एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
दहीहंडीचे फ्लेक्स लावण्यावरुन वाद, पुण्यात तरुणाची हत्या
पुण्यातील सिंहगड रोड भागातील माणिकबाग परिसरातील मध्यरात्रीची ही घटना आहे. अक्षय गडशी (वय 23) असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे.
![दहीहंडीचे फ्लेक्स लावण्यावरुन वाद, पुण्यात तरुणाची हत्या conflict over flex posting youth killed by five in Pune दहीहंडीचे फ्लेक्स लावण्यावरुन वाद, पुण्यात तरुणाची हत्या](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/09/01103949/pune-murder.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : दहीहंडीचे फ्लेक्स लावण्यावरुन झालेल्या वादातून पाच जणांनी एकावर तलवारीने वार करून निर्घृण हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील सिंहगड रोड भागातील माणिकबाग परिसरातील मध्यरात्रीची ही घटना आहे.
अक्षय गडशी (वय 23) असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी निलेश चौधरी, सागर दारवडकर आणि त्यांच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय आणि आरोपी एकाच भागातील आहेत. काही दिवसांपूर्वी आरोपी आणि अक्षय यांच्यात दहीहंडीचा फ्लेक्स लावण्यावरून वाद झाला होता. त्या वादातून पाच जणांच्या टोळक्याने मध्यरात्री माणिकबाग येथील पेट्रोल पंपासमोर अक्षयला गाठून त्याच्यावर तलवारीने वार करून त्याची हत्या केली.
शहरात दहीहंडी मंडळाकडून मोठ-मोठे शुभेच्छा आणि आयोजित कार्यक्रमाचे फ्लेक्स लावले जात आहेत. त्यातून दोन गटात किरकोळ वादही होत आहेत. मात्र, शनिवारी मध्यरात्री याच वादातून थेट तरुणाला संपवल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion