Sharad Pawar: अजितदादांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग; पिंपरी चिंचवडमधील अनेक नेत्यांचा शरद पवाराच्या पक्षात प्रवेश, वाचा नावांची यादी
Big blow to Ajit Pawars NCP: अजित पवार यांच्या पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह वीस माजी नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे.
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह वीस माजी नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे.
#WATCH | Maharashtra: Several Ajit Pawar-led NCP leaders and Corporators from Pimpri Chinchwad join Sharad Pawar-led NCP-SCP at his residence in Pune.
— ANI (@ANI) July 17, 2024
NCP’s Pimpri-Chinchwad unit chief, Ajit Gavhane is also among the leaders who joined the party here. Three other senior leaders… pic.twitter.com/s71oyZl62w
पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार गटाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड मध्ये राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं आहे. ४ पदाधिकाऱ्यांसह एकूण २४ जणांनी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. शरद पवारांच्या उपस्थितीत या २४ जणांनी तुतारी हाती घेतली आहे. काल(मंगळवारी) या सर्व नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे खासदार सुनील तटकरे यांच्याकडे सोपवले होते. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांनी सोडलेली साथ अजित पवारांना (Ajit Pawar) मोठा धक्का मानला जात आहे. तर काल राजीनामे दिलेले पदाधिकारी आज शरद पवार गटात पक्षप्रवेश केला आहे.
अजित गव्हाणे यांचा समर्थकांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आज प्रवेश झाला आहे. पुण्यातील मोदी बागेत शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत या सर्वांनी प्रवेश केला आहे. ज्येष्ठ नेते आझम पानसरे, शहराध्यक्ष तुषार कामठे आदीसह १५ ते १६ नगरसेवक यावेळी उपस्थित होते. माजी आमदार विलास लांडे देखील उपस्थित होते.
पक्षप्रवेश झालेल्या नेत्यांची नावे
अजित गव्हाणे- शहराध्यक्ष
राहुल जाधव - कार्याध्यक्ष
हनुमंत भोसले - माजी महापौर
वैशाली घोडेकर - माजी महापौर
समीर मासुळकर - माजी नगरसेवक
पंकज भालेकर - माजी नगरसेवक
समीर वाबळे - माजी नगरसेवक
गीता मंचरकर - माजी नगरसेवक
वैशाली उबाळे - माजी नगरसेवक
शुभांगी बोऱ्हाडे - माजी नगरसेवक
विनया तापकीर - माजी नगरसेवक
संगीता ताम्हाणे - माजी नगरसेवक
रवींद्र सोनवणे - (पती, माजी नगरसेविका दिवंगत पौर्णिमा सोनवणे)
यश साने - पुत्र, दिवंगत नगरसेवक दत्ता साने
वसंत बोऱ्हाटे - माजी नगरसेवक
संजय नेवाळे - माजी नगरसेवक
प्रवीण भालेकर - माजी नगरसेवक
निवृत्ती शिंदे - माजी अध्यक्ष, शिक्षण मंडळ
अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय का घेतला?
अजित गव्हाणे म्हणाले, पिंपरी चिंडवडमध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता होती. तेव्हा अतिशय चांगल्या प्रकारे काम झालं होतं. गेल्या २०१७ साली झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपची सत्ता आली. तेव्हापासून पिंपरी चिंचवड शहराची मोठ्या प्रमाणावर अधोगती झाल्याचं चित्र दिसून येत आहे. विशेष म्हणजे भोसरी विधानसभा हा भाग सर्वांत जास्त मागे पडलेला आहे. सत्ता असताना देखील काही विकासकामे झालेली नाहीत. एकहाती सत्ता अजित पवारांकडे (Ajit Pawar) नव्हती. त्याच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अशी परिस्थिती दिसून येत आहे, त्यामुळे आम्ही अजित दादांना सोडून शरद पवारांसोत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे अजित गव्हाणे यांनी सांगितलं आहे.
भोसरी विधानसभेचा चुकीच्या पध्दतीने विकास झाला. पैसे खर्च करून देखील काही उपयोजना दिसत नाहीत. येथे नियोजनबध्द पध्दतीने विकास करणे गरजेचे आहे. पुढची ५० वर्षे डोळ्यासमोर ठेवून विकास करणे गरजेचे आहे असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. तर मी विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहे, मी गेल्या काही वर्षांपासून यासाठी प्रयत्न देखील करत आहे. त्या दृष्टीकोनातून मी अनेक दिवस झाले प्रयत्नशील होतो. त्याप्रमाणे मी काम देखील करत होतो, असंही त्यांनी म्हटलं आहे.