एक्स्प्लोर

Bapu Pathare: शरद पवार गटाचा 'तो' नेता शिवनेरी गडावर दिसला, अजितदादांच्या पाठीमागचं आसन, दादांनी काकांचा मोहरा गळाला लावला?

Bapu Pathare: शिवनेरी किल्यावरील स्टेजवरती शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार बापू पठारे यांच्या उपस्थितीने अनेकांच्या भूवया उंचावल्याचं दिसून आलं.

पुणे: आज छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती आहे. यानिमित्त सर्वत्र उत्सव साजरा केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवरती शिवजयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. किल्ले शिवनेरीवरील सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते. त्याचबरोबर इतर आमदार, मंत्री आणि नेते देखील उपस्थित होते. मात्र, या सोहळ्याच्या स्टोजवरती असा एक चेहरा होता ज्यांंच्या उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. शिवनेरी किल्यावरील स्टेजवरती शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार बापू पठारे यांच्या उपस्थितीने अनेकांच्या भूवया उंचावल्याचं दिसून आलं.

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील एकमेव आमदार आमदार बापू पठारे आज शिवनेरी किल्ल्यावरील शिवजयंती सोहळ्यात दिसून आले. ते शासकीय कार्यक्रमाच्या मंचावरती बसल्याचं दिसून आलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंचावरून उपस्थितांशी संवाद साधला त्यावेळी वडगाव शेरीचे विद्यमान आमदार बापू पठारे यांच्या नावाचा देखील उल्लेख केल्याचं दिसून आलं, त्यामुळे आता राजकीय वर्तुळात अजित पवार शरद पवारांना धक्का देण्याच्या तयारीत आहेत का अशा चर्चा रंगल्या आहेत.

बापू पठारे अजितदादांच्या पक्षात जाणार असल्याच्या चर्चा 

शिवनेरीवरील शासकीय कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बापू पठारे यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. बापू पठारे हे अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असतानाच आज त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत एका व्यासपीठावर दिसून आल्याने ते खरंच शरद पवारांची साथ सोडणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

शिवनेरी किल्ल्यावर आज शासकीय शिवजयंतीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे उपस्थित होते. तर शिंदे आणि अजित पवारांच्या मागे दुसऱ्या रांगेत बापू पठारे बसलेले होते. तर या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचं आणि भेटीचं स्पष्टीकरण देताना, मतदारसंघातील कामानिमित्त भेट घेतल्याचं बापू पठारे यांनी सांगितलं आहे. 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला करत तरुणानं स्वत:ला संपवलं, पुण्यातील जुन्नरमध्ये खळबळ
एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला करत तरुणानं स्वत:ला संपवलं, पुण्यातील जुन्नरमध्ये खळबळ
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
Accident News: डंपरनं सायकलस्वार विद्यार्थ्याला चिरडलं, जागीच मृत्यू, संतापजनक दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद, नेमकं काय घडलं?
डंपरनं सायकलस्वार विद्यार्थ्याला चिरडलं, जागीच मृत्यू, संतापजनक दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद, नेमकं काय घडलं?
Maharashtra Weather Update: एकीकडे उष्णतेची लाट, दुसरीकडे विदर्भ, मराठवाड्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, पुणे वेधशाळेचा अंदाज
एकीकडे उष्णतेची लाट, दुसरीकडे विदर्भ, मराठवाड्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, पुणे वेधशाळेचा अंदाज

व्हिडीओ

Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report
Special Report Bomb Threat to Assembly : धमकीचा बॉम्ब, अफवांमुळे घाम! Special Report
Politics On Marathi Language : मराठीचा मुद्दा, मुनगंटीवारांचा गुद्दा Special Report
Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, 22 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार, महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार,महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
Inflation : महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
Iran : आखाती देशांवरील हल्ले थांबणार नाहीत, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इशारा
शहीद झालेले जवान, लहान मुलांच्या मृत्यूचा बदला घेणार, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार : मोजतबा खामेनी
EPFO : 7 कोटी खातेदारांच्या पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
Share Market Crash: शेअर बाजारातील घसरणीचा ट्रेंड कायम, ट्रम्प कनेक्शनमुळं बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले 
ट्रम्प कनेक्शनमुळं भारतीय शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
Embed widget