एक्स्प्लोर
पुण्यात जिग्नेश मेवाणी, उमर खालिदविरोधात पोलिसात तक्रार
भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी गुजरात विधानसभेचे आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी आणि जेएनयूतील विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिदविरोधात पुण्याच्या डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
पुणे : भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी गुजरात विधानसभेचे आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी आणि जेएनयूतील विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिदविरोधात पुण्याच्या डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
भीमा-कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियानांतर्गत 31 डिसेंबर रोजी पुण्याच्या शनिवार वाड्यात ‘एल्गार परिषदे’चं आयोजन करण्यात आलं होतं. याच एल्गार परिषदेत जिग्नेश मेवाणींनी चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप तक्रारदार युवकांनी केला आहे.
दरम्यान, 31 डिसेंबरला झालेल्या पुण्यातील एल्गार परिषदेला ‘समस्त हिंदू आघाडी’चे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी तीव्र विरोध केला होता. हा कार्यक्रम झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. तसेच, हा कार्यक्रम होऊ नये याबाबत त्यांनी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांना निवेदनही दिलं होतं. दुसरीकडे हिंदू आघाडीच्या आधी पेशव्यांच्या वंशजांनी देखील हा कार्यक्रम शनिवारवाड्यावर घेण्यास विरोध केला होता. पण महापौर मुक्ता टिळक यांनी परिषदेला सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून महापालिकेने परवानगी दिली होती. संबंधित बातम्या : पुण्यातील ‘एल्गार परिषद’ वादाच्या भोवऱ्यातComplaint against Jignesh Mevani & Umar Khalid received at Pune's Deccan Police Station, complainant alleges they made provocative statements that led to tension b/w two communities. (File Pics) pic.twitter.com/qaZOej3iX1
— ANI (@ANI) January 2, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement