Baramati Plane Crash : चौकशीमध्ये सहकार्य नाही, उलट अडथळा आणला, बारामती रेड बर्ड वैमानिक प्रशिक्षण संस्थेच्या नऊ जणांवर गुन्हा
Baramati Plane Crash News : बारामती रेड बर्ड वैमानिक प्रशिक्षण संस्थेचा विमान उड्डाण परवाना या आधीच निलंबित करण्यात आला. आता त्याच्या नऊ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे: बारामतीतील रेड बर्ड फ्लाईंग अँड ट्रेनिंग सेंटरच्या (Red Bird Flight Training Centre) विमान अपघाताची चौकशी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना सहकार्य न करता सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार संस्थेच्या 9 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऑक्टोबर महिन्यात या रेडबर्ड संस्थेचे एक विमान 19 ऑक्टोबर तर दुसरे विमान 22 ऑक्टोबर रोजी कोसळले होते. या घटनेनंतर संस्थेचा विमान उड्डाण परवाना नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (Directorate General of Civil Aviation) निलंबित केला होता. सातत्याने गंभीर अपघात घडत असल्याने विमान अपघात तपास संस्थेकडून या कंपनीची चौकशी सुरू करण्यात आली होती.
तपास कार्यात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल
त्यानुसार विमान अपघात तपास ब्युरो दिल्लीचे सहाय्यक संचालक आनंदन पोण्णूसामी आणि त्यांचे सहकारी कणीमोझी वेंधन हे दोघेही 23 नोव्हेंबरला बारामतीत दाखल झाले. 25 नोव्हेंबरपर्यंत ही चौकशी सुरू राहिली. परंतु यावेळी संस्थेकडून तपासकामी कोणतेही सहकार्य झाले नाही. उलट त्यामध्ये अडथळा आणण्याचाच प्रयत्न झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी आनंदन पोण्णूसामी यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार रेड बर्ड संस्थेच्या 9 जणांविरोधात भादवि कलम 353 आणि 186 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारामतीत शिकाऊ पायलटला विमान प्रशिक्षण दिले जातं. बारामती विमानतळावरील रेड बर्ड फ्लाईट ट्रेनिंग सेंटर अकॅडमीकडून हे प्रशिक्षण देण्यात येतं. मागच्या सहा महिन्यात पाच अपघात तर ऑक्टोबर महिन्यात दोन वेळा अपघात झाल्याने या कंपनीवर आत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या संदर्भात रेडबर्ड कंपनीला ई-मेल पाठवून तातडीने कामकाज पुढील आदेश येईपर्यंत निलंबित करत असल्याचे म्हटलं होतं.
नेमकं काय घडलं?
कटफल इथे वैमानिकांना प्रशिक्षण दिलं जातं. अनेक पायलट इथे विमान उडवण्याचं प्रशिक्षण घेऊन तयार होतात. गेल्या काही दिवसापासून इथे जोरदार प्रशिक्षण सुरु आहे. पुणे आणि शेजारील जिल्ह्यातही या विमानांच्या घिरट्या पाहायला मिळतात. 22 ऑक्टोबर रोजी असंच ट्रेनिंग सुरु होतं. या ट्रेनिंगदरम्यान कटफलमध्ये विमान कोसळलं. या अपघातात शिकाऊ पायलट शक्ती सिंग जखमी झाले.
ही बातमी वाचा: