एक्स्प्लोर

Cm Uddhav Thackeray : युतीमध्ये 25 वर्षे अंडी उबवली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा

Cm Uddhav Thackeray in Baramati : राजकारणात देखील इनक्युबेशन सेंटर आम्ही पंचवीस- तीस वर्षांपूर्वी उघडले होते. इनक्युबेशन सेंटर म्हणजे उबवणी केंद्र.

Cm Uddhav Thackeray in Baramati : आम्हीही इतके दिवस पवारांचे टीकाकार होतो. शिवसेनाप्रमुख मला सांगायचे की बारामतीत शरदबाबू जे करतायत ते बघायला हवे. राजकारणात देखील इनक्युबेशन सेंटर आम्ही पंचवीस- तीस वर्षांपूर्वी उघडले होते. इनक्युबेशन सेंटर म्हणजे उबवणी केंद्र. पण दुर्दैवाने काय उबवले हे आपण पाहतो आहोत. आम्हीही नको ती अंडी उबवली, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला. ते बारामतीमधील कृषी महाविद्यालयातील इनक्युबेशन सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. बारामती देशातील सर्वोत्तम केंद्र झाल्याशिवाय राहणार नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. 

राजकारणात एकमेंकाचं पटत नाही. ठिकाय नाही पटत. पण राजकारणात एकमेंकांचं पटत नाही म्हणून अडथळे आणणे ही काय वृत्ती आहे. हे आपलं राजकारण असू शकत नाही. ही आपली संस्कृती असू शकत नाही. तसे आपल्यावर संस्कार नाहीत. विकासकामाला पाठींबा जरी देता येत नसला तरी त्यात विघ्ने तरी आणता कामा नये. आपल्याकडे विघ्नसंतोषी खूप आहेत. पण त्या विघ्नसंतोषींना नेमकं मिळतं काय?, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं. गेले दोन दिवस माझे पाय धरलेत.  पाय कधी डगमगत नाहीत.  डगमगणार नाही.  पण  गेले दोन दिवस झाले पाय धरलेत त्यामुळेच या कार्यक्रमास येण्यास उशीर झाला, असं मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची तोफ डागली. दिवाळी सुरु झालेलीच आहे. बॉम्ब फोडू. बॉम्ब फोडा पण धुर काढू नका. कारण कोरोना अजून गेलेला नाही, असं म्हणाले.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात शरद पवार यांच्या बारामतीमधील कामाचं कौतुक केलं. तसेच पुन्हा बारामतीला येणार, दोन्ही मुलांना घेऊन येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती मार्फत उभारण्यात आलेल्या 'इन्क्युबेशन व इनोव्हेशन सेंटर आणि विज्ञान संशोधन केंद्राचे' मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन झालं. 

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: भाजपचे नेते म्हणाले होते, मुख्यमंत्री माझं ऐकतात, ही पण एक दंतकथाचं; पुण्यातील दुर्ग प्रतिकृतीच्या उद्घाटन सोहळ्यात राज ठाकरेंचं मिश्किल भाष्य
भाजपचे नेते म्हणाले होते, मुख्यमंत्री माझं ऐकतात, ही पण एक दंतकथाचं; पुण्यातील दुर्ग प्रतिकृतीच्या उद्घाटन सोहळ्यात राज ठाकरेंचं मिश्किल भाष्य
Pune Crime News: सणाच्या तोंडावर पुण्यात पुन्हा 'कोयता गँग'ची दहशत; कोथरूडमध्ये तरुणाला संपवलं, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, पुण्यात नेमकं काय घडलं?
सणाच्या तोंडावर पुण्यात पुन्हा 'कोयता गँग'ची दहशत; कोथरूडमध्ये तरुणाला संपवलं, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, पुण्यात नेमकं काय घडलं?
पायल झांबरे मृत्यू प्रकरण! घरातून 35 तोळे सोने, चांदीचे दागिने, मोबाईलसह सीसीटीव्ही फुटेज जप्त, पतीसह सासू सासऱ्यांच्या पोलीस कोठडीत वाढ
पायल झांबरे मृत्यू प्रकरण! घरातून 35 तोळे सोने, चांदीचे दागिने, मोबाईलसह सीसीटीव्ही फुटेज जप्त, पतीसह सासू सासऱ्यांच्या पोलीस कोठडीत वाढ
Rajendra Pawar Ajit Pawar: 'अजित गेल्यानंतर आज पहिल्यांदाच दिवाळी सुनी-सुनी', राजेंद्र पवारांनी अजितदादांसोबत घालवलेल्या लहानपणीच्या दिवाळीची अन् फटाक्यांची आठवण केली शेअर, म्हणाले, 'आठवण काढणे एवढेच मागे...'
'अजित गेल्यानंतर आज पहिल्यांदाच दिवाळी सुनी-सुनी', राजेंद्र पवारांनी अजितदादांसोबत घालवलेल्या लहानपणीच्या दिवाळीची अन् फटाक्यांची आठवण केली शेअर, म्हणाले, 'आठवण काढणे एवढेच मागे...'

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Morcha Kolhapur: भस्मासूर, रेडा, म्हशी, घोडा अन् कोल्हापुरी पायताण! कुठं बी हुडिक, रस्त्यावर नुसतं पब्लिक; गोकुळ मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वीच दसरा चौक तुंडूब भरला
भस्मासूर, रेडा, म्हशी, घोडा अन् कोल्हापुरी पायताण! कुठं बी हुडिक, रस्त्यावर नुसतं पब्लिक; गोकुळ मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वीच दसरा चौक तुंडूब भरला
लक्षात ठेवलंय 2029, हे कोल्हापूर हाय.. गोकुळसाठी एवढा रडीचा डाव खेळणाऱ्यांनी विचार करा विधानसभेला काय काय केलं असेल? गोकुळच्या मोर्चात महायुतीविरोधात उद्रेक, पायताण सुद्धा आणलं
लक्षात ठेवलंय 2029, हे कोल्हापूर हाय.. गोकुळसाठी एवढा रडीचा डाव खेळणाऱ्यांनी विचार करा विधानसभेला काय काय केलं असेल? गोकुळच्या मोर्चात महायुतीविरोधात उद्रेक, पायताण सुद्धा आणलं
Gokul Kolhapur Dasara Chowk: सतेज पाटलांच्या एका हाकेवर गोकुळसाठी हजारोंची गर्दी जमली, कोल्हापूरच्या दसरा चौकात मुंगी शिरायलाही जागा उरली नाही!
सतेज पाटलांच्या एका हाकेवर गोकुळसाठी हजारोंची गर्दी जमली, कोल्हापूरच्या दसरा चौकात मुंगी शिरायलाही जागा उरली नाही!
Amravati Crime News: दिवाळीच्या सणात अमरावतीत रक्तरंजित घटना; तरुणाला भोसकून संपवलं, अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु
दिवाळीच्या सणात अमरावतीत रक्तरंजित घटना; तरुणाला भोसकून संपवलं, अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु
Vaibhav Sooryavanshi : ना कुटुंबाने खरेदी केली, ना पैसे मोजले! 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दिवाळीच्या मुहूर्तावर मिळाली शानदार कार, कारण काय?
ना कुटुंबाने खरेदी केली, ना पैसे मोजले! 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दिवाळीच्या मुहूर्तावर मिळाली शानदार कार, कारण काय?
Vivekanand Patil Kolhapur Gokul Morcha speech: मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो, गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो, गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
Gokul Kolhapur Dasara Chowk Morcha: गोकुळच्या मोर्चात म्हशीने मार्केट खाल्लं, गळ्यात लटकवलेल्या बोर्डाची चर्चा, कोल्हापूरकरांचा नादच खुळा
गोकुळच्या मोर्चात म्हशीने मार्केट खाल्लं, गळ्यात लटकवलेल्या बोर्डाची चर्चा, कोल्हापूरकरांचा नादच खुळा
Western Railway Mumbai Local Train Updates: विरार-नालासोपाराजवळ फटाक्यांमुळे भूमिगत केबल जळाली; सिग्नल यंत्रणेत बिघाड, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
विरार-नालासोपाराजवळ फटाक्यांमुळे भूमिगत केबल जळाली; सिग्नल यंत्रणेत बिघाड, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Embed widget