्रवास, गडकरींचा मास्टर प्लॅन!
मुंबई ते बंगळुरू 5 तासांत तर पुणे ते छत्रपती संभाजीनगर 2 तासांत प्रवास, गडकरींचा मास्टर प्लॅन!
Pune Crime News: स्वातंत्र्यदिनी सिंहगडावर पर्यटकांची तुफान गर्दी; दोन गटांत तुंबळ हाणामारी, एकानं भाला दगड उचलला अन्...; नेमकं काय घडलं?
स्वातंत्र्यदिनी सिंहगडावर पर्यटकांची तुफान गर्दी; दोन गटांत तुंबळ हाणामारी, एकानं भाला दगड उचलला अन्...; नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Embed widget