एक्स्प्लोर

Malegaon Karkhana Election: माळेगाव कारखाना निवडणूक निकालाबाबत मोठी अपडेट, अजितदादांचा आणखी एक मोहरा आघाडीवर, तावरेंचं पॅनेल पिछाडीवर

Malegaon Karkhana Election: अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलच्या उमेदवारांनी पहिल्या फेरीत विजय मिळवला असल्याने पॅनलच्या विजयाचे संकेत मिळत आहेत. मात्र आता निवडणूक आणखी चूरशीची बनल्याचं दिसत आहे.

बारामती : राज्याचे लक्ष लागलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी (Malegaon factory election) आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून, पहिला निकाल जाहीर झाला आहे. ब वर्ग सभासद प्रतिनिधी प्रवर्गातून निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे विजयी झाले आहेत. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते, कारण ही केवळ स्थानिक साखर कारखान्याची निवडणूक नसून, ती पवार कुटुंबाच्या राजकीय वर्चस्वाशी जोडलेली मानली जात होती. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलच्या उमेदवारांनी पहिल्या फेरीत विजय मिळवला असल्याने पॅनलच्या विजयाचे संकेत मिळत आहेत. मात्र आता निवडणूक आणखी चूरशीची बनल्याचं दिसत आहे.

आता अजित पवार पॅनेलचे रतनकुमार भोसले आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे. चंद्रराव तावरे यांच्या पॅनेलचे बापूराव गायकवाड पिछाडीवर असल्याचं दिसून येत आहे. तर अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग गटामधून रतनकुमार भोसले आघाडीवर आहेत. मतमोजणीला सुरुवात होताच सुरुवातीच्या टप्प्यांतच निळकंठेश्वर पॅनलने आघाडी घेतली होती. अजित पवारांच्या विजयामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान या निवडणुकीत अनेक नेते, स्थानिक कार्यकर्ते आणि शेतकरी वर्ग यांचे लक्ष लागून होते. साखर कारखान्याचे आर्थिक व सामाजिक महत्त्व पाहता, ही निवडणूक भविष्यातील राजकीय समीकरणांवर प्रभाव टाकणारी ठरण्याची शक्यता आहे. उर्वरित मतमोजणीमध्ये निळकंठेश्वर पॅनलला आणखी किती जागा मिळतात, याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

अजित पवारांचा प्रचाराचा फळ?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही निवडणूक जिंकण्यासाठी स्वतःच मोर्चा उघडला होता. गेले काही दिवस ते बारामतीत तळ ठोकून निवडणूक प्रचारात गुंतले होते. मतदानाच्या दिवशीही अजित पवार यांनी गावागावातील मतदान केंद्रांना भेटी देत स्थितीचा आढावा घेतला होता. या निवडणुकीत 85 वर्षीय चंद्राराव तावरे यांनी अजित पवारांना थेट आव्हान दिले आहे. तावरे हे माळेगाव साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष असून, भाजपचे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते मानले जातात. तावरे हे पूर्वी शरद पवारांचे विश्वासू सहकारी होते. या निवडणुकीत एकूण चार पॅनेल्स रिंगणात आहेत. शरद पवार गट, अजित पवार यांचे निळकंठेश्वर पॅनल, चंद्राराव तावरे यांचे पॅनल आणि शेतकरी संघटनांचे पॅनल. त्यामुळे लढत चुरशीची होणार, हे स्पष्ट आहे.या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अजित पवारांच्या विजयाने निळकंठेश्वर पॅनलला सुरुवातीचा जोर मिळाला असला, तरी उर्वरित निकाल कशा दिशेने वळतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

अजितदादांचा पहिला दणदणीत विजय

या निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला असून ‘ब वर्ग गटातून’ उपमुख्यमंत्री अजित पवार हे विजयी झाले आहेत. 102 पैकी 101 मतं वैध होती, यातील अजित पवारांना 91 मतं मिळाली आहेत. सहकारी संस्था या गटासाठी मतदान करतात. यामध्ये अजित पवारांनी (Ajit Pawar) बाजी मारली आहे. अजित पवार यांचे निळकंठेश्वर पॅनल विरुद्ध चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांच्या नेतृत्वाखालील सहकार बचाव पॅनलमध्ये मुख्य लढत होत असल्याचं चित्र आहे. बारामतीतील प्रशासकीय भवन मधील अभियांत्रिकी भवन येथे मतमोजणी सुरु आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी चौरंगी लढत झाली होती.

 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari : मुंबई ते बंगळुरू 5 तासांत तर पुणे ते छत्रपती संभाजीनगर 2 तासांत प्रवास, गडकरींचा मास्टर प्लॅन!
मुंबई ते बंगळुरू 5 तासांत तर पुणे ते छत्रपती संभाजीनगर 2 तासांत प्रवास, गडकरींचा मास्टर प्लॅन!
Pune Crime News: स्वातंत्र्यदिनी सिंहगडावर पर्यटकांची तुफान गर्दी; दोन गटांत तुंबळ हाणामारी, एकानं भाला दगड उचलला अन्...; नेमकं काय घडलं?
स्वातंत्र्यदिनी सिंहगडावर पर्यटकांची तुफान गर्दी; दोन गटांत तुंबळ हाणामारी, एकानं भाला दगड उचलला अन्...; नेमकं काय घडलं?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; 108 बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; 108 बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Embed widget