एक्स्प्लोर

Yugendra Pawar Baramati Election: सुनेत्रा काकींनी बोलावल्यास जाईन, बारामती पोटनिवडणूक उमेदवारी अर्जावर युगेंद्र पवारांची भूमिका

Yugendra Pawar Baramati Election: आम्ही बारामतीमध्ये निवडणूक लढणार नाही, राहुरीची जागा लढायची की नाही हे अजून कन्फर्म नाहीये ते प्रदेशाध्यक्ष ठरवतील असंही युगेंद्र पवारांनी म्हटलं आहे.

बारामती: राज्यातील बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. त्यानुसार या दोन्ही मतदारसंघात २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार असून, मतमोजणी ४ मे २०२६ रोजी केली जाणार आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर बारामती तर शिवाजी कर्डिलेंच्या निधनानंतर राहुरी मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. आता भाजपकडून राहुरी मतदारसंघासाठी शिवाजी कर्डिलेंचे सुपुत्र अक्षय कर्डिले (Akshay Kardile) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून या मतदारसंघात उमेदवार देण्याची शक्यता आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते युगेंद्र पवार यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आम्ही बारामतीमध्ये निवडणूक लढणार नाही, राहुरीची जागा लढायची की नाही हे अजून कन्फर्म नाहीये ते प्रदेशाध्यक्ष ठरवतील असंही युगेंद्र पवारांनी म्हटलं आहे. तर सुनेत्रा पवारांनी अर्ज भरण्याच्या दिवशी बोलावलं तर मी नक्की जाईन असंही युगेंद्र पवार म्हणालेत.

100% त्याच निवडून येणार आहेत, याची खात्री आम्हा सर्वांना आहे

शशिकांत शिंदे यांचं स्टेटमेंट बघितलं, ही निवडणूक आपण लढतोय हे अजून नक्की नाही, शशिकांत शिंदे यांनी आता आपल्याला सांगितलं की, शरद पवारांशी चर्चा करतील, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्याशी ते चर्चा करून मग वरिष्ठ नेते ठरवतील त्या पद्धतीनेच निवडणूक लढवली जाईल किंवा लढवली ही जाणार नाही, अजून निर्णय आलेला नाही, असंही पुढे युगेंद्र पवारांनी म्हटलं आहे. तर बारामतीत आतापर्यंत सहा अर्ज दाखल झाले आहेत, तर दुसरीकडे महायुतीसह तुमच्या राष्ट्रवादीने ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी भूमिका घेतली आहे, तर काँग्रेस आणि इतर पक्षांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले आहे, त्याबद्दल बोलताना युगेंद्र पवार म्हणाले, शेवटी निवडणूक लढवण्याचा अधिकार हा लोकशाहीमध्ये सगळ्यांना आहे, पण आमची सगळ्यांची इच्छा आहे की सर्व बारामतीकरांची इच्छा आहे की, ही निवडणूक बिनविरोध व्हावी आणि तीच खरी श्रद्धांजली दादांना असेल, आम्ही सगळे सुनेत्रा पवार निवडून येण्यासाठी काम करू आम्ही प्रयत्न करू, 100% त्याच निवडून येणार आहेत, याची खात्री आम्हा सर्वांना आहे, असंही पुढे युगेंद्र पवार यांनी म्हटलं आहे.

पण जर त्यांनी मला यायला सांगितलं तर मग मी नक्की जाईन

  सहा तारखेला सुनेत्रा पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, त्या दिवशी तुम्ही जाणार का? या प्रश्नावर उत्तर देताना युगेंद्र पवार म्हणाले, अद्याप त्यांच्याशी बोललेलो नाही पण, पण जर त्यांनी मला यायला सांगितलं तर मग मी नक्की जाईन, असे पुढे युगेंद्र पवार यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा - मोठी बातमी: बारामती पोट निवडणुकीसाठी 30 जणांनी अर्ज नेले; निवडणूक बिनविरोध होणार की चुरस रंगणार?, राज्याचं लागलं लक्ष

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Embed widget