एक्स्प्लोर
पुण्यात भंगार गोदामाला भीषण आग, 20 ते 25 दुकानं खाक
पुणे: पुण्यातील चिखलीमध्ये कुडाळवाडी येथे काल रात्री साडेबाराच्या दरम्यान एका भंगारच्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीत जवळजवळ 20 ते 25 भंगारची दुकानं जळून खाक झाली आहेत. या आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेतली असून अग्निशमन दलाच्या तब्बल 15 गाड्या आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या 5 तासापासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, अद्यापही ही आग विझलेली नाही.
दुकानातील भंगार सामानामुळे आग वाढत असून आता पुण्यातून दोन मोठे फायर इंजिन घटनास्थळी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, या आगीमुळं परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचं साम्राज पसरलं आहे. त्यामुळे आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाकडून सध्या शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement