Pune : शिवाजी महाराज नसते तर पाकिस्तानची सीमा...; यशवंतराव चव्हाणांचं वाक्य ऐकवत अमित शाहांनी सांगितलं कारण
Amit Shah : छत्रपती शिवाजी महाराज नसते तर पाकिस्तानची सीमा शोधण्यासाठी आपल्याला फार दूर जावे लगले नसते, असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे.
Pune Amit Shah : शिवाजी महाराज नसते (Amit Shah) तर काय झाले असते हे आपण कल्पनाही करू शकत नाही. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या एका वाक्याची आठवण करुन दिली. ते म्हणाले, यशवंतराव चव्हाण (Yashwantrao chavhan) यांनी सांगितले होते की, देशाच्या इतिहासात शिवाजी महाराजांचे मोठे योगदान आहे. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर पाकिस्तानची सीमा शोधण्यासाठी आपल्याला फार दूर जावं लागलं नसतं. कदाचित आपल्या घराबाहेरच आपल्याला पाकिस्तानची सीमा पाहायला मिळाली असती. पुण्यातील आंबेगाव येथे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या शिवसृष्टीचं (Shivsrushti) उद्घाटन अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना अमित शाह म्हणाले की, आपण सगळेच शिवभक्त आहोत. आज शिवजयंतीच्याच दिवशी शिसृष्टीचं लोकार्पण होत आहे, हीच सगळ्यात चांगली बाब आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवाजी महाराजांचं कार्य घराघरात पोहचवलं. सगळं आयुष्य त्यांनी शिवाजी महारांवर लेखन करण्यात आणि त्याचे विचार रुजवण्यात घालवलं. शिवसृष्टीची निर्मिती व जाणता राजा महानाट्यामुळे बाबासाहेब पुरंदरे यांनी देशावर खूप मोठे उपकार केले आहेत. या लोकापर्ण सोहळ्यात मी सहभागी झालो, यामुळे स्वतःला भाग्यवान समजतो. या शिवसृष्टीला भेट देणारा प्रत्येक व्यक्ती शिवाजी महाराजांचा संदेश घेऊन त्यांचा विचार घेऊन मार्गस्त होणार आहे. शिवाजी महाराज एक व्यक्ती नव्हते तर ते एक विचार होते.ले
मोदींनी आयोजित केलेल्या जाणाता राजा नाटकाची आठवण केली
गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाणता राजा प्रयोगाचे साधारण 8 प्रयोगाचं आयोजन केले होते. त्यावेळी गुजरातमध्ये शिवमय वातावरण बघायला मिळालं होतं. हे नाटक बघायला गुजराती लोकांनी गर्दी केली होती. गुजराती लोकांनाही या नाटकाच्या निमित्ताने शिवाजी महाराज कळले होते. प्रत्येक गुजराती त्यावेळी शिवाजी महाराजांचे विचार घरी घेऊन जात आहे. ते रुजवताना दिसले. त्याच प्रमाणे शिवसृष्टी हे थीम पार्क असणार आहे. शिवसृष्टी आशियातील सर्वात मोठे थीम पार्क होणार आहे शिवसृष्टीतून शिवाजी महाराजांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत जाणार आहे. शिवसृष्टीतून इतिहासाला उजाळा मिळेल. फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील इतिहास प्रेमींसाठी हे महत्त्वाचं स्थळ ठरेल,असं ते म्हणाले. या ठिकाणी देवगिरी, तोरणा, शिवनेरी, राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, पन्हाळगड आणि विशाळगड या गड–किल्ल्यांची 3D द्वारे सफर घडवण्यात येणार आहे. त्यामुळे किल्ल्यांचीदेखील माहिती मिळणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.