एक्स्प्लोर

व्यावसायिक गौतम पाषाणकर बेपत्ता प्रकरणात महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती

21 ऑक्टोबरपासून बेपत्ता असलेले पुण्यातील प्रसिद्ध व्यवसायिक गौतम पाषाणकर (Gautam Pashankar) प्रकरणात पुणे पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती लागली आहे. ते कोल्हापुरात गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

पुणे :  21 ऑक्टोबरपासून बेपत्ता असलेले पुण्यातील प्रसिद्ध व्यवसायिक गौतम पाषाणकर प्रकरणात पुणे पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती लागली आहे. ते कोल्हापुरात गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजगच्या माध्यमातून त्यांचा तपास सुरू केला असून त्यातून ही माहिती मिळाली. परंतु सध्याच्या परिस्थितीत ते कोल्हापुरातच आहे किंवा आणखी इतर कुठे गेलेत याचा शोध मात्र लागला नाही. गौतम पाषाणकर यांचं 21 ऑक्टोबरच्या आधीचं व्हॉट्सअपवरील चॅटिंग पोलिसांच्या हाती लागले आहे. त्याआधारे ही पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. लवकरच त्याचा शोध लागेल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

गौतम पाषाणकर यांचा मुलगा कपिल पाषाणकर यांनी सांगितले की, पुणे पोलिसांची सहा पथकं त्यांचा शोध घेत आहेत. कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागातही पोलिसांची टीम तपासासाठी गेली होती. काही दिवसांपूर्वी गौतम पाषाणकर यांची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी मला एक सीसीटीव्ही फुटेज दाखवलं होतं. त्यामध्ये तेच होते. परंतु ते सीसीटीव्ही फुटेज कुठलं होतं याची माहिती पोलिसांनी दिली नाही. दिवाळीच्या आधी त्यांचा शोध लागेल आणि त्यांना घरी आणलं जाईल असं आश्वासन आम्हाला पोलिसांनी दिल्याचेही त्यांनी सांगितलं.

बड्या राजकीय नेत्याच्या जवळच्या व्यक्तीच्या त्रासाला कंटाळून घर सोडलं, कुटुंबियांचा आरोप

गौतम पाषाणकर हे त्यांना एका बड्या राजकीय नेत्याच्या जवळच्या व्यक्तीकडून त्रास दिला जात असल्यानं घर सोडून निघून गेल्याची दुसरी तक्रार पाषाणकर यांच्या कुटुंबियांकडून पोलिसांकडे देण्यात आली आहे. यामुळे बेपत्ता  व्यवसायिक गौतम पाषाणकर प्रकरणाला वेगळे वळण आले आहे.   पाषाणकर यांनी स्वतःच्या हाताने लिहिलेली तीन पानांची सुसाईड नोटही कुटुंबीयांनी पोलिसांकडे दिली होती. मात्र त्या सुसाईड नोटची तीन नाही तर चार पानं असून चौथ्या पानावर आर्थिक कारणांनी दिल्या जात असलेल्या त्रासामुळे आपण पुण्याच्या बाहेर निघून जात असल्याचं गौतम पाषाणकर यांनी लिहून ठेवलायचा दावा पाषाणकर यांचा मुलगा कपिल पाषाणकर यांनी केला होता. त्याचबरोबर या प्रकरणात पुणे पोलिसांवर दबाव असू शकतो असंही त्यांनी म्हटलं होतं.

Gautam Pashankar | 'आम्ही आतुरतेने वाट पाहतोय, लवकरात लवकर घरी ये' : पाषाणकर कुटुंबीय

पाषाणकर यांची गाड्यांची डीलरशीप, गॅस एजन्सी आणि इतरही अनेक व्यवसाय आहेत. बुधवारी (21 ऑक्टोबर) लोणी काळभोर इथल्या गॅस एजन्सीमधे जाऊन गौतम पाषाणकर हे शिवाजी नगर मधील त्यांच्या कार्यालयात परत आले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या ड्रायव्हरकडे एक लिफाफा दिला आणि ड्रायव्हरला तो घरी द्यायला सांगितला. त्यानंतर गौतम पाषाणकर हे चालत पुणे विद्यापीठाच्या दिशेनं गेल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतं आहे. तेव्हापासून पाषाणकर बेपत्ता आहेत. पाषाणकर यांचं नक्की काय झालं याचा पोलिस तपास करत आहेत.

गौतम पाषाणकर हे कोणाला आढळल्यास त्यांनी कपिल पाषाणकर ( 9822474747) किंवा शिवाजीनगर पोलिस ठाणे (020-25536263) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Cyber Crime : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा AI Deepfake व्हिडीओ, पुण्यातील व्यापाऱ्याला 1 कोटींचा गंडा, अनेकजण बळी
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा AI Deepfake व्हिडीओ, पुण्यातील व्यापाऱ्याला 1 कोटींचा गंडा, अनेकजण बळी
Chakan MIDC Pune News: चाकण MIDC मधून 20 कंपन्यांना टाळे लागणार, 1000 कोटींचा फटका, 4000 कर्मचारी बेरोजगार होण्याच्या मार्गावर
चाकण MIDC मधून 20 कंपन्यांना टाळे लागणार, 1000 कोटींचा फटका, 4000 कर्मचारी बेरोजगार होण्याच्या मार्गावर
Tukaram Mundhe Favorite Actress: तुमची आवडती हिरोईन कोण? मित्राचं नाव घेत तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, सभागृहात एकच हशा पिकला, नेमकं काय घडलं?
तुमची आवडती हिरोईन कोण? मित्राचं नाव घेत तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, सभागृहात एकच हशा पिकला!
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget