Lalit Patil Case : ललित पाटील ड्रग्स प्रकरणात मोठी अपडेट; ललित पाटीलसह 14 जणांवर 3150 पानांची चार्जशीट दाखल
ललित पाटील आणि त्याच्यासह 15 जणांवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं तब्बल 3150 पानांचे चार्जशीट दाखल करण्यात आली आहे
पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयातून ड्रग्स रॅकेट चालवणारा ड्रग्स माफिया ललित पाटील (Lalit Patil) प्रकरणात अनेल खुलासे (Lalit Patil Drugs Case) समोर येत आहे. त्यातच आता ललित पाटील आणि त्याच्यासह 15 जणांवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं तब्बल 3150 पानांचे चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. ड्रग्स रॅकेट प्रकरणी ललित पाटील त्याचा भाऊ भूषण पाटील आणि इतर साथीदारांच्या विरोधात हे चार्जशीट पुणे पोलिसांनी कोर्टात सादर केलं.
पुण्यातील ससून रुग्णालयात आजारपणाचं कारण देत ड्रग्स रॅकेट चालवत होता. त्यावेळी ससून रुग्णालयातील गेटवर 2 कोटी 14 लाखांचं ड्रग्स सापडलं होतं. त्यानंतर हे सगळं मोठं ड्रग्स रॅकेट पुढे आलं. या रॅकटेचा तपास करताना बड्या लोकांचा हात असल्याचं समोर आलं. त्यानंतर सगळ्यांची कसून चौकशी सुरु झाली. ससून रुग्णालयातील कर्मचारी, पोलीस, कारागृह पोलीस, कारागृहातील डॉक्टरांसह ससून रुग्णालयातील डॉक्टरांचा संबंध असल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं होतं आणि सहा जणांना निलंबित करण्यात आलं होतं.
त्यानंतर आता चार्जशिट दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी मास्टर माईंड ललित अनिल पाटील (वय 37, रा. नाशिक), अरविंद कुमार प्रकाशचंद्र लोहरे (रा. मुंबई, मूळ रा. उत्तर प्रदेश), अमित जानकी सहा ऊर्फ सुभाष जानकी मंडल (वय 29 , रा. पुणे), रौफ रहीम शेख (वय 19 , रा. ताडीवाला रोड), भूषण अनिल पाटील (वय 34 , रा. नाशिक), अभिषेक विलास बलकवडे (वय 36 , रा. नाशिक), समाधान बाबूराव कांबळे (वय 32, रा. मंठा, जि. जालना), इमरान शेख ऊर्फ आमिर अतिक खान (वय 30, रा. धारावी), हरिश्चंद्र उरवादत्त पंत (वय 29, रा. वसई, पालघर) रेहान ऊर्फ गोलू आलम सुलतान मोहम्मद अन्सारी (वय 26, रा. मुंबई, मूळ रा. उत्तर प्रदेश), प्रज्ञा अरुण कांबळे ऊर्फ प्रज्ञा रोहित माहिरे (वय 39 , रा. नाशिक), जिशान इक्बाल शेख (रा. नाशिक), शिवाजी अंबादास शिंदे (वय 40 , रा. नाशिक), राहुल पंडित ऊर्फ रोहित कुमार चौधरी ऊर्फ अमित कुमार (वय 30, रा. विरार, मूळ रा. बिहार), यांच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
इतर महत्वाची बातमी-
-Pune MNS : कात्रज मनसेचा बालेकिल्ला आहे, होता आणि राहिल; मनसेच्या बॅनरची जोरदार चर्चा